Sunday, 12 April 2015

आजीच्या गोष्टी

             एक होता राजा ...
          आम्ही लहान असतानी आजच्या सारखे करमणुकीचे साधने नव्हते .रात्री झाली कि लवकर जेवणे करून लोक लवकर झोपत असत .
दिवस माळवल्यावर घरातील स्रिया स्वयपाक करत असत .तो पर्यंत घरातील आजी किवा आजोबा घरातील चिल्ल्या पिल्यांना जमा करत असत आणि गोष्टी सांगत असत .गोष्टी मध्ये अनेकदा "एक होता राजा ,अशी सुरवात असे .अनेक गोष्टी या पोथी पुराणातील असत .काही गोष्टी बालमनाला पटत पण नसे .पण गोष्ट सागण्याची पद्धत अतिशय छान असे मग त्यात गुगुन जायला होत असे .राजा त्याचा रथ ,त्याचा मोठा महल ,सुंदर राजकन्या याचे चित्र कल्पनेने मनावरकोरले जात असे .मग त्या कल्पनेमध्ये मन गुतून जात असे .नकळत आजी आपण नाही असे वागायचे किवा वाईट केले कि वाईट फळ भेटते .हे शिकवून जात असे नकळत मनावर संस्कार होत असे .आज खरच ना आजी आजोबा आहेत ना त्या गोष्टी .       -
      आजची मुले स्मार्ट झाली आहेत .त्यांना त्या गोष्टी पटत पण नाही .
करमणुकीचे साधने बदलले आहे दिवसातून त्यांच्या पुढे टीव्ही मुळे खूप काय काययेत असते .आजची मुले कल्पनेत रमत नाही .
परंतु तरी देखील आज छोटा भीम बघणारे मुले देखील जास्त आहे हे देखील खरे .लहानपणी आपण ऐकलेले "एक होता राजा "किवा "एक होता कावळ "किवाचाल रे भोपळ्या या टुणूक टुणूक अश्या गोष्टी ऐकताना ,म्हातारी भोपळ्या मध्येकशी बसली असेल असे प्रश्न तेव्हा बालमनाला पटत नसत .पण तेव्हा त्या ऐकयला
छान वाटत असत .हे मात्र खरे ........

No comments :

Post a Comment