ये रे ये रे पाऊसा आणि पैसा
पावसाला सुरु झाला कि सगळी कडे कसे हिरवे गार होते.उजाड माळरान असो कि डोंगर दऱ्या सगळे हिरवेगार होतात.धरतीचे रूप एकदम पालटते.धरणी हिरवा शालू नेसल्या सारखी वाटते.सगळी कडे गवत उगवते आणि त्या बरोबर अनेक नवीन कधी न बघितलेले रानफुले बघयला भेटतात.अनेक रानभाज्या या काळात मिळतात.आणि त्याच बरोबर अनेक पाहुणे या काळात पावसा बरोबर दाखल होतात.त्यातील सगळ्यांना माहिती असलेला बेडूक ,गोगल गाय.छोट्या गवता वरील अळ्या अनेक पाय असलेले कीटक या काळात बघायला भेटतात ,सुंदर रंगी बेरंगी फुलपाखरे मस्त उडत असतात .
शहरात जन्माला आलेले आणि कधी मातीचा स्पर्श न झालेल्या मुलांना खरच माहिती तरी असते का?
ते फक्त अभ्यास करतात आणि चित्र बघतात छोटी आळी किवा किडा बघितले तरी घाबरतात .
खरच आपलीच जबाबदारी असते ना आपण मुलांना या निसर्गात घेऊन जावे त्यांना हे सगळे दाखवावे.आज मुंबई मधील अनेक शाळेच्या एक दिवसाची पिकनिक जातात पण त्या कुठे
एखाद्या रिसोर्टला.तिथे जाऊन पाण्यात खेळणे जेवणे बस एवढेच होते .
एखादी माशी किवा किडा जर चावला तर खूप काही झाल्या सारखे लगेच इंजेक्सन घेतले जाते
खरच निसर्गातील अनेक गोष्टीचा इलाज हा निसर्गातच असतो हे माहितीच नसते.अनेकदा
गांधी माशी किवा मधमाशी चावली तर लगेच तिथे ओली माती लावली जाते त्या मुळे त्रास कमी होतो हे माहितीच नसते .पावसाळ्यात निर्माण होणारे अनेक किडे किवा कीटक हे काही करत नाही किवा त्यांच्या कडून काही त्रास होत नाही >
शेतात दिसणारा अजून एक किडा ज्याला पैसा म्हणतात .त्याचे नाव काय आहे ते माहिती नाही.पण त्याला हात लावले कि तो लगेच छान वेटोळे करतो.मग तो नाण्यां सारखा दिसतो.
अश्याच काही आठवणी.
फोटो -गुगल

No comments :
Post a Comment