छान सुंदर मैत्री असते .एकमेकांचे विचार आवडत असतात.एकमेकांचीदुःख शेअर केली जातात.अचानक अनेक वर्षाचा सहवास ,बरोबर राहणे यातून एकामेका बद्दल सहवासातून प्रेम होते.आवडी निवडी माहिती असतात.एकमेकांनासमजून घेतात.पण हे जर अविवाहित असतील त्यांचा साठी आयुष्याचा जोडीदार म्हणून मग हे एकमेका साठी परफेक्ट होऊ शकतात.पण तरुण वयात जर कोणाला कोणी तरी आवडत असेल .पण काही कारणाने जर ते सांगता नाहीआले तर.ते प्रेम तसेच मनातील कुठल्या कोपऱ्यात तसेच राहून जाते.आयुष्याच्या वाटा बदलतात.आठवणी मात्र राहतात.कधी तरी कुठल्या वळणावर पुन्हा ते प्रेम समोर येते.आयुष्यात खूप काही घडून गेलेले असते.पण जर आयुष्यात जोडीदार चांगला नसेल तर.पुन्हा कुठे तरी मनात दाबून राहिलेले प्रेम पुन्हा जिवंत होते.नकळत एकमेका बद्दल ओढ वाढते.पुन्हा आयुष्यातील सुखदुःखाचो देवाण घेवाण होते.पुन्हा नकळत जगावे वाटते.पण त्यावेळी आपल्या मागे आपला संसार आहे आयुष्यात जोडीदार आहे.याचा विसर पडतो.पण कधी कधी काही लोक जोडीदारा कडून साथ नसल्या मुळे दुःखी असतात.त्याच्या संशयोस्वभावा मुळे दुःखी असतात.असा लोकांचे आपल्या जोडीदारा वर खूप प्रेम असते.मग असे लोक जुन्या भेटलेल्या प्रेमी चा त्यांच्या भावनांचा वापर करतात.त्यांचा बद्दल आपल्या जोडीदाराला सांगतात.मग ते काही असो फोटो अथवा किती वेळ कॉल वर बोलतो हे सांगतात.त्यामुळे त्यांचा दुरवलेला जोडीदार त्यांना परत भेटतो.मग असेलोक जुन्या प्रेमी ला विसरतात.कधी तरी मेसेज करतात तर कधी कॉल .पण जेव्हा हे यांचा जोडीदाराला समजते तेव्हा तो त्या समोरच्या व्यक्तीला प्रचंडत्रास देते.असा वेळी समोरच्याला साथ देने तर दूर हे त्यांना एखादा मेसेज करून सांगतात.प्लिज तु माझा बरोबर कोणता कॉन्टॅक्ट करू नको.इमेल यांनी मेसेज सोशल मीडिया.कारण माझा जोडीदाराने सुसाईडचा प्रयत्न केला .जर काही झाले तर त्याला जबाबदार तू असणार.अगदी समोरच्याला काय वाटणार याचा काडीचा विचार न करता .समोरची व्यक्तीला याचा किती त्रास झाला असणारे याचा असे लोक विचार करत नाही.यांचा जोडीदार मात्र आपल्या माणसाची किती चूक हे बघत नाही.यांचा जोडीदार मात्र एवढ्या वर पण थांबत नाही .तर समोरच्या व्यक्तीच्या असेल नसेल त्या नातेवाईकांना फोन करून बदनामी करत असतात.असा वेळी हे लोक चूप बसतात.काही दिवस जातात.ही व्यक्ती जसे काही झाले नाही असे समजून पुन्हा जुन्या प्रेमीला मेसेज करतात.पण हे लोक हे विसरून जातात.ते विसरले असले तरी समोरची व्यक्ती काही विसरलेली नसती.तिनी त्या व्यक्तीचा शेवटचा मेसेज लक्षात ठेवलेला असतो .मला कोणता कॉन्टॅक्ट करू नाही.माझा जोडीदाराने जर सुसाईड केली तर त्याला तू जबाबदार असणार.आणि कधी विसरणार देखील नाही
जीवन खूप सुंदर आहे .पण कधी कधी अनेक गोष्टी करायच्या राहून जातात आयुष्यात एक निराशा भरून राहते आपण काही करू शकत नाही याची एक खंत असते .आजून पण आपण काही करू शकतो याची जाणीव होते . .जसा दिवस संपताना सूर्य मावळतो.पण त्याच वेळी मावळतीचे सुंदर रंग आकाशात दिसतात .मन प्रसन्न करून जातात .असाच माझा एक प्रयत्न @असेच-मनातले-काही ....... माझ्या शब्दात #,मावळतीचे रंग
Monday, 9 October 2017
Saturday, 7 October 2017
निरागस
सकाळची वेळ होती ,जो तो आपल्या कामात होता .मुले शाळेत चालली होती .
