खरच आजची मुले चुकत आहेत का ?
मनात आलेले आणि काही अनुभवलेले असे आज काही लिहित आहे .
अनेकांना कदाचित ते आवडणार नाही .
आज मोठ्या प्रमाणात जाणवणारी समस्या वृद्धाची ....
हा विषय अनेकदा येतो ,आजची मुले आई वडिलांना बघत नाही ...
पण का ?
अनेकदा वृद्ध लोकांच्या बाजूने जास्त बोलले जाते .कारण एक विशिष्ट वयानुसार
काम होत नाही आजार पण वाढलेले असते तेव्हा गरज असते त्यांना आपल्या माणसाची .
तेव्हा जर त्यांना त्यांची मुले बघत नसतील तर ..
सगळी सहानुभूती त्यांच्या कडे जाते आणि मुले व्हिलन ठरतात .
पण खरच सगळे आईबाप बिचारे असतात का ?
आणि सगळी मुले निष्टुर असतात का ?
जसे टाळी एक हाताने वाजत नाही तसेच या मध्ये देखील होते .
आधी एकत्र कुटुंब पद्धती होती आईवडील त्यांच्या आईवडिलांना मान देत
असत ,तर आईवडिला पेक्षा आजीआजोबा जास्त जवळचे वाटत .
लहन मुले खेळून आली किवा शाळेतून आली आई बाबा कामात असतील तरी
आजीआजोबा नेहमी असत .एक मायेचा धागा आपोआप तयार होत असे .
आईवडिलांना बघितले पाहिजे हे संस्कार होत असत म्हणून आधीच्या काळी
वृद्धाची काळजी घेतली जात असे .
काळ बदलला ,एकत्र कुटुंब पद्धती गेली ,त्याचे कारण जास्त करून नोकरी
हे होते .घरातील एक मुलगा जर बाहेर गेले कि त्याची बायका मुले त्याच्या बरोबर
जात असत .मग घरातील जबाबदारी कधी घ्यायची कधी नाही हे सुरु झाले .
नकळत त्याचा असर जे घरी राहत त्याच्या वर होऊ लागला .आम्हीच का सगळे करायचे .
हे मुद्दे उठू लागले .हे एक कारण होते बदलाचे . .
तर काही घरात उलट घडते मुले चांगले असतात संस्कारी असतात .आई वडिलांचा खूप आदर करतात
.आपल्या बायकोने त्यांना स्वताच्या आई वाडीला सारखे सांभाळावे
अशी त्याची अपेक्षा असते .नवीन आलेली ती मुलगी प्रयत्न देखील करते .
परंतु सुनेला आपल्या मुली सारखे मानयला काय सासू सासरे तयार नसतात .
मग कारण नसतानी त्रास देणे सुरु होते .आपली बायको चुकत नाही हे मुलाला दिसत असते .
मग तो बायकोची बाजू घेतो .त्याला वाटते हि आपले आईवडील घरदार
सोडून आपल्या साठी आली आहे .परंतु अशी बायकोची बाजू घेणे आईवडिलांना
पटत नाही .मग सुने बरोबरच मुला बरोबर वाद सुरु होतात .बायकोचे ऐकतो ,
म्हणून त्याला ऐकयला लागते .अगदी "बायकोचा बैल झाला हे सुद्धा "
काही दिवस मुलगा दुर्लक्ष करतो पण कुठे तरी दुखावला जातो .नाविलाज
होतो आणि वेगळा राहायला लागतो .बायकोचे ऐकून गेला म्हणून लोक त्यालाच
नाव ठेवतात .
अनेकदा वडील व्यसनी असतात ,लहान पणी मारणे ओरडणे अशा गोष्टी मनावर कायमच्या घर करून असतात
या मुळे बापा बद्दल आदर राहत नाही .
अनेक आईबापानी मुलांना खूप कठीण परस्थिती मध्ये शिकवलेले असते .पुढे जाऊन मुले बघत नाही .हो असतात अपवाद काही .परंतु आम्ही तुझा साठी हे केले ते केले हे सारखे ऐकवत असतात .तर काही मुले आपल्या आईवडिलांना बरोबर ठेयायला तयार असतात .पण आईबापच तयार नसतात .आम्ही बरे आमच्या घरी असे बोलतात .मुले मोठे होतात त्यांना त्यांचा संसार असतो हे काही आई वडील समजून घेत नाही .मुलाचे लग्न झाले आता त्याला त्याच्या मत प्रमाणे जगू द्यावे .पण अनेकदा छोट्या छोट्या गोष्टी मध्ये हस्तक्षेप करता राहतात .मी तर असे बघितले आहे .अगदी नातू मोठे झाले तरी मुलाला आणि सुनेला काही करतांनी आधी आईवडिलांना विचारायला लागते .
मुद्दाम बाहेरचे कोणी आले कि खायला मागणे ,दुखणे खूप आहे म्हणून आरडा ओरड करणे .मग बाहेरून येणर्या व्यक्तीचा समज होतो या घरात वयस्कर माणसाची काळजी घेतली जात नाही .सुनेने किती चांगली व्यवस्था ठेवली तरी तिचा बद्दल चांगले न बोलणे .अनेक घरात दोघे नवरा बायको काम करतात .घरे लहान असतात .अश्या वेळी त्यांना हि वयस्कर माणसे समजून घेत नाही .आज शहरात मोठा प्रश्न आहे तो जागेचा .त्या मुळे अनेकदा मनात असून सुद्धा आई वडिलांना बरोबर ठेवू शकत नाही .दोघे नोकरी करणारे असतील तर त्यांना कोण बघणार हे कारण असते मग वृद्धा आश्रमात ठेवले जाते .
खूप गोष्टी आहे .सगळे कधी न कधी म्हातारी होणार आहे .आपण सुद्धा...
आपली मुले आपल्यला सांभाळतील याची अपेक्षा करू नका .आपणच आपल्यला कसे जगता येईन हे बघा .आपल्यला जमेल तेवढे आपल्या घरातील वृद्धाची काळजी घेऊ या .
उद्या आपली मुले तुम्ही कुठे तुमच्या आई वडिलाना बघितले होते असे म्हणता कामा नये
नाही का
१ एप्रिल १५

No comments :
Post a Comment