Friday, 9 January 2015

आज आपण अगदी कोणत्या पण घरात मग ते सामन्य ते उच्च वर्गा पर्यंत .
कोणच्या पण घरात म्हणजे किचन जर बघितले तर आपल्याला स्टील ची चकाचक भांडी दिसतील .पण जेव्हा हि भांडी नव्हती म्हणजे सधारणाता ३५ ,४० वर्षा अगोदर {खेड्यात तरी }प्रत्येक घरा मध्ये तांबे पिताळाची भांडी वापरत असत .
आमच्या घरी देखील तांबे पिताळाची भांडी होती ..आणि ती मला घासायाला लागत 
म्हणून अजिबात आवडत नसत .या एकच कामचा मला कंटाळा होता .
सकाळी सकाळी ती तांब्याची आणि पिताळाची मोठे मोठे हंडे घासायला लागत .
नाही तर आईचा ओरडा ....आज ते काही राहिले नाही .आठवणी मात्र आहे .ते विहिरीवर पाणी भरणे .आज घरात पाणी भरायला कंटाळा येतो .
खरे तर मला आठवले जेव्हा स्टीलची भांडी नव्हती तेव्हा .आमच्या गावात शेजारी
राहणर्या एका मुलाचे लग्न झाले .त्याची बायको चौथी शिकलेली आणि खेड्यातीलच
होती पण तिचे कोण नातेवाईक तेव्हा मुंबईला होते .
आणि त्यांनी लग्नात एक स्टीलचे ताट भेट दिले होते .
सगळ्या तांबे पितालाच्या भांड्यात ते छान दिसायचे .
अगदी कसे असते म्हणून अनेक जनी ते बघयला येत असत .
त्या घरात त्या नवीन नवरीला अजून २ दीर होते .
आणि त्यातील एक ते हवे म्हणून हट्ट करत असे त्या वेळी ती नवीन सून
ते लपवून ठेवत असे .
कधी त्याने ते चोरून घेत आणि त्यात जेवण करायला घेत असे
बस ते नवीन सुनेला आवडत नसे मग ती त्यला काही तरी बोलत असे .
अतिशय स्वाभिमानी असलेली त्या सासू एक दिवस खूप वाईट वाटल्या
मुळे त्या मुलाला तिनी सुनेच्या ताटाला परत हात लावशील का म्हणून
काठीने फोडून काढले .खरे तर आपल्यला का मारतात हे त्याला समजत नव्हते .
पण या पुढे अशा हट्ट कधी करयचा नाही हे त्यांनी ठरवले आणि खरच
तशा हट्ट पण कधी केला नाही .
आज सगळी कडे स्टील आहे अगदी त्याच्या घरात पण ...
वेळ बदलते पण मनावरचे घाव नाही जात नाही ?

No comments :

Post a Comment