Wednesday, 28 January 2015

मंगळ

तुळशीचे लग्न झाले कि लग्नसराई सुरु होते .मुलगा बघणे ,मुलगी बघणे 
सुरु होते .पण मुलगा किवा मुलगी किती शिकले आणि दिसयला किती देखणे 
असेल तरी सगळ्यात आधी बघितली जाते ती कुंडली ........................
आज आपण किती चंद्र वर किवा मंगळावर गेले असे बोलत असलो तरी 
अनेक जण आहेत असे जे कुंडली बघूनच लग्न ठरवतात .
आणि या बाबत आपल्याकडील मालिका अजून खतपाणी घालतात .
कुंडली जुळवूनच लग्न ठरवले जातात .
कुंडली मध्ये जर मंगळ असेल तर..??
एखादी मुलगी /मुलगा हुशार असतात .देखणे असतात .सर्वगुण संपन्न असतात .
मुलगी पण सुंदर असते .पण जर पत्रिकेत मंगळ असेल तर या करणा साठी तिला
नाकारले जाते .मंगळ ची मुलगी आहे ना मग मुलगा पण मंगळचा पाहिजे .किवा 
 मुलाला मंगळ आहे.मग मंगळाची मुलगी हवी . पण हे सगळे करत असतानी 
मुलीचे/मुलाचे वय वाढते.आणि केवळ मंगळचा मुलगा/मुलगी पाहिजे म्हणून कधी कधी 
कोणत्या पण गोष्टीत अनुरूप नसतानी फक्त मुलाला /मुलीला मंगळ आहे म्हणून 
लग्न लावले जाते .पण हि एक गोष्ट जुळते बाकी अनेक गोष्टी नाही जुळत अशा वेळी 
त्या मुलींच्या /मुलांच्या वाटयला घुसमट येत नसेल का ?
असेच काही अनुभवातून 
!!आशा !!-२८/१/१५

Tuesday, 27 January 2015

समजून घ्या थोडे


लग्न म्हणजे एक जुगार असे नेहमी बोलले जाते ,

पण विचार केला तर हे खरे आहे .जीवनसाथी जर चांगला असेल तर आयुष्य ख़ुशीने जाते .
नाही तर सगळेच बिघडते .आज काल अनेक मुले प्रेमविवाह करतात.कधी घरचे तयार असतात कधी नाही ,
अनेकदा एकाच जातीचे असून देखील केवळ परर्स्थिती मधील फरक असतो .मग घराचे तयार होत नाही.त्यात आईवडील फक्त आपल्या मुलाचे हित बघत असतात .उद्या जर काही प्रोब्लेम आला तर सासर भक्कम असावे हा हेतू असतोच .पण अनेकदा मुले ऐकत नाही ,त्याना आवडणार्या मुली बरोबर लग्न करतात .मुलाच्या हट्टा साठी आई वडील तयार होतात . पण पुढे जाउन मुलाने आपल्या मर्जी विरोधी जाउन लग्न केले म्हणून त्याच्या मनात कुठे तरी सुने बद्दल असतो .जर तिचे थोडे जरी चुकले तरी मग तिला नावे ठेवले जातात .तिला सगळे आले पाहिजे अशी अपेक्षा करतात .मग ते मुलाला सारखे ऐकवत असतात तुझी बायको अशी तशी आहे .तिच्या कोणत्या गोष्टीला नावे ठेवले जातात .या उलट ती मुलगी तुमचे आई वडील असे आहे तसे आहे .हे त्या मुलाला ऐकवत असते .या मध्ये मुलगा मुलीला खूप समजून घेतो ,आपल्या भरोशा वर हि आपल्याबरोबर लग्न करून आली आहे .त्या मुळे तो आपल्या बायकोला सपोर्ट करतो .पण या मुळे आई बापांना वाटते मुलगा खूप बदलला आहे .मग एकामेका बद्दल गैरसमज वाढत जातात . आणि मग आपल्या बायकोला समजून घेत नाही म्हणून मुलगा वेगळा होतो .खरे तर यात त्याची काही चूक नसते तरी मग बायको साठी आई वडिलांना सोडले म्हणून लोक त्याला नावे ठेवतात .
तर दुसरी बाजू असते मुलगा प्रेम असून घरचे ऐकत नाही म्हणून त्यांना आवडणार्या मुली बरोबर लग्न करतो .पण प्रेम असलेल्या मुलीला विसरू शकत नाही .मग तो फक्त नवऱ्याचे कर्तव्य करतो .पण अनेकदा जेव्हा सुनेचे आणि सासूचे पटत नाही तेव्हा मुलगा तुमच्या पसंतीची मुलगी आहे ना मग तुम्हीच 
बघा असे म्हणून शांत राहतो कोणालाच काही बोलत नाही .नवरा बाजू घेत नाही
म्हणून असे बायकोला वाटते ,तर मुलगा आईवडिलांची बाजू घेत नाही म्हणून आई 

वडील दुखी परिणामी वाद वाढत जातात .नको कटकट म्हणून मग नाविलाज म्हणून अलग घर करतात .या दोन्ही मध्ये फक्त त्रास होतो तो फक्त मुलाला .
खरे तर हि समस्या मोठी नसतेच पण फक्त समजून घेतले जात नाही म्हणून 
हे सगळे घडते .मुलाला मुलगी आवडली आहे ना मुलाच्या सुखात आपले सुख असे समजून मग तिला समजून घ्या ,
आई वडिलाचे ऐकून लग्न केले ना मग त्यांना पण समजून घ्या.आई वडील आपले चांगले करणार म्हणून थोडे समजून घेतले तर असे प्रोब्लेम होणार नाही .

