साबुदाणा पापड .
उपवासाच्या पदार्थां मधील अजून एक पदार्थ .
कोणाला पण करता येईन असा सोपा प्रकार .
एक किलो साबुदाणा रात्री खिचडीला भिजवतो तसा रात्री भिजवून
ठेवायचा ,{पाणी थोडे जास्त असू दयाचे }
सकाळी डबल पाणी घेऊन उकळी आले कि त्यात मीठ
टाकून साबुदाणा टाकणे आधी पातळ वाटेल पण
नंतर .घट्ट होईल ,नन्तर गरम असतानीच ,मोठ्या प्लास्टिकच्या
कागदावर चमच्याने छोटे छोटे पापड घालणे .
चांगले सुकले कि उलटे करणे .कडक सुके पर्यंत वाळवून देणे .
तळल्यावर छान दिसतात आणि छान लागतात देखील .

No comments :
Post a Comment