Friday, 16 January 2015

संक्रात

मला लहान असतानी संक्रात हा सन खूप आवडत असे .
लहान असतानी आपल्यला काय आवडेल सांगता येत नाही .
जवळजवळ ३०ते ३५ वर्षा पूर्वी माडीचे घर गावात असणे म्हणजे .
खूप काही वाटत असे .
आमच्या गावात अनेक जातीचे लोक तेव्हा आनंदाने राहत असत .
त्यातच नोकरी करणारे बाहेरून आलेले .आणि मारवाडी समाजाचे लोक देखील
भरपूर .मग आमच्या कडे दोन गल्य्यात काही एक मजली तर काही दोन मजली
घरे होते .लहान असतानी एक उत्सुकता असे या घरातून खाली बघतानी कसे वाटत
असेल.{आज नको वाटते असे }
मग संक्रातीच्या सन असला कि अशा घरी जाता येत असे .
एकदा संध्याकाळ झाली कि आम्ही सगळे लहान मुले एकत्र जमत .
आणि गावातील प्रत्येक घरात जात असू .तेव्हा खूप माणुसकी असलेले लोक
होते .सगळे जसे आमची वाट बघत असल्या सारखे आम्हला तिळगुळ देत असत .
मग त्यांच्या पाय पडणे .आज मात्र असे प्रेमाने पाया पडावे असे मात्र कोणी नाही
ते साखरेचे तीळ तेव्हा खूप आवडत असत .
खरे तर शेतकरी असल्या मुळे घरचे तीळ{काळे } तर आज जे लाडू बनवले
जातात .सफेद तीळ त्याला आमच्या कडे हावरी म्हणतात भरपूर असत .
पण तेव्हा लाडू कसे बनवतात हेच माहित नसल्या मुळे फक्त तीळ भाजून
गुळ टाकून खाल्ले जात .त्या मुळे साखरेच तीळ खूप आवडत असत .
आज घरी स्वता लाडू बनवत असून देखील त्या लहान असतानाची घरोघर
फिरून तीळ जमवण्यात एक अलग मजा होती ..
मोठ्याच्या पाय पडणे .पण आज ते काहीच राहिले नाही .
असे वाटते परत लहान होवे आणि परत ते बालपण आठवावे .

१५ जानेवारी २०१५ 

No comments :

Post a Comment