Thursday, 8 January 2015

केस आता खूप छान दिसतात नाही का मम्मी ......
आरशात बघत मुलगी बोलली .
ती फक्त हसली आणि हो बोलली .
तसी मुलगी जवळ आली आणि बोलली "मला नव्हते वाटले तू 
मला केस कापयाला परवानगी देशील "
खरच मला तुझे कधी कधी नवल वाटते .तू मला एखादी गोष्ट करू देणार
नाही .पण अनपेक्षित पणे तू मला परवानगी देते .
ती पुन्हा फक्त हसली .आणि विचारात हरवली ....
तिला खूप काही करावे वाटत असे ,बाकी मुली सारखे छान राहावे फिरावे .
पण नेहमी "मुलीनी असे वागू नाही मुलीनी तसे वागू नाही "
हेच ऐकायाला लागत आसे.
आईला आवडत नाही मग आई चिडते मग ते नाही करायचे .
भावाला हे आवडत नाही मग ते नाही करायचे .
हळू हळू तिनी तिच्या आवडी निवडी कधी सोडून दिल्या तिला नाही समजले .
सगळ्याचे ऐकते म्हणून तीला सगळे समजदार म्हणत ...
पण या मध्ये कुठे तरी आपले आयुष्य लग्ना नंतर नक्की बदलणार
मग करू आपण जे वाटते ते ..
ते एक स्वप्न स्वप्नच राहिले .आधी आईला आवडता नाही म्हणून मनातले
मनात ठेवले .आज तेच नवरयाला आवडत नाही म्हणून .....
अग कुठे हरवली ? मुलीच्या आवाजाने ती भानावर आली .
काही नाही ग "उद्या तुझे लग्न होईल मग काय माहित तुला हे सगळे
करता येईन का नाही म्हणून "
पण तू आजची मुलगी आहे आणि आजच्या मुली तडजोड नाही करत .
त्या त्यांना हवे तसेच जगतात .
हो ना ?
नाही असे नाही पण परस्थिती नुसार जगायचे असते .
मुलगी बोलली .
ती फक्त पुन्हा हसली ....

No comments :

Post a Comment