असेच मनातले काही २८/१/१५ 

Sunday, 25 January 2015

असेच काही

"क्या हुआ रात के ग्यारह तो बजे है .मॉं तू भी ना !"किवा तुला काय समजते .?असे संवाद जेव्हा कानावर पडतात ना तेव्हा मनात येते .अरे मुलानो ,मुलीनो जमाना वाईट आहे .नका राहू जास्त वेळ घराबाहेर कामा शिवाय .काही अनिस्ट घडले तर तुमचा त्रास नाही बघवणार आम्हला .जेव्हा तुला काय समजते ?असे बोलले जाते तेव्हा .खरच आम्हाला काही समजत नाही पण आता तुला जे समजते किवा तुला जे जास्त समजते असे वाटते ते आम्हीच शिकवले आहे .दहा वेळा शिकवले समजावून सांगितले ना .मग तुम्ही सांगा ना आम्हाला समजावून ..अनेक घरात असे चित्र असते .आजच्या मुलांना सगळे फास्ट हावे असते .ते चुकत आहे असे वाटले तर आई वडील समजावण्याचा प्रयत्न करू बघतात पण त्यात यश येत नाही ,आमच्या वेळी नव्हते असे असे उद्गार निघतात मग एक जमाना होता आई वडील जे बोलातीला ते ऐकाण्याचा .असे का हे विचारायचे नाही .मग ते चूक असो कि बरोबर ,बोलण्याचा प्रयत्न केला तर तुला काय कळते असे ऐकायला लागत असे .आम्ही सांगतो ना हे अनुभवाचे बोल आहे .काळ बदलला विचार बदलले .नवीन नवीन तंत्रज्ञान आले .मागची पिढी जसे जमेल तशे नवीन तंत्रज्ञाना बरोबर जमवून घेत आहे .तशा प्रयत्न करत आहे .पण या नवीन पिढी बरोबर जुळवून घेताने त्याची दमछाक होते कि काय असे वाटते .
एखादा दिवस असा येतो .काही तरी वेगळे वाटते .
सकाळी सकाळी उठल्या बरोबर एकदम आपल्याला 
आज काही तरी आनंदी बातमी समजणार किवा एकदम 
उठल्या पासून एकदम उदास वाटते .
असे का होते ती घडणाऱ्या घटनाची आपल्याला आधीच 
चाहूल असते का ?
माणूस हा समूह प्रिय आहे त्याला आवडते समाजात राहणे ,
समाजाची अनेक बंधने मग त्याला पाळावी लागतात .
पण हे सगळ्यात त्याला हवे असते ते प्रेम ,माया ,जिव्हाळा ,
भावभावना वर आधारलेली अनेक नाती असतात .त्या तिला एक भावनिक नाते असते .
प्रेमाचे ,...कोण करत नाही प्रेम ,एक आईचे मुलावर असलेले प्रेम ज्याची कशा बरोबर 
तुलना होऊ शकत नाही .
बहिणेचे भावावर असलेले प्रेम ,एका लेखकाचे आपल्या लेखनावर असलेले प्रेम ,
एका कालाकाराचे आपल्या कलेवरील प्रेम ,विध्यार्थ्याचे आपल्या शिक्ष्रका वरील प्रेम
एखद्या प्रियकराचे आपल्या प्रेयसी वरील प्रेम किती अलग अलग प्रेमच्या या भावना आहे .
आईचे प्रेम सगळ्यात अलग ते कशात मोजता येत नाही ,बहिणीची माया .मित्राचे निरपेक्ष
प्रेम याची कशात तुलना होऊ शकते का ?
साहित्या मध्ये आईच्या आणि प्रेयसीच्या प्रेमाला खूप महत्व दिले आहे .
पण आपले कर्तव्य करत आपल्या कुटुंबावर खूप प्रेम असते वडिलांचे ,
कोणत्या अपेक्षा नसलेले .
प्रेयसी वर असलेले प्रेम अलग असते ते
हृदयापासून मनातून जन्म घेते प्रेम ......
जोडीदारासाठी अवघं आयुष्य पणाला लावून जगणं म्हणजे प्रेम...
एकमेकाच्या गुणा बरोबर दोष समजून घेते ते प्रेम ....
कोणत्याही अपेक्षा च्या पलीकडे असते ते प्रेम ...
सहवासातून फुलात जाते मग प्रेम .
काय असते प्रेम ?
प्रेमाची व्याख्या होऊ सकते का ?
कारण ते अलग नात्यानुसार अलग अलग असत ना ?कधी न तुटणारा,
कधी न संपणारे .फुलाच्या सुवास सारखे कायम दरवळणारे ,
यालाच म्हणतात खर्‍या अर्थानं प्रेम.
म्हणून प्रेम निभावत असताना मनावर कोरलं गेलेलं नाव कधीच मिटलं जात नाही.
मग ते नाते कोणते असो .
मिटतो तो फक्त नात्याचा ओलावा आणि उरते ती फक्त ओल.
{सहज सुचलेले }

