एखाद्याचे आयुष्य हे चार चौघा सारखे नसते .पण काही प्रमाणात त्यासाठी ते स्वता जबाबदार असतात.त्यांचे विचार त्याला कारणीभूत असतात.मी बरोबर हा त्यांचा समज असतो .असे लोक समोरच्याला अजिबात समजून घेत नाही .आणि दुसर्याला दुखी करतात आणि स्वता आयुष्यभर दुखी राहतात .त्याचे खापर मात्र समोरच्या वर फोडतात .अश्या लोकाना कोणी समजावू नाही शकत .
जीवन खूप सुंदर आहे .पण कधी कधी अनेक गोष्टी करायच्या राहून जातात आयुष्यात एक निराशा भरून राहते आपण काही करू शकत नाही याची एक खंत असते .आजून पण आपण काही करू शकतो याची जाणीव होते . .जसा दिवस संपताना सूर्य मावळतो.पण त्याच वेळी मावळतीचे सुंदर रंग आकाशात दिसतात .मन प्रसन्न करून जातात .असाच माझा एक प्रयत्न @असेच-मनातले-काही ....... माझ्या शब्दात #,मावळतीचे रंग
Wednesday, 26 August 2015
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment