Wednesday, 26 August 2015

जनतेच्या सेवेसाठी असलेल्या अनेक सरकारी सेवा या अनेकदा तोट्यात चालतात असे आपण अनेकदा वाचतो.त्या मध्ये काम करणारे कर्मचारी भरपूर पगार घेत असतात.तरी कधी ना कधी त्यांचे आंदोलन असते तर कधी संप करून ते जनतेला वेठीला धरत असतात.
पण या सेवा देणारया संस्था किवा मंडळे तोट्यात का जातात.
काही दिवसा पूर्वी टेलीफोन खात्यात काम करणारी एक महिला भेटली.
तिच्या म्हणण्या नुसार खाजगी कंपन्या मुळे आज टेलीफोन खाते तोट्यात चालत आहे.आम्ही काही प्लान जाहीर होण्या आधी खाजगी कंपन्या त्या पेक्षा स्वस्त प्लान आणतात.पण हेच कारण आहे का ?
मी तिला विचारले जर असे आहे तर तुम्ही अभ्यास का नाही करत असे का होते.
मूळ कारण आहे तुम्ही जी सेवा देता त्यात काही प्रोब्लेम आला तर तुम्ही त्या कडे लक्ष देता का ?
या वर ती गप्प बसली.अनेक लोकांचे फोन चालत नाही कॉम्प्लेंत केली तरी लक्ष दिले जात नाही.कारण सांगितले जाते आमच्या कडे सामान नाही कुठून देणार.पण त्या बद्दल सरकारला कळविणे हे काम कोणाचे.या वर त्यांच्या कडे उत्तर नसते.
तेच एसटीचे आज एसटी तोट्यात जाते आहे हे नेहमी आपण वाचतो.पण जनतेच्या सेवेसाठी असणारी एसटी आज देखील गरजेची आहे पण अनेकदा बस उभी न करणे.बस थांबा एकीकडे आणि बस उभी राहते दुसरी कडे.विनंती करून देखील बस न थांबवणे अश्या घटना जर घडत आहे तर बस का नाही तोट्यात जाणार.खरे तर जनतेच्या सेवे साठी आहे ना मग आधी त्यांना प्रधान्य द्या.
गेले आठ दिवस माझे कॉम्पुटर बंद होते.छोटा प्रॉब्लेम होता आय .पी आड्रेस दाखवत नव्हते.तो फक्त एम. टी. एन. एल च देवू शकत होते.मी दोनदा कॉमप्लेंत
केली.काही फायदा नाही एकदा फोन केला त्यावर इकडे फोन करा तिकडे फोन करा.कोणी काही नीट सांगत नव्हते.हे माझ्या बरोबर अनेकदा झाले आहे .अनेक वेळा मी अगदी नाविलाज म्हणून वरच्या ऑफिस पर्यंत देखील तक्रार केल्या आहे .काल पण फोन केला एक मराठी महिलेने फोन उचलला माझे काही न ऐकता तक्रार केली ना .असे म्हणून फोन कट केला.मी परत केला समोर हिंदी बोलणारी कोणी होती.बोलण्याच्या टोन वरून ती साउथ इंडियन वाटत होती .ती काही बोलण्या आधी तिला सरळ बोलले.आता माझे जर नाही ऐकले तर सरळ पेपर मध्ये देते.म्याडम सरळ बोलल्या काय प्रॉब्लेम आहे समजून घेतला आणि फक्त फोन वर प्रोब्लेम सुटला सुद्धा.....
अनेकदा माझा अनुभव आहे मराठी कर्मचारी कधी ऐकून घेत नाही.समजून घेत नाही.सरळ फोन होल्ड वर ठेवून देतात .गेले चार वर्ष एम. टी. एन .एल वापरते .कधी नीट चालत नाही .तक्रार एकात नाही मग का नाही जाणार तोट्यात .आजूबाजूच्या लोकांना सरळ कडून टाकले .यात तोटा कोणाचा होतो ?
असेच मनातले काही

No comments :

Post a Comment