आसू आनि हसू

आसू आनि हसू माणसाच्या आयुष्यातील नाण्याच्या दोन बाजू .......
खूप आनंद झाला कि नकळत चेहऱ्यावर आणि डोळ्यात दिसते ते हसू ..
अति दु:ख झाले वेदना झाल्या कि डोळ्यातून बाहेर पडते ते आसू ..
मी खूप strong आहे असे बोलणारे जेव्हा दु:ख असाह्य होते तेव्हा 
ओक्साबोक्सी रडतात .
माणसाला जशी हसण्याची गरज असते तसे रडण्याची देखील असावी नाही का ?
आपले दु:ख कोणाला सागावे असे बोलले जाते .त्याने दु:ख हलके हते .
पण खरच हलके होत असावे का ?
व्यक्ती किती दु:ख सहन करू शकतो .पण सहन नाही करू शकत आपल्या
कोणाचे दु:ख .....
जर आपले मुले दु:खत असतील तर .....
अशा वेळी असाह्य होतात कोणते पण आईबाप ...
मग ते कोणी असो गरीब कि श्रीमंत .....
{असेच सुचलेले }

७/११/१४ 

कोणीच कोणाचे नसते.

कोणीच कोणाचे नसते. हे वाक्य आपण नेहमी ऐकतो .
याचा अर्था काय ?
म्हणजे आपण असा समज करतो
. ."आपण आहे कोणा साठी "
या मुळे आपल्याला काही वेळे साठी समाधान मिळत असेल का ?
विचार केला तर सगळेच एकटे असतात .
काही माणसा साठी लिहिण्यास शब्द कमी पडतील अशी माणसे असतात .
आपले नशीब असते जेव्हा ती आपली असतात .
कोणत्या गोष्टीची किमत ती दूर गेल्यावर कळते .
आपल्या आयुष्यात असेच होते ना .
अनेकदा काही गोष्टी आपल्या जवळ असतात .तेव्हा त्याची किमत नसते .
खोट्या अहंकारा मुळे आपली अनेक नाती अशीच दूर जातात .
मग आपण आपल्या चुका शोधण्या पेक्षा "कोणीच कोणाचे नसते"
असे बोलून आपले समाधान करतो .
कधी कधी कोणी पण नको असे आपल्याला वाटते .
एकटे राहावे .स्वताच स्वतला शोधावे .
असा वेळी आपल्यालाही समजते .आपण देखील कोणाचे असतो का ?

बालपण

बालपण 
व्यक्ती मोठी होते .मग ते कोणते पण क्षेत्र असो .
आदर मिळतो सगळे काही असते तरी मनातून जात नाही ते बालपण .
आणि जर ते खेड्यात गेले असेल तर मग अशी व्यक्ती मग जगात कुठे गेली 
तरी विसरत नाही .स्वताचे गाव ती मनात जपत जगत असते .
असेच मग अचानक जुने मित्र भेटतात .
आणि सगळ्या गोष्टी परत आठवतात .
आठवतात मळ्यातील वस्ती वरून गावात जाणारी ती ओबडधोबड वाट .
खडी वर आलेली .पायांना टोचणारे ते खडे .मग बाजूच्या फुफुट्यातून जातानि
भाजणारे पाय आणि त्यावर उडणारी धूळ .
माझा कडे एक सायकल असती तर असा मनात येणारा विचार
{आज कार असून मजा नाही }
उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये केलेले रोजगार हमीचे काम .
मित्रा बरोबर गाव भर भटकणे .कट्टी कधी बट्टी.
सूरपारंब्या ,लपाछापी.....
गावात येणारा एकमेव गारेगार वाला त्याचा मागे फिरणे .
कोणच्या घरी जेवणे .कोणी ओरडले तरी आपलेच आई वडील बोलतात
असे समजून ऐकून घेणे .
१५ ऑगस्ट २६ जानेवारीला स्वताच ड्रेस धुणे .पिताळी तांब्यात
विस्तव टाकून इस्री करणे .
थंडीत शाळेत जातानि स्वेटर नसतानी कुडकुडणे.
नवीन कपडे हवे म्हणून आई कडे हट्ट करणे .ते ती नाही घेऊ शकत
म्हणून वाईट वाटणे .
आणि आवडणारा बाजाराचा दिवस ..
बाजारातून आईने आणलेली भेळ ....
कधी तरी लाडू ...
आणि आठवतो तो दिवस दहावीला छान मार्क्स मिळाले तरी
पेढे वाट्याला नसलेले पैसे ...
{आजचे मुले खरच नशीबवान आहे ना .त्यांना हवे ते कपडे मिळतात .
हवे ते मिळते कदाचित आपण न अनुभवलेले बालपण आपण त्याच्यात
परत जगत असतो ]

