Sunday, 30 August 2015

छोटी कथा .

आज उगाच तुझी खूप आठवण झाली .कारण आज फ्रेन्डशिप डे आहे ना ?
मैत्री दिन .........
तुला कॉल केला असता आणि बोलले असते.आज काय आहे माहिती आहे का ?
माहिती असून सुद्धा मुद्दाम बोलला असता ."नाही बाबा मला नाही माहिती आज काय आहे "
मी सांगितले असते आज फ्रेन्डशिप डे आहे.माझे वाक्य पूर्ण होण्या आधीच .म्हणजे काय असते ते? तुझा प्रश्न आला असता.तुला काय बोलायचे हे न समजून मी आपली बोलले असते.आज मैत्री दिन आहे ना .असे म्हणून तुला शुभेछ्या देणार या आधीच तू बोलला असता.मैत्री दिन म्हणजे काय ?काय असतो मैत्री दिन .परत आपले मी न समजून आपले मित्र असतात त्यांच्या साठी असलेला दिवस.
मैत्रीला आहे हे दाखवायला मैत्री दिनाची गरज असते का ?
ते जाउदे मला आधी सांग मैत्री म्हणजे काय ?कोणाला मित्र म्हणायचे ?,मैत्रीची व्याख्या नेमकी काय आहे?एका पाठोपाठ मला बोलू न देता धबधबा अंगावर कोसळावा तसे तुझे प्रश्न माझ्या कानावर आदळले असते.
तुझा एवढी हुशार नाही रे मी.मग माझा गोंधळ होणार मी माझ्या अल्प बुद्धीला जे माहिती ते तुला सांगण्याचा प्रयत्न करणार.
"मित्र तो ज्याला आपण सगळे मनातले सांगू शकतो."मी 
सगळे विचार करून बोलत आहेस ना ?खरच आपण सगळे सांगतो आपल्या "मित्राला सांगू शकतो! .मला नाही हे पटत अश्या अनेक गोष्टी असतात ग ज्या आपण कधीच कोणाला नाही सांगू शकत". .मी तुझा या बोलण्यावर निरुत्तर होते.
तरी बोलते असे काही नाही पण प्रत्येकला वाटते ना आपल्याला एक तरी मित्र असावा.जो आपल्या सुखात आपल्या दुखात साथ देईन.संकटात आपली मदत करेल .
पुन्हा तू यावर बोलला असता.सुखात साथ देणारा म्हणजे काय ?मित्रच काय सगळेच साथ देतात.आणि दुखात साथ देणारा म्हणजे काय ?तू कुठे बघून चालणार पडणार पाय मोडून घेणार आता यात मित्र तुझी काय साथ देणार सांग ."पाय दुखणार होणर्या वेदना तुलाच सहन करायला लागणार मग यात मित्र काय साथ देतो सांग"..उगाच तू आपली पाय बांधून हॉस्पिटलच्या बेडवर पडली आहेस आणि तुला भेटण्यास मित्र येतात काय करतात ग ते ?तुला विचारणार कुठे बघत होती .बघून चालता नाही येत का ?कसे झाले हे सगळे आणि तू सांगत बसणार .याला दुखं वाटून घेणे बोलत असेल तर मला नाही पटत.! तू बोलत राहणार मी फक्त ऐकत राहणार मलाच वाटत राहणार मीच चुकीचे बोलले.
पण मग दुखात मित्राची मदत होते हे कसे नाकारता येणार त्यावर तुझे परत जगा वेगळे विचार ऐकवणार .हो पण मदत कशी काय करावी काय झाले कसे झाले हे न विचारात तर आता काय करायचे हे नुसते भेटणे नाही.तर तुझा जवळ कोण आहे का मी थांबू .औषधे आली का आणू हि मदत पटते का ?बस एवढीच तुझी मैत्रीच व्याख्या का अजून आहे तुझा प्रश्न ...
एक नवरा बायको छान मित्र असू शकतात ना ?मी 
अजिबात नाही नवरा हा नवराच असतो आणि बायको हि बायकोच असते ,
उगाच आपले काही तरी म्हणे नवरा हा मित्र असतो .आणि बायको मैत्रीण .
आता मात्र मला काही बोलणे सुचणार नाही मी शांत बसते.आणि तू छान हसतोस .नन्तर मी हसते का माहिती आहे .तुझे ते खरे हे सांगण्यात तू यशस्वी झालेला आसतो आणि मी माघार घेतलेली असते .मी बोलते ते काही बरोबर हे तुला माहिती असते आणि मला पण ,पण तू बोलत असतानी ऐकात राहावे वाटते .तुझा बरोबर वाद घालू वाटत नाही.
कारण तुझा सहज बोलण्यात अनेक गोष्टीचा नकळत मलाच उलगडा झालेला असतो .आपण दुखी आहे किवा आपल्या वाट्याला दु:ख आले .आणि जर आपल्यला कोणी मदत नाही केली किवा ऐकून नाही घेतले तर आपल्याला राग येतो ना ?मग ते कोणी असो आपले मित्र नातेवाईक त्यांनी आपल्याला दुखात मदत केली नाही म्हणून आपण नाराज होतो पण खरच काय अधिकार असतो आपल्याला त्यांच्या वर नाराज होण्याचा ते कुठे आपल्या दुखां साठी जबाबदार असतात ?
म्हणून तुझा बरोबर वाद घालू वाटत नाही आणि घातला तरी तू शेवटी बर तुझे खरे असे बोलून तूच कसा बरोबर आहे हे मला लक्षात न येऊ देतात पटवून देणार .तुला आवडत नाही तरी मी आज तुला मैत्री दिनाच्या शुभेच्छा देते आहे .
!!!मैत्री दिनाच्या खूप शुभेछ्या!!!
असेच मनातले काही !!आशा !!
२/८/१५

No comments :

Post a Comment