आज अक्षय तुतीया .
अक्षय्य तृतीया हा महत्त्वाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो.या दिवसी कोणते शुभ काम सुरु केले जाते.पण आज काल हा दिवस म्हणजे फक्त सोने
खरेदीचा दिवस समजला जाते .कोणत्या बातम्याच्या chanal वर बघा ,तेच दाखवतात .
माझे नॉन मराठी शेजारी मला विचारतात "सोना खरीदने का दिन कब है !"
पण आमच्या लहान पणी गावा कडे मात्र असे काही नव्हते .आपले पूर्वज गेलेले असतील
त्यांची आठवण म्हणून छोटी मातीची घागर विकत घेतेली जात असे .त्यावर छोटे मडके असायचे
याला गावाकडे केळी आणि करा असे बोलतात .या दिवसी फक्त लाल मातीची घागर घेतेली जात असे ,का ते नाही माहिती नाही {,मी कधी पण काळ्या रंगाची केळी {घागर } नाही बघितली .मोठे माठ मात्र काळे असतात} .त्यात पाणी भरून ठेवतात .
काही तरी गोड बनवले जात असे ,नैवद्य म्हणून .खरे तर शेतातील सगळे काम संपलेले असे .अश्या वेळी येणारा हा सन आहे .त्या मुळे खूप लग्न असतात या दिवसी कुठे कुठे जाणार असे होऊन जात असायचे .उन्हातून आले कि मग या घागरीतील पाणी पिले जात असे .मातीचा वास आणि थंड पाणी एक वेगळी चव असत असे .
अजून एक काम केले जात असे या दिवसी ते म्हणजे झाडे लावणे ,किवा वेलीचे बी टाकणे .
मग त्यात भोपळ्या पासून .कारल्या पर्यंत सगळे बी असे .या दिवसी लावलेल्या वेलीला खूप .डांगर म्हणजे लाल भोपळे असो नाही तरी दोडका नाही तर घोसाळी खूप येत असत .
हा अनुभव मी खूप घेतला आहे .
आजच्या दिवसा नंतर प्रत्येक घरी करा आणि केळी दिसत असे .अगदी शेतात घेऊन जाण्यासाठी सुद्धा ......
गावाकडच्या आठवणी .

No comments :
Post a Comment