चौधरी सर पण शाळेत निघाले होते .रोजच्या प्रमाणे देवाचे दर्शन घेवून ते शाळेत जात .आज पण ते मंदिराकडे वळाले .मंदिराचा परिसर सुंदर होता .मंदिरा समोर मोठे औदुंबराचे झाड होते त्याच्या चाहु बाजूला पार होता .चौधरी सरांनी बघितले पारावर छोटा ओम बसला होता .एवढ्या सकाळी हा येथे कसा असा हा प्रश्न त्यांना पडला .ते त्याच्या जवळ गेले.त्याच्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला .त्याबरोबर “मी चोर नाही ,मी चोर नाही “ मला मारू नका .असे म्हणत तो घरच्या दिशेने धावत सुटला .नकळत त्यांच्या डोळ्यात पाणी आले .त्यांनी देवाला हात जोडले आणि ओम साठी पार्थना केली .
ओम गावातील एका कपडे शिवणाऱ्या सदूचा मुलगा होता .अख्या गावात सदु कपड्या शिवण्यासाठी
प्रसिद्ध होता .त्याला या कामात त्याची बायको मीरा मदत करत असे .मोठी मुलगी आणि ओम हि दोन्ही त्याची मुले .त्यात ओम हा अतिशय हुशार होता. शाळेत नेहमी पहिला नंबर येत असे .सदूला आपल्या मुलाचा खूप अभिमान वाटत असे .ओम हुशार होता पण तो खूप हळवा होता .वर्गात तो सगळ्यांचा लाडका होता .शिक्षकांचा आवडता विध्यार्थी होता तो .शिक्षक वर्गात नसले कि खोड्या करणाऱ्या मुलांचे नाव लिहिण्यास ओम ला सांगत .त्याच वर्गात विनय नावाचा मुलगा होता अभ्यास कमी आणि धीगणं घालणे बाकी मुलांना मारणे हे त्याचे उद्योग चालू असायचे .तो वर्गात सगळ्यात मोठा होता .तो दोनदा नापास झाला होता .
नेहमी सारखे शिक्षक वर्गाच्या बाहेर गेले .जातानि मस्ती करणाऱ्या मुलांची नावे ओमला लिहिण्यास सांगितली .नेहमी सारखे विनयचे धीगणं सुरु झाला .त्यातच मुलांची आणि त्याची मारामारी झाली .विनयने एका मुलाला जोरात धक्का दिला आणि तो मुलगा बाकावरून खाली पडला .त्याच्या डोक्याला मोठे टेंगुळ आले .तो मुलगा जोरात रडायला लागला .त्यावर विनयाने त्याला धमकी दिली .माझे नाव शिक्षकांना सांगितले तर बघ .हेच तो वर्गातील मुलांना आणि ओमला बोलला .
शिक्षक वर्गात आले ओमने विनयचे नाव शिक्षकांना सांगितले .शिक्षकांनी विनयला “उद्या तुझ्या वडिलांना शाळेत घेऊन ये “ म्हणून सांगितले .दुसर्या दिवशी शिक्षकांनी त्याच्या वडिलांना त्याच्या बद्दल सांगितले .शिक्षा म्हणून आठ दिवस वर्गात बसू न देण्याची शिक्षा ,विनयचे वडील निघून गेले .पण त्यांनी घरी गेल्यावर त्याला बेदम चोप दिला .विनय मात्र जे झाले ते फक्त ओम मुले त्याला धडा शिकवायचा हे त्याने पक्के ठरवले .आठ दिवसांना तो शाळेत आला .जसे काही झालेच नाही अश्या प्रकारे तो ओम कडे गेला त्याला सॉरी बोलला .आपण आता तुझ्या सारखा रोज अभ्यास करणार .हे त्याने ओमला पटवून दिले . आता ओम शहाण्या मुला सारखा वागत होता .लवकरच शाळेची सहल जाणार होती .वर्गात विनय मोठा असल्या मुळे सहलीचे पैसे त्याला जमा करण्यास सांगितले .रोज मुले त्याच्या कडे पैसे जमा करत .पैसे जमा करण्याची तारीख संपली .शिक्षकाने विनय कडे पैसे मागितले .त्याने आपले दफ्तर काढले .पैसे काढण्यास त्याने त्यात चेक केले .आणि तो एकदम ओरडला .सर पैसे नाही .चोरी झाले .सर बोलले” तू आणले होते का” ? “हो” !त्याने उत्तर दिले .बाकी मुले पण बोलले हो ,त्याने आणले होते .”मग पैसे गेले कुठे “? सर वर्गा समोर उभे राहिले .” जर कोणी पैसे घेतले असेल तर देवून टाका “
पण कोणी काबुल झाले नाही .प्रकरण मुख्याध्यापकडे गेले .ते वर्गात आले .ते मुलांना बोलले कोणी घेतले असेल तर देवून टाका कोणाला शिक्षा होणार नाही .पण तरी कोणी काबुल झाले नाही .मग मात्र मुख्याध्यापकांनी सरांना सगळ्यांच्या ब्यागा चेक करायला सांगितल्या .कोणाच्या दफ्तरात पैसे भेटले नाही .आता फक्त ओमचे दफ्तर चेक करणे बाकी होते .पण तो कधी असे करणार नाही हा विस्वास जसा त्यांना होता तसा मुख्याध्यापकांना होता .पण नेमके ओमच्या दफ्तरात पैसे निघाले .ओम एकदम ओरडला “ मला नाही माहिती दफ्तरात पैसे कसे आले “.सगळ्या वर्गा समोर पैसे निघाले होते .अचानक मुले ओरडले “ ओम तू पैसे चोरले “.ओम ! तू चोर आहेस .असे बोलण्यात विनय सगळ्यात पुढे होता .
