
आज राष्ट्रीय युवक दिवस। ………
हिंदू धर्माची महती जगाला पटवून देणाऱ्या स्वामी विवेकानंदाची आज जयंती .
स्वामी विवेकानंद म्हणत देवावर विस्वास आहे किवा नाही यापेक्षा युवकांच स्वत:वर विस्वास आहे या वरून त्यांचे व्यक्तिमत्व घडते .
ज्याच्या मध्ये काही करण्याची धमक असते .आकशाला गवसणी घालण्याची जिद्द असते .
अशाच तरुण मुळे समाज आणि राष्ट्र उभे राहते
आज देशाचे नेतुत्व बदल घडवण्यात युवकाचा वाट मोठा आहे .
त्यांना विकास हवा आहे .
पण खरच आज देश पुढे महत्वाची समस्या आहे ती नोकरीची ..
आजचे तरुण शिक्षण घेत आहे दर वर्षी अनेक अलग अलग पदव्या घेवून
लाखो तरुण बाहेर पडत आहे .
शिक्षणा साठी होणारा भरमसाठ पैसा आणि त्या नंतर नोकरी नाही .
अशा वेळी पुढे काय असा मोठा प्रश्न युवका पुढे आहे
अनेक शिक्षण संस्था निघाल्या आहे .मग ते डीएड असो कि इंजिनीरिंग .
दर वर्षी पदव्या घेऊन मुले बाहेर येतात .पण नोकरी नाही मग अनेक
शिक्षण संस्थाना परवानगी का दिली जात आहे
अनेक तरुण शिकले मग त्यांना हलकी कामे करायला लाज वाटते .
आपण आयुष्यभर शेती केली ,रात्रदिवस मेहनत केली आपली मुले
यातून बाहेर पडावेत म्हणून मुलांना शिकवतात .पण शिकून नोकरी नाही
आणि शिकलो म्हणून शेती करायची मुलांना लाज वाटते .
समजा काही शिकून यशस्वी झाले तर ते आपले गाव आपली माणसे
यांना विसरून जातात .आई वडिलांना देखील .
खूप काही करायची उम्मीद असते तरूणा मध्ये पण त्यांची शक्ती
योग्य ठिकाणी वापरली पाहिजे नाही तर मग तरुण दिशा हीन होतात .
वाईट प्रवृत्ती कडे वळतात .
आज अनेक तरुण व्यसनं कडे वळलेले दिसत आहे .आपले आदर्श
विसरले आहे आज विचार करायची गरज आहे आम्ही आमची संस्कृती आणि
आदर्श नुसार वागतो आहे का ?तरच स्वामीजी ची जयंती साजरी केल्यासारखे होईल.
{फोटो-गुगल सर्च }
१२ जानेवारी 15
No comments :
Post a Comment