कोणीच कोणाचे नसते. हे वाक्य आपण नेहमी ऐकतो .
याचा अर्था काय ? म्हणजे आपण असा समज करतो . ."आपण आहे कोणा साठी " या मुळे आपल्याला काही वेळे साठी समाधान मिळत असेल का ? विचार केला तर सगळेच एकटे असतात . काही माणसा साठी लिहिण्यास शब्द कमी पडतील अशी माणसे असतात . आपले नशीब असते जेव्हा ती आपली असतात . कोणत्या गोष्टीची किमत ती दूर गेल्यावर कळते . आपल्या आयुष्यात असेच होते ना . अनेकदा काही गोष्टी आपल्या जवळ असतात .तेव्हा त्याची किमत नसते . खोट्या अहंकारा मुळे आपली अनेक नाती अशीच दूर जातात . मग आपण आपल्या चुका शोधण्या पेक्षा "कोणीच कोणाचे नसते" असे बोलून आपले समाधान करतो . कधी कधी कोणी पण नको असे आपल्याला वाटते . एकटे राहावे .स्वताच स्वतला शोधावे . असा वेळी आपल्यालाही समजते .आपण देखील कोणाचे असतो का ? |
जीवन खूप सुंदर आहे .पण कधी कधी अनेक गोष्टी करायच्या राहून जातात आयुष्यात एक निराशा भरून राहते आपण काही करू शकत नाही याची एक खंत असते .आजून पण आपण काही करू शकतो याची जाणीव होते . .जसा दिवस संपताना सूर्य मावळतो.पण त्याच वेळी मावळतीचे सुंदर रंग आकाशात दिसतात .मन प्रसन्न करून जातात .असाच माझा एक प्रयत्न @असेच-मनातले-काही ....... माझ्या शब्दात #,मावळतीचे रंग
Sunday, 25 January 2015
कोणीच कोणाचे नसते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment