Monday, 20 April 2015

कारण

सकाळी सकाळी मोबाईल वर संदेशचा मेसेज आला .
सागर  "इज नो मोर "
काही समजण्या आधी मोबाईल कधी हातातून पडला समजले पण नाही .
आई आवाज ऐकून माझ्या खोलीत आली .
काय झाले ?
मला तर काय  बोलावे समजत नव्हते .
आई ! सागर गेला .
काय कसा ?काय झाले त्याला ?
आईचा पण विस्वास बसत नव्हता .
आई सागरने आत्महत्या केली .त्यांनी घरात गळफास घेतला .
का केले त्याने असे ? प्रश्न आणि फक्त प्रश्न .
मी भरभर कपडे केले आणि निघालो .
सागरच्या घरा समोर खूप गर्दी होती .
सगळ्यांना एकच प्रश्न पडला होता .सागर आणि आत्महत्या 
काय झाले असेल का केली असेल हाच प्रश्न .
सागर आमच्या गावातील हुशार मुलगा होता .लहानपणीच वडिलांचे 
छत्र हरवलेला .आईनेच त्याला वाढवले .आई त्याच्या साठी सगळे काही होती .
गावात एक छोटे घर आणि शेती होती .परंतु सागर खूप हुशार होता .
सगळ्यांना मदत करणारा ,शिक्षकांचा आणि सगळ्या मुलांचा तो आवडता होता .नावा प्रमाणे विशाल मनाचा होता .कधी कोणाशी भाडंण  नाही .वाद नाही .दहावीला पूर्ण जिल्ह्यात प्रथम आला होता .शिष्यवृत्ती भेटली आणि इंजिनियर झाला .सरकारी बांधकाम खात्यात नोकरी भेटली .
स्वताच्या गावात बदली करून घेतली .गावात पाण्याची कायम व्यवस्था 
व्हावी म्हणून गावातील नदीवर धरणाचे काम चालू केले होते आणि  ते पूर्ण झाले होते त्याला अजून महिना पण झाला नव्हता .सगळा गाव खुश होता सागर वर .
तीस वर्षाचा झाला तरी तो लग्नाचे नाव घेत नव्हता .आमच्या सगळ्या 
मित्रांचे लग्न झाले होते .नोकरी होती छान घर बांधले होते .मग सागर का 
लग्न टाळत होता.हे  कधी आम्हा मित्रांना पण समजले नाही .त्याचे कोणावर प्रेम देखील नव्हते .अनेक मुलींनी त्याच्या बरोबर मैत्री करायचा 
प्रयत्न केला होता .पण  त्याने फक्त मैत्री ठेवली होती .तो नेहमी खुश राहणारा सागर असे काही करेल कोणाला पटत नव्हते .
सागर गेला खूप प्रश्न सोडून ,त्याचे उत्तर कोणा कडे नव्हते .त्यांनी 
आत्महत्या करतांनी जी चिट्ठी लिहिली होती त्यात लिहिले होते .
"आई मला माफ कर तुला सोडून जातो आहे .पुन्हा पुन्हा तुझ्या पोटी जन्म घ्यायला आवडेल मला ,या जन्मात आपली एवढीच साथ "
माझ्या मृत्यूस कोणास जबाबदार धरू नाही .
काही कारण नाही काही नाही .सागरच्या आत्महत्याचे कारण त्याच्या बरोबरच गेले .
या गोष्टीला पाच वर्ष होऊन गेले आहे .आम्ही मित्र गाव वाले त्याच्या आईला होईल तेवढी मदत करत असतो .
आज त्याच्या आईचा फोन आला .घरी येऊन जा .
रात्री त्यांच्या घरी गेलो .काय काम असावे हा विचार करतच .
फक्त मी नाही तर सागरचे आम्ही सगळे मित्र आले होते .
सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न होता .सागरच्या आईने का बोलावले असेल ?
शांतता होती खूप ....
सागरची आई आली .
तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल ना ?