ओमच्या कानावर सारखे चोर चोर हे शब्द आदळत होते .सरांनी त्याला वडिलांना घेवून ये सांगितले .
शाळा सुटली सगळे मुले ओम कडे हा बघा चोरटा म्हणून बघत होते.ओम धावत घरी निघाला .घर थोडे दूर राहिले होते त्याने बघितले .विनय त्याच्या गल्ली मधील मुलांना घेवून उभा होता .जसा ओम जवळ आला तसे ते त्याच्या भोवती गोल करून त्याला “चोर, चोर” म्हणून चिडवू लागले .कोण त्याचे दफ्तर ओढत होते कोण कपडे .नंतर विनयने त्याच्या गालात मारली .चोर कुठला ?
हळव्या ओमला हे सगळे असह्य झाले तो जोरात ओरडला “मी चोर नाही “
त्याने विनयला जोरदार धक्का दिला आणि घरी धावत गेला .त्याच्या बहिणीला आधीच शाळेत काय झाले समजले होते .ओमला कोणी काही बोलले नाही .तो घरात आला एक कोपऱ्यात रडत बसला .त्याला आईने त्याच्या बहिणीने खूप समजावले .पण तो जेवला नाही .रडून रडून तसाच झोपी गेला .झोपते पण तो सारखा बडबडत होता “ मी चोर नाही ,मी पैसे नाही चोरले “सकाळी त्याला खूप ताप आला होता .त्या नंतर तो खूप दिवस आजारी होता .आजारातून तो बरा झाला पण तो पहिल्या सारखा नाही राहिला .तो कोणाशी बोलत नव्हता .कुठे तरी शून्यात बघत बसायचा .कोणी जवळ गेले कि “मी चोर नाही ,मी चोर नाही “ एवडेच बोलायचं .त्याच्या आई वडिलांनी त्याच्या डोक्यातून काढण्याचा खूप प्रयत्न केले .डॉक्टर केले .पण तो बरा झाला नाही .त्याच्या कोवळ्या मनावर कधी बरा न होणारा आघात झाला होता .विनय रोज त्याला बघत होता .मनातल्या मनात स्वताला दोष देत होता .कारण फक्त त्यालाच माहिती होते .ओमच्या दफ्तरात पैसे कसे आले .विनयने ते पैसे ओमचा बदला घेण्यासाठी ते पैसे ओमच्या दफ्तरात ठेवले होते .त्याला बदला घायचा होता पण .त्याला नव्हते माहिती असे काही होईल .आता तो कोणाला सांगू शकत नव्हता .तो रोज मंदिरात जावून देवाला ओम बरा होवू दे म्हणून पार्थना करायचा .आता तो खूप बदलला होता .पण हे विनयने केले हे चौधरी सरांना माहिती होते .त्यांनी त्याला देवा कडे प्रार्थना करताना ऐकले होते .पण सुधारलेला विनय परत बिघडू नाही म्हणून त्यांनी कोणाला सांगितले नाही .ओमचे तर आयुष्य बिघडले .विनयचे नको .म्हणून ते शांत राहिले .” पण निरागस असणारी हे मुले यांना कुठ माहिती असते .काय परिमाण होतात .काही गोष्टीचे “ आपणच त्यांना सुधारायच घ्यायचेअसे म्हणत ते शाळे कडे चालू पडले .
Subscribe to:
Posts
(
Atom
)