घड्याळे
सकाळी उठल्या पासून तर झोपे पर्यंत फक्त घाई आणि घाई असते .सकाळ होते तीच मुळी घड्याळाच्या गजर मुळे .{आता मोबाईल अलार्म }आपोआप जाग येणारे खूप कमी नशीबवान आहेत आजच्या जमान्यात .याला अपवाद गावाकडील लोक आणि वयस्कर व्यक्ती आहेत .म्हणजे आपण आता बाहेर सूर्य उगवला आहे का ? बाहेर काळोख आहे कि उजेड हे बघायची गरज नसते ,दिवस सुरु होतो तोच मुळी घड्याळ बघून .घड्याळ आज सगळ्यांची गरज आहे .मग ते हातातील असेल नाही तर भिंतीवरील असेल .मोबाईल मुळे हातातील घड्याळा चे महत्व कमी झाले असले तरी देखील आज घड्याळ एक फ्याशन म्हणून घातले जाते त्या मुळे मार्केट मध्ये एका पेक्षा एक सुंदर घड्याळे येत असतात .
पण एक काळ होता जेव्हा रिकू आणि एच एम टी कंपनीचे घड्याळे बाजारात होती .अतिशय महाग असणारी हि घड्याळे मात्र खूप चालत असत .चावीची घड्याळे रोज सकाळी उठले कि अगोदर घड्याळाला चावी देऊन नंतर कामांना सुरवात होत असे .भिंतीवरील ठोक्याची घड्याळे तासातासाला एवढे वाजले हे सांगत असे ..आज सहज घेऊ शकणारे घड्याळे तेव्हा सगळ्यांना घेणे परवडत नव्हते .मला आठवते मी लहान असतानी लग्नात हुंड्याची मागणी करतांनी हातातील किवा भिंतीवरील घड्याळ सुधा मागितले जात असयाचे .परंतु गावाकडे सावल्या बघून आणि रात्री चंद्र तारे बघून आज देखील काही लोक
अचूक वेळ सांगतात .मी सुद्धा शाळेत असतानी अनेकदा घरच्या ओट्यावर कित सावली आली हे बघून शाळेत जात असे .ते पण अगदी अर्धा तास असो किवा एक तास अगदी वेळा पाठ झाल्या होत्या .१० विला गेलो तरी माझ्या सारख्या अनेका कडे तेव्हा घड्याळे नव्हती .पेपर लिहीतानी पण नाही .. मुंबई म्हटले कि फक्त आणि फक्त घड्याळ बस ,जे काही चालते ते सगळे घड्याळावर चालते .म्हणून तर म्हणतात ना
"मुंबई हि घड्याळाच्या काट्यावर फिरते ."
{आधीच्या कंपन्या खूप चांगली घड्याळे बनवत असत ,आणि ती अनेक वर्ष चालत हेच कारण असेल का त्या आज बंद पडल्या आहे .आजचा जमाना युज आणि थ्रो चा आहे नाही का ?}

chaan....!
ReplyDelete