मी का बोलवले सगळ्यांना .
गेले पाच वर्ष मला आणि  सगळ्यांना प्रश्न पडला होता ना ?
सागरने आत्महत्या का केली .का तो सोडून गेला सगळ्यांना याचे उत्तर भेटले आहे .
काय ?आम्ही सगळे एकदम बोललो .
आज मी सागरचे काही पुस्तके कोणाला तरी देऊन टाकावे म्हणून बघत होते .त्याचे पुस्तके बघतानी मी काही अशी पुस्तके बघितले जी त्याचा कामाची नव्हती .ती सगळे पुस्तके संधिवात वरील होती .संधिवाता मधील एक प्रकार आमवात जो कोणत्या वयात होतो .आपला मुलगा हे का वाचत असावा असे मनात आले .म्हणून मी ती पुस्तके चालत असतानी मला त्यात काही पेपर भेटले .ज्यावर सागरने काही लिहिले होते .
१० तारीख माझी परीक्षा संपणार म्हणून मी खुश होतो .दोन दिवस येथे 
राहायचे आणि गावाला जायचे .पण संध्याकाळी माझे पाय सुजले असेल असेच म्हणून मी लक्ष नाही दिले .सकाळी थंड पाण्याने अंघोळ केली .
त्यानंतर मला थोडा ताप आला असे वाटले झोपून राहिलो .पण आता माझे पाय जास्त दुखत होते .पाया बरोबर हाताना पण सूज आली होती .
उठणे मुश्कील झाले .मित्रांनी मला हॉस्पिटल मध्ये नेले .सगळ्या तपासण्या झाल्या .आणि निदान झाले संधिवाताचे ,विस्वास बसत नव्हता या वयात हा त्रास कसा ?
डॉक्टरांनी सांगितले हा एक अलग प्रकारचा त्रास आहे तो कोणत्या पण वयात होतो .त्या वेळी त्याची तीव्रता समजली नाही .
नोकरी लागली एक स्वप्न होते आपल्या गावी जायचे गावा साठी काही करायचे .गावी आलो मनात होते ते स्वप्न पूर्ण केले .पण हे करत असतानी होणारा त्रास कधी कोणाला समजू दिला नाही .खूप त्रास होत असे .रोज वेदना शामक गोळ्या घेऊन पण त्रास कमी नाही झाला तर शेहारात कामाचे निम्मित करून जायचो आणि strong इंजेक्शन घेऊन येत असे .असे करणे बरोबर नाही हे डॉक्टर सांगत असायचे .पण मला माझे दुख आईला दिसू द्यायचे नव्हते .तिला वाटत असे मी लग्न करावे .पण मला हे पटत नव्हते .
आज धरणाचे काम पूर्ण झाले .छोटे का असेन पण गावाची पाण्याची सोय झाली .सगळे गाव खुश आहे .एवढे दिवस कामा मुळे आपले दुखणे वाढले ह लक्षात पण नाही आले .गोळ्या पण नाही घेतल्या .आज उठवत पण नाही आहे .
आज मन खूप उदास आहे .सागर दिसतो छान हुशार आहे छान नोकरी आहे .पण फक्त दिसयला आता मध्ये सगळे कमजोर ,जसे घराच्या भिंती 
वरतून अगदी व्यवस्थित दिसत आहे पण आता पोखरल्या आहे .वाळवी लागली आहे .काय उपयोग अस्या जगण्याचा .......
सागरच्या आईने त्या पेपरवरील सागरचे मनातील विचार वाचून दाखवले .ते वाचता असतानी सागरच्या आई बरोबर सगळे रडत होते .
आज सगळ्यांना समजले होते सागरने का आत्महत्या केली .
पण त्यांनी बोलायला हवे होते .सगळ्या गोष्टीवर उपाय असतात ना ?
पण आता या जर तर चा काही उपयोग नव्हता ................





1 comment :

  1. उत्तम कथा! सागरने असे करायला नको होते, असे राहून राहून वाटत आहे.

    ReplyDelete