Thursday, 23 April 2015

"द लास्ट बुक "

"द लास्ट बुक " 
पुस्तक दिनाच्या निम्मिताने ......
गेले २१ वर्षा पासून मी मुंबई वरून गावी जातानि कधी कसारा ट्रेन नाही तर नाशिक रोड ट्रेन .
असाच प्रवास चालू आहे.कसारा दोन सव्वा दोन तासाचा प्रवास तर नाशिक हा साडे चार तासाचा प्रवास,या प्रवासात नेहमी बरोबर असते कोणते ना कोणते पुस्तक.मीच नाही तर काही वर्षा पूर्वी 
अनेक जण प्रवासात पुस्तके वाचतानी दिसत असायचे .
पण आता हे चित्र दुर्मिळ होत चालले आहे.आज काल सगळे ट्रेन मध्ये मोबाईल मध्ये बिझी असतात.नाही तर कानात ईयर फोन घालून बसलेले दिसतात.कोणाला कोणा कडे बघायला वेळ नसतो.लोकलच्या गर्दीत धक्के बुक्के खात पुस्तकात डोके घालून बसणारी हि मंडळी गेली कुठे असा प्रशन पडतो.
आता शब्द कोडे सोडवणारे दिसत नाही.आता दिसतात गेम खेळणारे,पेपर वाचणारे दिसत नाही.आता पेपर पण नेटवर असतात.मागे नेटवर एक फोटो प्रदर्शनाची जाहिरात बघितली होती.त्यावर एक पेपर मध्ये पण वाचले होते.ते प्रदर्शन होते "द लास्ट बुक "या छायाचित्राचे,
रेनीअर गेरीत्सन या छायाचित्रकाराने ते भरवले होते.आजच्या स्मार्ट फोन च्या जमान्यात छापील
पुस्तके जास्त टिकतील का नाही असा प्रश्न त्यांना पडला. त्या साठी जवळ जवळ तीन वर्ष त्याने
दिवसातील ठराविक वेळेत त्याने मेट्रो ,रेल्वे सब वे रेल्वे स्टेशन्स येथे त्याने जी वाचकांची पुस्तके वाचत असतानी फोटो काढले.नशिबाने त्याला असे वाचक भेटले.काही काळाने भेटतील का नाही माहिती नाही
.२३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन आणि जगप्रसिध्द साहित्यिक शेक्सपिअरचा जन्मदिन आणि मृत्यूदिनही! पुस्तका सारखा दुसरा मित्र नाही.
वाचाल तर वाचाल आधी पुस्तक वेडे होते आता मोबाईल वेडे आहेत.

फोटो -गुगल सर्च 

No comments :

Post a Comment