Friday, 16 January 2015

मुली असणे हा गुन्हा आहे का ???

आज सकाळी बातम्या बघत असतानी दोन बातम्या बघून मन खूप दु:खी 
झाले .आणि मनात प्रश्न आला खरच मुली असणे हा गुन्हा आहे का ???
एक बातमी होती मुलीने छेडछडीला कंटाळून -आत्म्हत्याचा प्रयत्न केला .
आणि आता ती कोमात असून हॉस्पिटल मध्ये आहे .
खरे तर त्या मुलीच्या आईं वडिलानी पोलिसांमध्ये जाऊन तक्रार करण्याचा 
प्रयत्न केला होता .पण त्या वेळी पोलिसानी काही कारवाई केली नाही .
परिणाम आज समोर आहे .
दुसरी बातमी होती संस्कृती रक्षणाच्या नावा खाली एक प्रेमी जोड्याला
मारहाणीचा .आणि त्याचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केल्याचा
खरच तो व्हिडिओ बघून मनात आले खरच या लोकांना असे
करातांनी या जागी जर आपली बहिण असती तर असे का मनात
आले नाही .एका मुलीवर हात उचलून यांना काय दाखवायचे होते .
हे खरच संस्कृती रक्षण करणारे होते ना मग यांनी त्या मुलांना
पोलीस मध्ये द्यायला हवे होते .किवा त्यांच्या आई वाडीलाच्या
ताब्यात द्यायला हवे होते .
हे सगळे होऊन जाते पण कोणी विचार केला आहे का ?
अशा घटना नन्तर त्या मुलीच्या मनावर काय परिणाम होत
असणार .तिची चूक हि कि ती मुलगी आहे .
अनेकदा समाज जशा कारणी भूत असतो तसे पोलीस देखील .
वाढता दहशतवाद रोज अनेक तास काम या मुळे पोलिसची चिडचिड
एखादी केस नोदवली जाते त्या मागे येते मग खूप सारे पेपर वर्क
अनेकदा अनेक पोलीस मग फक्त समजावून पाठवून देतात .
त्याचा परिणाम अशा होतो .अनेक कर्तव्यदक्ष लोक पण मग यामुळे बदनाम होतात .
पण अशा गोष्टी फक्त पोलिसावर न सोडता आपण पण फक्त बघ्याची भूमिका घेता कामा नाही .
नाही तर अनेक मुली "आम्ही मुली आम्ही आहे हा आमचा गुन्हा आहे का "
असे विचारातील नाक्कीच

16 जानेवारी २०१५

No comments :

Post a Comment