Tuesday, 23 December 2014

एक होता आंद्रेस एस्कोबार

एक होता आंद्रेस एस्कोबार
भारतात क्रिकेटचे चाहते खूप आहे .अनेकदा आवडता खेळाडू जर चांगला खेळला नाही तर ते संतापतात .
फुटबॉल वर्ल्ड कप चालू आहे सध्या ,मला त्या मध्ये काही समजत नाही आणि मी बघत पण नाही .पण आजूबाजूला राहणारे लोक बघतात .ते चर्चा करतात ,रोज पेपर मध्ये बातम्या असतात .पर्त्यक न्युज chanal ला न्यूज असतात .
आज ए.बी .पी .मराठी chanal वर आज कोलंबियाचा खेळाडू आंद्रेस एस्कोबार बद्दल दाखवत होते .
अमेरिकेत १९९४मध्ये झालेल्या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत कोलंबियाने अमेरिके विरुद्ध १-२ असा पराभव झाला आणि या पराभवामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या सामन्यात आंद्रेस याने प्रतिस्पर्धी खेळाडूने मारलेला चेंडू अडविण्याचा प्रयत्न केला. . मात्र त्याच्या फटक्यात एवढा वेग होता, की चेंडू थेट गोलमध्येच गेला व अमेरिकेला गोल बहाल करण्यात आला. याच गोलच्या आधारे अमेरिकेने सामना जिंकला.
पण चाहात्याना तो पराभव सहन नाही झाला .
आंद्रेस एस्कोबार याने केलेला स्वयंगोल त्याच्यासाठी मृत्यूचेच कारण ठरला.
मायदेशी परत आल्या वर एक हॉटेल मध्ये गेला असता तीन माथेफिरू चाहत्याने त्याला 2 जुलै १९९४ मध्ये
गोळ्या घातल्या .आणि आंद्रेस एस्कोबार मुळे परभव झाला म्हणून त्याच्या अपराधाची शिक्षा आपण देत आहे .असे ते मारेकरी ओरडून सागत होते .
केवळ २७ वर्ष वय असलेला हा खेळाडू केवळ काही माथे फिरू मुळे दुनिया सोडून गेला .
खेळ म्हणजे कोणी तरी हरते कोणी तरी जिंकते .
खेळाला खेळ सारखे घायला पाहिजे .खेळाडू पण माणसे असतात .त्याचावर पण प्रेशर असते 

{फेसबुक पोस्ट ३जुलै १४ }

No comments :

Post a Comment