जिवलग
सकाळी सकाळी भर श्रावणात वैशाखा सारखे कड़क उन पडले होते।
पाऊस नाही मग काम सुद्धा नाही,शिरपा भकास नजरेने दूरवर पसरलेल्या काळ्या राना कडे बघत बसला होता।
त्याचे मन भूतकाळात हरवले होते।दर वर्षी गावात जत्रा भरत असे,त्या जत्रेत टांग्याच्या शर्यती होत असायच्या आपल्या कडे पण एक छान टांगा आणि एक खिल्लारी बैल जोडी असावी असे शिरपाला वाटत असे पण त्या साठी पैसे पाहिजे ना ? यावर शिरपाने एक युक्ती केली त्याने बैल घेण्या ऐवजी आपल्या सासूरवाडी वरून दोन छोटे गोऱ्हे आणले.ज्यांचे वय फक्त एक वर्ष होते.जे अतिशय देखणे होते पांढरे रंगाचे होते.त्यांचे नाव शिरपाने लाल्या आणि मोत्या असे ठेवले.दिवसभर शेतात काम करायचे आणि संध्याकाळी त्यांना खुराख देणे.त्यांच्या बरोबर वेळ घालवणे हेच काम शिरपा करत असे.बघता बघता कोणाची नजर लागावी अशी बैल जोडी तयार झाली.सगळ्या गावात शिरपाच्या बैलांची चर्चा होती.
नेहमी सारखी गावाची जत्रा आली.शिरपाने शर्यती मध्ये भाग घेतला आणि ती शर्यत जिंकली सुद्धा.प्रत्येकाच्या तोंडी शिरपाच्या लाल्या आणि मोत्याचा विषय होता.त्याच दिवशी गावातील पाटील शिरपा कडे आला आणि तू बोलशील ती किमत तुला देण्यास तयार आहे तुझी बैलजोडी दे.पण शिरपाने नकार दिला .
सगळ्या पंचक्रोशी मध्ये कुठे जत्रा असली कि शिरापाची बैलजोडी त्यात भाग घायची आणि जिंकून देखील यायची.जी रक्कम भेटत असे ती शिरपा आपल्या या लाडक्या मोत्या आणि लाल्याच्या देखभाली वर खर्च करत असे.यावर्ष पण गावाची जत्रा महिन्यावर येवून ठेपली होती.सगळ्या गावात त्याची तयारी चालू होती.आणि अचानक एक दिवस गावात सगळ्यांना देवळच्या पारावर जमा व्हा म्हणून गावात दवंडी झाली. जत्रेची तयारी बद्दल काही असेल म्हणून सगळे पारावर जमा झाले.
गावातील सरपंच उभे राहिले आणि अतिशय उदास आणि धीरगंभीर आवाजात बोलले"गावातील माझा गावाकार्यानो अतिशय वाईट बातमी आहे"सरकारने यापुढे जत्रा मध्ये चालणाऱ्या टांग्याच्या आणि बैलगाडी शर्यतीवर बंदी आणली आहे.त्यामुळे यापुढे आपल्याच नाही तर आता कुठेपण शर्यती होणार नाही.
शिरपाच्या डोळ्यापुढे अंधेरी आली.आपल्या स्वताच्या पोटच्या मुला सारखे आपण लाल्या आणि मोत्याला मोठे केले आहे.फक्त शर्यतीचे बैल म्हणून कधी त्यांना कोणत्या शेती कामाला लावले नाही.जर शर्यत बंद झाल्या तर त्यांचे काय होणार ? त्यांना तर काम येत नाही.असे उलट सुलट विचार करत शिरपा घरी पोहचला.या वर्षी पिक चांगले होते.चारा पाणी बरे होते त्यामुळे काही वाटले नाही .गेले दोन तीन वर्ष पाऊस पडला नव्हता.जो काही पाऊस आला होता त्यावर बाजरीचे पिके आले होते खाण्यास धान्य आणि चारा झाला होता.पण विहिरीना पाणी नव्हते त्यामुळे गेले दोन वर्ष गावात टँकरने पाणी पुरवले जात होते.पण यावर्ष अजिबात पाऊस नाही.सगळ्या राज्यात दुष्काळ पडला आहे पाणी कुठून आणणार ,रोज येणारा टँकर कधीपण येत असे.माणसाना पाणी मिळणे मुश्कील झाले आहे.तर हि जनावरे आता कशी सांभाळणार .
