Sunday, 12 April 2015

उणीव

आले बाबा घरी एकदाचे म्हणत तिने दरवाजा उघडला .
खूप दमल्या सारखे वाटत होते .सरळ सोप्यावर झोकून द्यावे वाटत होते .
नाविलाज झाल्या सारखी ती किचन मध्ये गेली .फ्रीज मधून पाणी घेतले .
आपल्या त्या आधुनिक सोयीने युक्त किचन वर नजर फिरवली .
काय नाही आहे येथे सगळे आहे ,
पण नाही ती आई ,"आली का ? काही तरी खाऊन घे दमलीस ना ? बोलणारी .
आज तिला आई खूप आठवत होती का हे तिला पण समजत नव्हते .
किती छोटे घर होते आपले ,आणि ते छोटे किचन ....
आईला किती आवड होती जेवण बनवण्याची ...
पण घाईत ती खूप कंटाळत असे ,काय कुठे ठेऊ काय कुठे ठेऊ असे होत असे तिला .
माझ्या नशिबात हेच आहे असे म्हणून ती काम करत राही .
आज सगळे आहे पण तीच नाही ..
उदास मनाने ती उठली बेडरूम मध्ये गेली .सगळी कडे सुंदर टेडी बेअर होते .
तिला खूप आवडत असत लहान असतानी ती आई कडे खूप हट्ट करे .
पण त्याची किमत बघून आई बोले नको ग खूप महाग आहे .
त्या पेक्षा आपण दुसरे काही घेऊ ...
त्यां वेळी तिला आईला वाईट वाटलेले दिसत असे .
पण एक दिवस आईने तिला एक छोटा टेडी दिला ....
किती खुश झाली होती ती ..
आई मी मोठी झाली ना खूप मोठा टेडी घेईन बघ ..
आज खूप मोठे मोठे टेडी आहे .पण आई नाही आहे .
तिच्या डोळ्यातील आनंद बघयचा राहून गेला ...

No comments :

Post a Comment