Tuesday, 14 April 2015

एक नवीन सुरवात

एक नवीन सुरवात

          रोज रोज तेच तेच ....
खूप कंटाळा आला आहे तेच तेच पणाचा .
आयुष्यात एक निरसता आली आहे.अशा विचार करत  टी  घरात चक्करा भारत होती  त्यावेळी अचानक भिंती वरील आरशा मधील आपल्या प्रतिबिंबा कडे तिचे लक्ष गेले .आणि ती एकदम दचकली .काय एक वर्षात  काय अवस्था झाली  आपली ,  स्वताशीच ती बोलली .डोळ्या खाली काळे वर्तुळे  दिसायला  लागली  होती.किती दिवसापासून अति विचाराने  केस गळत होते .पण गेल्या वर्षात जे काही झाले होते .त्या मुळे तिला कशात रस राहिला नव्हता .कुठे जाणे येणे नाही ,कोणाशी बोलणे नाही स्वता मध्ये ती हरवून गेली होती .

एक आणि एकच विचार "का वागला हा माझ्याशी असे  "हे वाक्य ती एक वर्षात स्वताशी लाख वेळा तरी बोलली असेल .

तीन वर्षा आधी  त्याची एका सोशल नेटवर्किंग साईट वर ओळख झाली होती..एकमेकाला समजून घेता घेता ,एकमेकाच्या प्रेमात कधी पडले हे त्यांना पण समजले नव्हते .नोकरी निम्मिताने ती एकटी राहत होती एकमेकाशी बोलता बोलता एकमेकावर प्रेम करायला लागले .एक दिवस त्याने हिम्मत करून तिला सांगितले .ती वयाने मोठी होती  त्याच्या पेक्षा आणि जातीचा प्रश्न होताच ती त्याला नेहमी सांगत असे ,"आपण फ्रेंडच ठीक आहेत रे ."

पण शेवटी तीचे  तिलाच समजले नाही कधी त्याच्या प्रेमात पडली .एक दिवस तो तिला भेटायला आला .गणपती विसर्जन होते त्या दिवसी ,मिरवणुकीच्या गर्दीतून जातानि त्याने तिचा  हात पकडला आणि तिला वाटले आपल्यासाठी एक भक्कम आधार आहे हा .त्याचातील बिनधास्त पणा तिला खूप आवडून गेला .मग हे नेहमीचे झाले तो तिला भेटायला येत राहिला.ती स्वतला विसरून गेली तिचे जग म्हणजे तो झाला होते .रोज रोज मेसेज फोनवर बोलणे  चालू असायचे  ,दिवस कसे फुलपाखरा सारखे उडून जात होते .या सगळ्यात तिचा एक गोष्ट लक्षात आली नाही .त्याचा स्वभाव खूप संशयी होता .तिच्या ऑफिस मधील एक फ्रेंडचा वाढदिवस होता .सगळे ऑफिस सुटल्यावर थाबले होते .त्याच वेळी त्याचा मेसेज आला .तिच्या लक्षात आले नाही  .नंतर त्याने फोन पण केला .गोंधळात तिच्या लक्षात आले नाही .बस हे एक कारण झाले आणि तो चिडला खूप तिच्यावर ,नको नको ते बोलला तिला ,

तिच्या कानावर विस्वास बसत नव्हता  हा  तोच आहे का ?नंतर नेहमीच हे घडू लागले .दोघात वाद वाढत गेले .तिनी वाद नको म्हणून बोलणे सोडून दिले .त्याची आठवण मात्र खूप त्रास देत असे तिला  .मग ती फोन करी पण तो वेळ नाही नंतर बोलू असे बोलून तिला टाळत असे .याचा परिणाम ती आजारी पडली .हसणे बोलणे विसरली .

आपल्याला तो विसरून गेला ना  मग आपण पण जाऊ विसरून हा विचार करून मनातल्या मनात  ती रडत राहिली .

सवयीने ती रोजचे काम करत होती  .

एक दिवस तिला समजले त्याच्या आयुष्यात कोणी दुसरी आली आहे .जी त्याचा वयाची आहे आणि त्याच्या जातीची देखील .तिनी त्याला खूप दिवसाने मेसेज केला .त्याने  काही लपवले नाही .खरे बोलला .तिनी फक्त मला एकदा भेटशील का म्हणून त्याला रिक्वेस्ट केली .पण मी नाही येऊ शकत कामात बिझी आहे .तूच इकडे ये भेटू आपण असे तिला बोलला .एकदा बघू त्याला शेवटचे म्हणून तीने ठरवले त्याला भेटायला जायचे .
आठ दिवस आधी सागून देखील ती गेल्यावर तो तिला भेटला नाही .एक मेसेज पाठवला माफ कर काही कामा निम्मिता अर्जेंट जावे लागले .ती खूप दुखावली गेली .खूप काय काय बोलली त्याला .पण परत स्वतच्या बोलण्याचा पश्चाताप करत राहिली .

"प्रेम असावे लागते मनापासून ,ते जबरदस्तीने करायला लावता येत नाही ".याचा तिला अनुभव आला 

.नाही तर तुला कधी सोडून जाणार नाही असे बोलणारा तो असे बदलला असता का ?आरशात बघता बघता ती भानावर आली .उठली सरळ पार्लर मध्ये गेली .केस कापून घेतले बाजारात गेली .नवीन ड्रेस घेतले स्वतासाठी  .जे होऊन गेले ते गेले आता नवीन सुरवात करायची मना पासून ठरवून 
ती येणाऱ्या उद्या साठी ती तयार झाली ....

एक नवीन सुरवात करण्यासाठी ..............

No comments :

Post a Comment