प्रत्येकच्या जीवनात काहीना काही घटना घडत असतात .
कधी चांगल्या कधी वाईट ..
अशा घडणाऱ्या घटना आपल्यला खूप काही शिकवून जातात .
काही घटना खूप मोठ्या असतात .
तर काही छोट्या ,पण अशा छोट्या घटनाच कधी कधी आयुष्यला 
कलाटणी देणार्या ठरतात .
खूप काही शिकवून जातात .
१४/११/१४ 
काय केले फेसबुकने ....
फेसबुक एक आभासी जग आहे .पण या आभासी जगात काही 
गोष्टी खूप चांगल्या देखील आहेत .
मैत्री होते येथे कोणा बरोबर देखील ,येथे विचार नसतो ,
जातीचा ,गरीब ,श्रीमंत ,शहरातील ,खेड्यातील .येथे असतात .
ते पटणारे विचार .नाही पटले विचार अनफ्रेन्ड करता येते .
आज अनेक खेड्यातील मुले शिकलेले असतात काही शिकत असतात .
पण कमी असते ती आत्मविश्वासाची फेसबुक व्यक्त होण्याचे एक प्रभावी साधन
झाले .
त्यांना साथ देतात मग बाकी फेसबुक फ्रेंड मग ते
कोणी जॉबसाठी गाईड करतात तर कोणी कोर्सेससाठी.
जिथे रोजचा पेपर वाचायला मिळत नाही तिथे फेसबुक मुळे
माहिती भेटते .
जवळ कोणी नाही असा वेळी एक स्टेटस् टाकले .अनेक जण
त्या प्रोब्लेम वर माहिती देतात .
फेक लोक असतात पण त्यांना ओळखायला शिकले
पाहिजे .
अनेक जण बोलतात आभासी जगातील मैत्री टिकणारी असेल का ?
असते .आपण कसे असतो त्यावर ते असते .टिकायला पण करणे असतात .
आणि नसेल टिकणारी, तर त्यालाही काहीतरी कारणं असतातच ना ?
काही असो फेसबुक मुळे अनेक जन व्यक्त होयला शिकले हे काय कमी ....


असली नकली .....
आपल्याला रोज अनेक लोक भेटतात .काही नातेवाईक असतात .
कोणी फ्रेंड असतात .कोणी आपल्या खूप जवळचे आहे असे दाखवतात .
पण माणसे दाखवतात एक आणि आसल मध्ये असतात अलग .
सज्जन .साधे वाटणारे माणसे कधी कधी भयंकर विकृत असतात .
ते आपली इमेज क्लीन बनवतात .मी नाही त्यातल्या सारखे .
असे लोक खरे कसे हे फक्त त्यांच्या रोज सहवासात असणर्या लोकांना
माहित असते .मग ते कोणी असो महिला किवा पुरुष .
असे लोक ओळखणे खरच अवघड असते.
आणि जेव्हा ओळखायाला येतात .तेव्हा फक्त काही ओळी
आठवतात .
एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग

१५/११/१४ 

आजचे मुले का स्मोक करतात ,

महालक्ष्मी मंदिर पासून बाहेर पडून चालत हाजीअली कडे फुटपाथने 
जात असतानी समोर एक मुलगा आणि एक मुलगी चालत होते ,
दोघे पण छान होते मुलगी तर खूप सुंदर होती .
अचानक त्या मुलाने सिगारेट काढले आणि पेटवले 
तो स्मोक करत होता .त्या मुलीनी त्याच्या हातातून सिगारेट घेतले .
मला वाटले आता ती फेकून देईन .आणि त्याला रागवेल .
पण झाले उलटेच त्या मुलीनी स्वताच स्मोक करायाला सुरवात केली .
यात कोणी म्हणेल त्यात काय आज काल मुली स्मोक ड्रिंक देखील करतात .
प्रश्न कोण काय करते हा नाहीच आहे .
प्रश्न आहे तुमच्या हेल्थ चा "धुम्रपान आरोग्यास हानिकारक आहे "
असे लिहिलेले असते तरी ,
आजचे मुले का स्मोक करतात ,अनेक करणे असतात
वाढती स्पर्धा ,स्वताला अस्र्रक्षित समजतात .
बाकीचे करतात म्हणून आपण करणे .
त्यांना सतत असे वाटत आपण केव्हाही धुम्रपान सोडू शकतो
, कारण त्यांना माहित नसते हे व्यसन लागले कि सुटणे अशक्य असते .
त्यामधील काही रसायने हे खूप हानिकारक असतात .त्यामुळे
कॅन्सर होऊ शकतो
सिगारेटच्या व्यसनामुळे : फ़ुफ्फुसांचा कर्करोग , घशाचा कर्करोग होऊ शकतो .
काहीना वाटते स्मोक करणाऱ्या लोका बरोबर आपण राहिले तर काही
होते .आपण कुठे पितो .पण जर दमा असेल तर .मात्र असा स्मोक करणर्या
लोका मुळे त्रास होऊ शकतो .
अनेकांच्या मते त्यांनी हे व्यसन सोडण्याचा प्रयत्न केला .
पण मग चिडचिड होते ,किवा खूप उदास वाटते .
स्मोक का करतात या वर काही उत्तरे अजीब असतात .
अनेकदा केवळ कॉलेजमध्ये बाकी मुले करतात मग एक एन्जोय
म्हणून सुरवात केली जाते .
तर काही जण केवळ प्रेमभंग झाला म्हणून तर काही टेन्शन मुळे
सुरवात करतात .
पण मुली उद्या जेव्हा आई होतील तेव्हा येणारी पिढी हि निरोगी असेल ना ?
{असेच सुचलेले }आशा १६ नोव्हेंबर १४
धोखा देणारे लोक भित्रे आणि कम जोर असतात .
ते आपल्या चुकांचे खापर दुसऱ्या वर फोडतात .
खोटे बोलून स्वताचा बचाव करतात .
असे लोक मग नजरेतून उतरतात कायमचे .. ..
प्रत्येकच्या जीवनात काहीना काही घटना घडत असतात .
कधी चांगल्या कधी वाईट ..
अशा घडणाऱ्या घटना आपल्यला खूप काही शिकवून जातात .
काही घटना खूप मोठ्या असतात .
तर काही छोट्या ,पण अशा छोट्या घटनाच कधी कधी आपल्याला 
खूप काही शिकवून जातात .
कधी कधी आपल्या कडून आपल्या नकळत कोणचा तरी अपमान 
होतो आपल्या लक्षात येते आपण माफी पण मागतो .
पण तो पर्यंत उशीर झालेला असतो .
समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाते .
मग आपण आपल्या स्वताला प्रश्न करतो खरच
आपल्या कडून चूक तर झाली आहे .आणि समोरच्या व्यक्तीचे
मन दुखावले गेले ते खरच माफी मागून ते परत पहिल्या सारखे
होते का ?
नाही होत त्या व्यक्तीच्या मनात मग तुमच्या बद्दला एक अनादर
तयार होतो तो मग माफी मागून पण कमी नाही होत .
विचार करून बोलावे या साठी नाही का ?
आशा....................

