अभंग म्हटले कि लगेच डोळ्या समोर येतात ते आपले संत ,
मग आठवतात ते "तुका म्हणे ज्ञाना म्हणे ...
म्हणजे देहू आणि आळंदी .
पंढरपूरला जाणारे देहू आणि आळंदीला जातातच जातात .
साधारणत २० ते २२ वर्षा पूर्वी आमच्या गावा कडे हा.भ .प लहवित कर महाराज
किर्तना साठी येत असत तेव्हा ते नेहमी तुकाराम महाराजाचे गाथा मंदिर बांधायचे
आहे.हे सांगत असत .
पुण्याला फिरायला गेलो आणि ठरवले आळंदी तर बघितले आहे देहू बघून जाऊ .
संध्याकाळ ५ वाजायला आले होते .आळंदी मधून प्रवासी जीप मधून देहू कडे निघालो
अचानक पावसाचे वातावरण झाले .
जून महिन्याचा पहिला आठवडा होता . .
पहिला पाऊस त्या मुळे जोराचा वारा सुटला .आणि पावसाला सुरवात झाली .
मस्त मातीचा वास सुटला होता .थंडी वाजत होती.
देहू मध्ये उतरलो तर पाऊस नव्हता पण वातावरण मात्र मस्त होते .
मंदिरात गेलो आणि बाहेर पावसाला सुरवात झाली .
खरे तर भिजलो होतो त्यामुळे आता येथेच राहू हा विचार केला .
जुन्या मंदिर पासून गाथा मंदिर १ कि.मी .एवढे दूर आसवे .
छान पावसाचे वातावरण होते चालत निघालो पण पुन्हा पाऊस आला .
आता अंधार झाला होता राह्यला रूम भेटणार का नाही हा पण मोठा
प्रश्न होता .पावसा मुळे आणि वाऱ्या मुळे लाईट गेल्या होत्या .
खूप अंधार होता .
भक्ती निवास मध्ये रूम बघयला गेलो .खरे तर तेव्हा भक्ती निवास नवीन बांधले होते .
पण आमची हालत बघून आम्हला रूम दिला .
थंडी आणि दिवसभराची दगदग त्यात लाईट नाही त्यामुळे झोपून गेलो .
सकाळी ६ वाजता उठलो आणि बाल्कनीत जाऊन बघितले आणि बघतच राहिलो .
किती सुंदर मंदिर ..
पटकन सगळे आवरून आम्ही मंदिरात गेलो .पाऊस पडून गेला होता .
सकाळची वेळ कोणी नव्हते .मंदिराच्या बाहेर एक काका हातात तंबोरा घेऊन अभंग म्हणत होते नकळत वडिलांची आठवण झाली .वडील वारकरी असल्या मुळे नेहमी घरात अभंग चालू असत .मंदिरात गेलो सगळी कडे भिंतीवर अभंग लिहिले आहे खूप छान .पाठीमागे वाहणारी इंद्रायणी आणि येणारा छान गार वारा खूप छान वाटत होते .तिथून निघावे वाटत नव्हते .बाहेर आलो आणि एका टपरी वजा छोट्या दुकनात चहा आणि मिसळ घेतली .मंदिराच्या माघील इंद्रायणी नदीवर गेलो .
नदीच्या किनाऱ्यावर हिरवी शेते मनाला मोहून टाकत होते .
आजूबाजूला कोणी नाही सगळीकडे शांतात .तिकडे बसून रहाव वाटत होते .
परत निघायला हवे होते .
पुन्हा चालत १ कि मी .तरी पण खूप प्रसन्ना वाटत होते .रस्त्यात परत एक मंदिर
जिथे गाथा बुडवल्या होत्या असे समजले .
थोडा वेळ तिकडे बसलो आणि पुण्याला जाणाऱ्या बस पकडली
(३ जून २०१३)





No comments :
Post a Comment