एप्रिल मे सुरु झाले कि सुरवात होते ती बेगामिचे पदर्थ करण्याची ...मुंबई सारख्या ठिकाणी जागेचा प्रश्न असतो .काही बनवले तर ते कुठे वाळवायचेहा प्रश्न असतो .पण खेड्यात आज देखील वर्षभर लागणारे पापड कुरड्या .लोणचे हेघरी बनवले जातात .त्यातच एक प्रकार असतो तो म्हणजे सांडगे .....नाशिक नगर भागात मुगाच्या डाळीचे सांडगे बनवले जातात .
तिकडे त्यांना वडे बोलतात .
एकदम सकाळी सकाळी सालीची डाळ भिजत घातली जाते .तीन ते चारतासाने ती धुतली जाते .सगळे साले निघून गेली का मग काही वेळ ठेवून ती डाळ पाट्यावर वाटली जाते .त्यात जिरे लाल मिरची पावडरआणि लसूनवाटून टाकला जातो ..आज काल अशी ओळी डाळ वाटण्याची मशीन देखील आली आहे .डाळ वाटून झाली कि सुरवात होते ते सांडगे घालण्याची .मोठी लाकडी फळी किवा प्लास्टिकच्या मोठ्यापेपरवर सांडगे घातले जातात .हातात थोडे पीठ घेऊन छोटे छोटे वडे भरभर घातले जातात .सवयीने ते जमते .
चवीला अतिशय छान लागते हि भाजी ..काही ठिकाणी चना डाळीची देखील सांडगे घालतात .सांडगे {वडे } भाजी अशी करतात .सांडगे अगोदर मंद आचेवर भाजून घायचे ,लालसर झाले कि थोडे तेल टाकायचे
आणि बाजूला कडून ठेवायचे .तेलाची फोडणी करून त्यात कढी पत्ता.कोथांबीर आणि आवडीनुसार कांदा टाकायचा व त्यात भाजलेले वडे टाकायचे .मिरची पावडर ,हळद ,मीठ आणि शेगदाणे
एकदम सकाळी सकाळी सालीची डाळ भिजत घातली जाते .तीन ते चारतासाने ती धुतली जाते .सगळे साले निघून गेली का मग काही वेळ ठेवून ती डाळ पाट्यावर वाटली जाते .त्यात जिरे लाल मिरची पावडरआणि लसूनवाटून टाकला जातो ..आज काल अशी ओळी डाळ वाटण्याची मशीन देखील आली आहे .डाळ वाटून झाली कि सुरवात होते ते सांडगे घालण्याची .मोठी लाकडी फळी किवा प्लास्टिकच्या मोठ्यापेपरवर सांडगे घातले जातात .हातात थोडे पीठ घेऊन छोटे छोटे वडे भरभर घातले जातात .सवयीने ते जमते .
आणि बाजूला कडून ठेवायचे .तेलाची फोडणी करून त्यात कढी पत्ता.कोथांबीर आणि आवडीनुसार कांदा टाकायचा व त्यात भाजलेले वडे टाकायचे .मिरची पावडर ,हळद ,मीठ आणि शेगदाणे
पावडर टाकून आवश्यक तेवढे पाणी टाकायचे .भाजी सुकी आणि रसा असलेली दोन्ही करता येतेकांदा खोबर्याचे वाटण घालून देखील काळ्या मसाल्याची हि भाजी छान होते
.
.

No comments :
Post a Comment