Sunday, 12 April 2015

जमाना बदल गया है


आता उन्हाळा सुरु झाला ना ....
उन्हाळा म्हणजे सगळ्यात जास्त गरज असते ती पाण्याची .....
पण आज कुठे गेले तरी पाण्याची बाटली सहज मिळते ना ?
मग ती बिसलरी असो नाही तर कोणती पण ,ज्यांची ती विकत घेण्याची ऐपत नसते 
ते रिकामी बाटली तरी उपयोगाला आणतात .म्हणजे आज सहज आपण कुठे पाणी घेऊन जाऊ 
शकतो .कधी काळी पाण्याचा धर्म असतो असे बोलले जात आणि कधी कुठे पाणी माघितले तरी लगेच मिळत असे .पण आज माघितले तर मिळेलच असे नाही .कधी काळी जेव्हा बाटल्या नव्हत्या तेव्हा वापरली जात असे ती वाटर ब्याग .जास्त माणसे असतील तर मोठी वाटरब्याग आत मधून अलुमिनियामची असे आणि बाहेरून कपडा ज्या मुळे पाणी थंड राहत असे .आता त्याची गरजच नाही ?राहिली नाही का ?
काही दिवसा पूर्वी आम्ही गाणगापूरला गेले होतो .अक्कलकोट वरून दुपारी जेवण करून निघालो .
निघातानी भरपूर पाणी घेतले होते पण जेवणे झाले होते त्या मुळे रस्त्यात पाणी संपले .
कुठे हॉटेल पण दिसत नव्हते .रस्त्याच्या कडेला एक वस्ती दिसली विहीर होती .सगळे उतरले तिकडे गेले .कदाचित त्यांना मराठी काळत नसावे म्हणून खुणाने सांगितले पाणी हवे पिण्यास ,
परंतु तिथे असलेली व्यक्ती ने जवळच्या हौदा कडे इशारा केला .तिथे कदाचित गाई साठी पाणी असावे खूप घाण होते ते पाणी बघूनच समजत होते पिण्याचे नाही आहे .
आम्ही त्याला परत बोललो पिण्यास हावे आहे .परत तो थंड पणे तिकडे आहे बोलला .आणि घरात निघून गेला .त्याला मराठी समजत होते तर .खूप वाईट वाटले शेवटी २० कि .मी पुढे गेलो एक छोटे हॉटेल भेटले तिथे पाणी भेटले .
उगाच मनात आले आमचे मराठी लोक नसते असे वागले .
आमचे घर दोन रस्त्या मध्ये होते .त्या मुळे दिवसभर कोणी न कोणी पाणी मागायला येत असे .
बाजार असले तेव्हा तर किती पाणी भरले तरी कमी पडत असे मग अर्धा कि .मी वरून पाणी आणायला लागे ते पण भर उन्हात ,पण तरी कधी काही तक्रार नसे .आता जुने लोक पण बदलले
आता बाटल्या आल्या आणि कोणा कडे पाणी मागयाची गरज संपली .आणि एक आपुलकीचे नाते पण संपले .

असेच मनातले  काही {माझ्या फेसबुक पोस्ट }

No comments :

Post a Comment