वाटा

तू कधी तरी बोलशील वाट बघत राहिले .
पण तू काही बोलायचे नाही असे ठरवून 
शांत राहिला .
खरे तर माझी वाट तर अलग होती 
पण तुझा बरोबर चालयचे होते .मग माझी वाट 
सोडून दिली तुझा बरोबर चलायचा प्रयत्न केला .
वाटले होते किनारा भेटेल तुझा बरोबर .
पण तु बोललाच नाही .
तुझा हा च्या चक्कर मध्ये आज कुठे येऊन पोचले .
आता परतीचा रस्ता पण बंद झाला .
वेड्या सारखे रस्त्याच्या शोधात
फिरत राहिले गोलगोल ,
आज जग वेडे म्हणते .म्हणून दे .
कारण जगच्या दृष्टीने वेड्यांना कुठे
मन भावना असतात ,
तु खूप स्ट्रग आहेस .सहन करण्याची ताकद आहे तुझा कडे 
असे आपण कोणाबद्दल बोलतो .तेव्हा आपल्याला वाटते .
ती व्यक्ती कमजोर नाही आहे .
पण दु;ख झाले .कि वेदना होतात असा वेळी अशा 
व्यक्ती डोळ्यातून पाणी काढत नाही .
अशा वेळी ती व्यक्ती मनाने रडत असते .
जे कोणाला दिसत नाही .!!आशा!!

२०/११/१४ 
तुझे येणे नुसते येणे नव्हते .
त्या बरोबर होती खूप सारी ख़ुशी 
जिने माझे जीवन देखिले आनंदी झाले .
स्वागत केले तुझा येण्याचे .
तुझ्या हसण्यात ,तुझ्या असण्यात 
विसरून गेले जग सारे .
तुझ्या तालावर नाचत राहिले .
कधी चिंब भिजले .कधी गारठले .
आणि एक दिवस तू अचानक
निघून गेला दूर
आता फक्त अश्रू आहे डोळ्यात
तुझ्या सारखे कधी रिमझिम तर कधी
सरी सारखे .......
आता तुझी परत वाट बघणार .....
पुढच्या वर्षी
वेळेवर येशील ना ???

२०/११/१४ 
आज दहावीचा निकाल, आयुष्याचा एका महत्वपूर्ण टप्पा ओलांडून एका नवीन प्रवाहात उड्या मारायला सज्ज असतील सगळे, कोणाला झोपच नसेल लागली, माझा हा पेपर खराब गेला, आता माझी वाट लागणार, मला ते गणित सुटलच नाही, मराठीचा पेपर पूर्ण झालाच नाही ह्या ना त्या काळजीने. सारखं घड्याळ बघ, किती टक्के मिळतील मला?
आठवते का आपल्या निक्लाचा दिवस ..........खरे तर शेहारा मध्ये राहत असेल तर अख्या बिल्डींग ला माहित असते कोण दहावीला आहे ,कोण बारावीला आहे .........आणि खेड्यात असाल तर अख्या गावाला माहित असते ...........जे हुशार असतात त्यना टेशन असते किती गुण मिळणार ...आणि बाकीच्य्ना आपण पास होणार का नाही याची काळजी असते ............जर आपण नापास झालो तर लोक काय म्हणतील असे खूप प्रेश्ना असतात मनात .............
माझा निकला होता काय होणार म्हणून मी गेलेच नव्हते .कारण तशी गरजच नव्हती कारण गावात लगेच माहिती पडायचे कोण कोण पास झाले आणि किती गुण भेटले

६जुन १३ 
कधी तरी वाटते ना असा एक दिवस माझा असावा फक्त माझा ................म्हणजे सकाळी वाटेल तेव्हा उठावे ....सकाळची धावपळ नाही लवकर आटोप उशीर होत आहे असे ऐकयला लागू नाही .........उठल्या बरोबर मस्त रिमोट घेऊन मस्त गाणे बघावे .............खूप आवडणारे पण बाकीच्याच्या आवडी चा विचारा मुळे खूप दिवसा पासून केला नाही असा एखादा पदार्थ करावा स्वतच्या आवडीचे कपडे घालावे ..........मस्त बाहेर जावा .........कंटाळा येत नाही तो पर्यन्ता भटकावे ..........कशाची काळजी नाही चिंता नाही ...........असा एक उनाड दिवस असावा ना ??????
१८/१२/२०१३ 

