Thursday, 8 January 2015

आज एक फेसबुक फ्रेंडची पोस्ट वाचली कि लोक नेहमी विचारतात लग्न कधी करणार 
त्या वरून मला आठवले .
माझे लग्न होऊन आज २० वर्ष झाले .त्यातून मी खेड्यातील म्हणजे त्या काळी मुलीचे 

लग्न १६ ते १८ मध्ये होऊन जात असत .गावात १० वी पर्यंत शाळा होती 
म्हणजे मुलीनी फक्त १० वी पर्यंत शिकायचे बस झाले आणि मग लग्न ...
माझ्या अनेक मैत्रिणीचे लग्न अठराच्या आता झाले .पण मला वडिलांनी पुढे शिकवायचे 
ठरवले .अर्थात याचा आईला विरोध होता .
मग काय मी सगळ्या मैत्रिणीचे लग्न झाले .आणि अर्थात लवकरच त्यांना मुले पण झाली
मग सुरु झाले गावातील लोकांचे टोमणे ,कधी लग्न करते ,कधी लाडू देते ,
अगदी काही असे होते ते मला जणू काही त्यांची डयुटी असल्या सारखे रोज विचारात .
त्या मध्ये प्रेम नव्हते तर एक प्रकारे टोमणे असत .
हे कमी कि काय म्हणून तुझे वडील तुझा लग्न करणार नाही म्हणून ते शिकवण्याचे नाटक 

करतात असे टोमणे सुधा असत .
हिला किती मुले झाले तिला किती मुले झाले हे ऐकवत असत .
खरच तेव्हा मला एक प्रश्न पडत असे खरच का लग्न करायचे ?
आज देखील परस्थिती तसीच आहे ..........
नाही का ?
का करायचे लग्न ?
तर समाज तुम्हाला सुखाने जगू देत नाही म्हणून ......
तुमचे लग्न होत नाही म्हणजे तुमचा काही प्रोब्लेम आहे अशा एक समज ...
म्हणून लग्न का करावे .....
तुमचे मत काय आहे ???

No comments :

Post a Comment