"आबा अहो उठा इथं काय उन्हात बसलात" शिरपा अचानक आपल्या लेकाच्या आवाजाने भानावर आला.काही नाही रे पोरा,पण तू काय म्हणतोस .
आबा पाऊस नाही खायला धान्य राहिले नाही.आपण माणसे कुठे तरी जावू पण "या मुक्या जनावरांना आपण काय करणार,म्या ठरवले आबा .आपल्या लाल्या आणि मोत्याला विकून टाकायचे " या पुढे नाही आपण सांभाळू शकत त्यांना.आजच मी त्यांना बाजारात घेवून जातो आहे.
असे बोलून शिरपाचा लेक घरात गेला.शिरपाचे डोळे भरून आले.तो तसाच बैलांच्या गोठ्यात गेला.मान टाकून बसलेले लाल्या आणि मोत्या ताडकन उठून उभे राहिले.आशेने शिरपा कडे बघयला लागले.शिरपाने एकदा त्यांच्या कडे आणि एकदा रिकम्या गव्हाणी कडे बघितले. हिरवा घास.कडबा खाणारी हि माझी लेकरे पण आज गव्हाणीत साधे डाखळे देखील राहिले नाही.त्याने लाल्या मोत्याला मीठी मारली आणि तो धाय मोकलून रडायला लागला.ती मुकी जनावरे देखील रडत होती.
शिरपाच्या लेकाने लाल्या आणि मोत्याला घेवून निघाला.सगळे घरदार बाहेर फटका पर्यंत त्याच्या मागे आले सगळे रडत होते.शेवटी ते दिसेनासे झाले.शिरपा त्राण गेल्या सारखा मटकन खाली बसला.आज कोणी कोणाशी बोलत नव्हते.
शिरपाचा लेक बाजारात आला.पण त्याला सगळी कडे त्याच्या सारखे चारा नाही म्हणून नाविलाजामुळे बैलांना घेवून आले होते.कसाई सोडून कोणी खरेदीदार येत नव्हते.आता काय करावे घरी घेवून जावे तर पाणी नाही चार नाही.उदास बसून होते सगळे."अरे !आमदार साहेब आले अचानक सगळ्या बाजारात आरडओरड झाली.सगळे तिकडे बघायला लागले.आमदार साहेब गाडीवर उभे राहिले."माझ्या शेतकरी बंधुनो, कोणाला आता बैल विकण्याची गरज नाही."
कारण आता या गावात चारा छावणी सुरु करण्यात येत आहे जो पर्यंत पावूस येणार नाही तो पर्यंत.

सगळे खूप खुश झाले.चारा छावणी मध्ये शिरपाच्या लेकाने आपले बैल जमा केले.त्याच्या ओळखीच्या माणसाला सांगून तो धावत घरी गेला .शिरपा आणि त्याच्या घरातील काही न खाता दुखी मनाने घरा बाहेर बसून होते.
दूर वरून येणाऱ्या पण रिकम्या आपल्या लेकाला बघून शिरपाचा बांध फुटला आणि तो रडायला लागला.
"आबा आपले लाल्या मोत्या ईक्ले नाही "
"काय बोलतो पोरा,पण ते आहे कुठे "शिरपा उठून उभा राहिला आपल्या लेकाचे दोन्ही खांदे हलवत बोलला .
"सरकारी चारा छावणीत."

शिरपाने लेकाला मिठी मारली दोघे रडत होते पण आता हे अश्रू आनंदाचे होते।
No comments :
Post a Comment