मनातील खंत







जीवनात अनेक गोष्टीची खंत असते कधी ती स्वतच्या आयुष्यातील तर कधी समा जात आजूबाजूला घडणारया गोष्टी बद्दल .
माझे लग्न २० वर्ष पूर्वी झाले जो अनुभव तेव्हा होता तोच आता पण येतो त्या बद्दल मी लिहिणार आहे
आज मुली शिकत आहे नोकरी करतात.कमीत कमी शहरात मुली पदवी पर्यन्त शिक्षण घेतात नन्तर लग्न करतात .पण खेडेगावात आज आणि २०,२५ वर्ष पूर्वी जशी परस्थिती होती तशीच काही प्रमाणत बघायला भेटते . मुली गावात जेवढ्या वर्गा पर्यन्ता शाळा असेल तेव्हडेच शिक्षण घेत .आज पर्त्यक गावात १० वी पर्यंत शाळा आहे .म्हणून मुली १० वी पर्यंत शिकतात अपवाद ने काही मुली ना बाहेर शिक्षणा साठी जायला भेटते.पण त्याची संख्या बोटावर मोजण्या एवढी असते.मग बाकीच्या मुली काय करतात .??????
आज देखील खेड्यातील मुली या १८ वर्ष पूर्ण होण्या आधीच त्याचे लग्न करून दिले जाते .आणि लग्न करण्यचा पूर्ण निर्णय हा आई वडीलचा असतो.आणि हे मी स्वतहा आज देखील बघते. आणि माझी हीच खंत आहे आज मुलीना १२ वी पर्यन्त शिक्षण मोफत असतानी देखील मुलीना का शिकवले जात नाही? .का त्याच्या लग्नाची घाई केली जाते ?????
हे प्रेश्न मी अनेक आई वडिलांना विचारले आणि त्या वरील त्याचे उत्तर असे असतात.जे काही वर्षा पूर्वे होते .मुलीची जात आहे लिहिण्या वाचण्या पुरती शिकली ना.आणि मुख्य म्हणजे आई वडिलच्या मनातील भीती मुलगी कोणच्या प्रेमात तर पडणार नाही ना .आपल्या समजाच्या बाहेर लग्न तर करणार नाही ना .आणि याचे कारण अपवादाने एखाद्या मुलीनी घरातून पळून जाऊन प्रेम विवाह करणे त्या मुळे बाकीच्या मुली वरील बंधने वाढतात .आणि आपल्या मुलीनी असे काही करू नाही म्हणून त्याचा शेवट मुलीचे लवकर लग्न..........
माझी हीच खंत आहे कधी माझा खेड्यातील मुली त्यांना हवे तसे शिक्षण घेऊ शकतील.आणि आई वडील त्याच्या वर विश्वास ठेवतील .

फेब्रुवारी २०१४




















कचाट्यातून चालताना चपलेचे महत्व कळते,दु:खात कुढत बसतांना आयुष्याचे गुपीत कळते.
आपले स्वत:चे आहे असे वाटते पण नशीबात मात्र नसते , तरीही का कुणास ठाऊक मन त्या मागेच पळत असते.
कधी खड्डा कधी अडथळे, मार्गात नेहमीच कठीणाइ असते. तरीही त्याला झुगारून पुढे जायची वेगळीच जीद्द असते.
हवं हवंसं वाटणं आणी तरीही लांब जाणं, यात खरच परीक्षा असते.
ऊगाच कर्णाचं रंप दाखवून आपली मात्र वाट लागत असते,
जङलेले बंध तुटण्याची खंतं असते, तुटताना मात्र मनाला जखम होते.
कसे अजब आहे पहा.....मनाच्या जखमेचे औषध मात्र शोधुनही सापङत नसते.
आज रडणे आणी पुन्हा पडणे, असेच कधी कधी चालू असते.
पुन्हा पडण्यासाठी मात्र ऊभे राहण्याची जीद्द कुठूनतरी येत असते......

अनामिक {आवडलेली पोस्ट }

आज खूप बोर होत आहे किवा खूप कंटाळा आला आहे .असे आपण स्वतः बोलतो किवा इतराना बोलताना नेहमी ऐकतो .
कोणी विचारले काय चालू आहे ठरलेले उत्तर भेटते .काय नाही नेहमीचे रुटीन ......
म्हणजे काय आयुष्यात येणारा तोच तोच पणा .
आज करमणुकीचे अनेक साधने आहे.बदल हा माणसाचा स्वभाव असल्या मुळे त्याचा पण कंटाळा येतो.
असा का होते ..........
कारण अलीकडे सवांद कमी झाला आहे का ?
जमाना इंटरनेटचा आहे .एक क्लिक वर हवे ती माहिती भेटते .
१० दिवसाचे काम १० तासात होते आहे.कदाचित चालेन्जिंग काही वाटत नाही म्हणून असे होत असावे का ?
२०/२/१४ 


Friday, 23 January 2015

आवडलेले ठिकाणे {गाथा मंदिर ,देहू }


अभंग म्हटले कि लगेच डोळ्या समोर येतात ते आपले संत ,
मग आठवतात ते "तुका म्हणे ज्ञाना म्हणे ...
म्हणजे देहू आणि आळंदी .
पंढरपूरला जाणारे देहू आणि आळंदीला जातातच जातात .
साधारणत २० ते २२ वर्षा पूर्वी आमच्या गावा कडे हा.भ .प लहवित कर महाराज 
किर्तना साठी येत असत तेव्हा ते नेहमी तुकाराम महाराजाचे गाथा मंदिर बांधायचे 
आहे.हे सांगत असत .
पुण्याला फिरायला गेलो आणि ठरवले आळंदी तर बघितले आहे देहू बघून जाऊ .
संध्याकाळ ५ वाजायला आले होते .आळंदी मधून प्रवासी जीप मधून देहू कडे निघालो 
अचानक पावसाचे वातावरण झाले .

जून महिन्याचा पहिला आठवडा होता . .
पहिला पाऊस त्या मुळे जोराचा वारा सुटला .आणि पावसाला सुरवात झाली .
मस्त मातीचा वास सुटला होता .थंडी वाजत होती.
देहू मध्ये उतरलो तर पाऊस नव्हता पण वातावरण मात्र मस्त होते .
मंदिरात गेलो आणि बाहेर पावसाला सुरवात झाली .
खरे तर भिजलो होतो त्यामुळे आता येथेच राहू हा विचार केला .
जुन्या मंदिर पासून गाथा मंदिर १ कि.मी .एवढे दूर आसवे .
छान पावसाचे वातावरण होते चालत निघालो पण पुन्हा पाऊस आला .
आता अंधार झाला होता राह्यला रूम भेटणार का नाही हा पण मोठा 
प्रश्न होता .पावसा मुळे आणि वाऱ्या मुळे लाईट गेल्या होत्या .
खूप अंधार होता .
भक्ती निवास मध्ये रूम बघयला गेलो .खरे तर तेव्हा भक्ती निवास नवीन बांधले होते .
पण आमची हालत बघून आम्हला रूम दिला .
थंडी आणि दिवसभराची दगदग त्यात लाईट नाही त्यामुळे झोपून गेलो .
सकाळी ६ वाजता उठलो आणि बाल्कनीत जाऊन बघितले आणि बघतच राहिलो .
किती सुंदर मंदिर ..

पटकन सगळे आवरून आम्ही मंदिरात गेलो .पाऊस पडून गेला होता .
सकाळची वेळ कोणी नव्हते .मंदिराच्या बाहेर एक काका हातात तंबोरा घेऊन अभंग म्हणत होते नकळत वडिलांची आठवण झाली .वडील वारकरी असल्या मुळे नेहमी घरात अभंग चालू असत .मंदिरात गेलो सगळी कडे भिंतीवर अभंग लिहिले आहे खूप छान .पाठीमागे वाहणारी इंद्रायणी आणि येणारा छान गार वारा खूप छान वाटत होते .तिथून निघावे वाटत नव्हते .बाहेर आलो आणि एका टपरी वजा छोट्या दुकनात चहा आणि मिसळ घेतली .मंदिराच्या माघील इंद्रायणी नदीवर गेलो .

नदीच्या किनाऱ्यावर हिरवी शेते मनाला मोहून टाकत होते .
आजूबाजूला कोणी नाही सगळीकडे शांतात .तिकडे बसून रहाव वाटत होते .
परत निघायला हवे होते .
पुन्हा चालत १ कि मी .तरी पण खूप प्रसन्ना वाटत होते .रस्त्यात परत एक मंदिर 
जिथे गाथा बुडवल्या होत्या असे समजले .
थोडा वेळ तिकडे बसलो आणि पुण्याला जाणाऱ्या बस पकडली 
पण मनात ठरवले पुन्हा नक्की यायचे .माहित नाही आता कधी जाणे होईल .


(३ जून २०१३)

Monday, 19 January 2015

आज बातम्यात सरकराचा अतिशय योग्य निर्णय ऐकला . 
दहशतवादी हल्ले होत असताना त्याचे ‘लाइव्ह’ कव्हरेज करण्यास आता कायद्याने बंदी येणार आहे.
जेव्हा देशात कुठे पण दहशतवादी हल्ले होतील तेव्हा मिडीयाला 
त्या घटनेचे कवरेज {बातम्या }देण्यास मनाई असणार .हा निर्णय 
२६/११ च्या हल्ल्याच्या वेळी मिडीया ने ज्या प्रकारे ब्रेकिंग न्युज च्या
नावाखाली जे केले .ते बघता सरकारने योग्य निर्णय घेतला आहे असे वाटते .
आज मिडिया ब्रेकिंग न्युजच्या नावा खाली काही दाखवतात .
राष्ट्रीय सुरक्षा व गोपनीयतेचा सपशेल बोजवारा उडवतात
पाकिस्तान मध्ये जेव्हा शाळेवर हल्ला झाला तेव्हा .
आपल्या देशातील शाळा बघा कशा भगवान भरोसे आहे हे दाखवण्या साठी
एक च्यानल ने मुंबई आणि दिल्ली मधील अनेक शाळेत जावून
त्या शाळेवर जर हल्ला झाला तर तो या रस्त्याने होईल त्या रस्त्याने होईल .
येथे सुरक्षा रक्षक नाही आहे .
असे अगदी दहशत वाद्यांना दाखवत होते कि काय अशा प्रकारे आपण हल्ला
करू शकता .
हे बघून कोणाला पण चीड येऊ शकते .सगळ्यात आधी असे सांगताना
यांना जाणीव नसते का ? अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचे
आरोप करणारी मिडिया आपण आपल्या देशाला धोखा होईल असे काही करत आहे .
याची त्यांना जाणीव नसते का ?
नवीन सरकारचा निर्णय अगदी योग्य आहे .
या निर्णया बद्दल सरकारचे अभिनंदन .....

२०/१/१५
आपल्या बरोबर जेव्हा अनेक जन असतात
तेव्हा आपण कशाचा विचार करत नाही .
त्याची कधी गरज पण वाटत नाही 
.कारण आपली कोणती कृती हि बरोबर 
का चूक हे सांगयला कोणी ना कोणी असते 
पण जेव्हा एकटे असतो तेव्हा मात्र खूप विचार करतो
आणि तो स्वता बद्दल जादा असतो .
मग त्यात आपल्या चुका असो कि आपले काही निर्णय
असो तेव्हाच मला वाटते आपण जादा शिकतो .
जे जीवनाच्या शाळेत जगायला उपयोगी पडते 

१७/१/२०१५
कधी कधी काही गोष्टी मध्ये आपण खूप हतबल होतो .
एखादी गोष्ट करायची किवा मिळवायची असते अगदी मनापासून 
पण काही कारणाने प्रयत्न करून देखील ती आपण पूर्ण करू शकत नाही 
किवा मिळवू शकत नाही .
मग नकळत आपण बोलतो काय करणार मजबुरी आहे .
असेच एक ठिकाणी वाचले .
"हर एक कि मजबुरी है जिसका नाम गांधीजी है "
याचा अर्थ काय मला नाही माहित .
पण प्रत्येक व्यक्ती आणि तिची मजबुरी अलग असतात .
मग ती कधी आदरयुक्त असते तर कधी अति
समजदार पणा मुळे असतो .अति समजदार स्वभाव हा देखील
कधी कधी अनेक ठिकाणी तुम्हला मजबूर करतो .
कधी तुम्हाला त्यामुळे हो किवा नाही बोलताच येत नाही .
अतिसमजदारपणा मुळे गृहीत धरले जाते .
आणि सगळ्यात मोठी मजबुरी असते गरिबी .
जगण्यासाठी पैसे हवे असतात ते जर असेल तर अनेक गोष्टी
सहज शक्य होतात .नसेल तर काय करणार मजबुरी आहे .
सगळे "सोंगे आणता येतात पण पैसेचे नाही "
याचा अर्थ काय व्यक्ती परत्वे अलग अलग मजबुरी
असतात .
{"हर एक कि मजबुरी है जिसका नाम गांधीजी है "हे का म्हणतात
कोणाला माहित आहे का ?}

१९/१/२०१५ 

माझ्या नावा बद्दल

कोणाची नावे किती छान असतात ना.त्यात खूप अर्थ असतो .
नाव हि अशी गोष्ट आहे जी आपण ठेऊ शकत नाही ,
मग कोणाला आपले नाव अजिबात आवडत नाही .
तर कोणाला प्रचंड अभिमान असतो नावाचा .
नावत काय आहे ??
असे किती म्हटले तरी शेवटी नावच सगळे काही असते ना ,
ज्यामुळे आपली या जगात ओळख असते .
माझे नाव आशा मला खूप आवडते .जे मला आईवडिलांनी
नाही तर माझ्या पेक्षा मोठ्या भावाने दिले आहे आणि ते पण
शाळेत नाव घालयला गेल्यावर ,
वडिलांनी मला त्याच्या बरोबर शाळेत पाठवले .
रस्त्याने जाताने रेडीओ वर एकले "अब सुनिये आशा
भोसले जी का एक गाना"
गाणे काय होते माहित माहित नाही .
आम्ही शाळेत गेलो बाईनी विचारले नाव काय ?
भाऊ पटकन बोलला हिचे नाव आशा आहे ,फक्त आशा पुढे बाई नका
टाकू .{कारण तेव्हा मुलीच्या नाव मागे बाई टाकत असत माझ्या अनेक
मैत्रिणीचे नावा मागे बाई लावले होते }
मला तर काहीच समजत नव्हते माझे नाव आशा कधी झाले .
कारण घरून जातानि मला असे काही माहित नव्हते .
घरी येतानी भावाने मला सांगितले आता लक्षात ठेव
तुझे नाव आशा आहे .
आयुष्यात कधी निराश न होणारी अशी आशा ,
आज पण मला माझे तेव्हा १० वर्षाच्या भावाने दिलेले नाव खूप आवडते .
आज मला एक फ्रेंड नि एक कविता पाठवली आणि शाळेचा तो पहिला दिवस
आणि माझे नाव कसे मिळाले ते आठवले .



एक फेसबुक वरील छोट्या फ्रेंड ने मला एक छान कविता पाठवली आहे .
धन्यवाद फ्रेंड
होते मनाची निरशा ,जेव्हा अबोल असते आशा.!!
सुप्त असतो भाव मनातला बोलवेसे वाटतानाही !!
स्तब्ध असते मन ,पुन्हा आठवताना !!
कारण मावळलेल्या दिसतात दिशा .!!
जेव्हा अबोल असते आशा ,तेव्हा मनाची होते निरशा !!
बोलातानी दिलेला विस्वास,अनेकदा आठवून जातो !!
कारण समजवतानाच दाखवून गेली जीवनाची दिशा !!
म्हणून आज खूप आठवते आशा ,
पण होते मनाची निरशा ,जेव्हा अबोल असते आशा.!!

१९/१/२०१५