Wednesday, 15 April 2015

लेख





उबरठ्या बाहेर 
            आज दोन पोट निवडणुका झाल्या दोन्ही ठिकाणी ज्या महिला उमेदवार होत्या .त्या आपल्या पतीचे निधन झाले म्हणून त्या जागे वर उभ्या होत्या .दोन्हीचे पती असे होते ज्यांनी खरच लोका साठी कामे केल होते .यात काही शंका नाही .पण सुमन पाटील या नेहमी राजकारणा पासून दूर राहिल्या होत्या .आबा गृहमंत्री असून देखील त्या कधी कोणत्या कार्यक्रमात त्या दिसल्या नाही .नेहमी त्यांनी घर सांभाळून आबांना साथ दिली .आबाच्या अचानक जाण्या मुळे त्यांना राजकारणात यावेलागत आहे .त्यांना राजकारणात किती इंटरेस आहे .किवा त्यांच्या साठी हे सगळे किती अवघड असणार आहे हे त्यांनाच माहिती 
        पण यातून मला एक गोष्ट जाणवली ती लिहिण्याचा प्रयत्न करत आहे .
आज अनेक महिला या शिकलेल्या नोकरी करणाऱ्या आहे .पण त्या पेक्षा पण आज अनेक महिला या गृहिणी आहे .खेड्यात तर अनेक व्यवहार हे पुरुष करतात .बाहेर काय चालते घरातील महिलांना माहिती नसते .कोणाला पैसे दिले आहे कोणा
कडून येणे आहे .अनेक महिलांचे बँकेत खाते देखील नाही .जर नोकरी करणारा पुरुष असेल तर तो आपल्या बायकोला सगळी माहिती देतेच असे नाही .फंड किती आहे किवा पेन्शन ऑफिस कुठे आहे ,कुठे कुठे गुतंवणूक आहे हे त्या घरातील बाईला माहिती नसते .जर धंदा असेल तर नेमका तो कसा चालतो याची घरातील बाईला माहिती नसते .अनेकदा मग घरातील या कर्त्या माणसाचे अचानक जर निधन झाले तर ,त्याच्या घरातीलआई किवा बायको यांच्या वर संकट कोसळते .
      माझ्या निरीक्षणातून मी हे लिहिते आहे .आमच्या कडे एक व्यक्तीचे छोटे दुकान होते .त्यांनी प्रेमविवाह केला होता .त्या दोघाचा घरच्या लोका बरोबर जास्त संबंध नव्हता .तो कधी कधी घरी जात असे .जे दुकान होते ते भाड्याचे होते .आणि राहत असलेले घर छोटे पण मालकीचे होते तीन छोटी मुले होती .आणि त्या माणसाने अचानक आत्महत्या केली .त्याच्या घरचे आले सगळे सोपस्कार झाले .तिनी कुठे राहायचा हा प्रश्न शेवटी घर विकून तिनी गावी राहावे असे ठरले .पण जेव्हा घर विकण्याची वेळ आली तेव्हा समजले कि ते घर त्या महिलेच्या पतीने आधीच गहाण ठेवले होते .दुकान घेण्या साठी 
आणि तो व्यवहार फसला होता पैसे गेले होते आणि घर पण आणि याच मुळे त्याने आत्महत्या केली होती .
     आता पुढे काय ?
गावात सासऱ्याचे घर होते त्याचा एक कोपर्यात तिचा संसार सुरु झाला .शेती होती पण तिला काही येत नव्हते .कधी शेतात न गेलेली ती बाई जमत नसतानी शेतात कामाला जायला लागली .बाकीच्यांना पूर्ण रोज तेव्हा तिला अर्धे पैसे देऊन ती होईल तसे काम करत असे .आणि ते करत असतानी तिची ती फरफट बघवत नसे .शेत ती विकू शकत नव्हती ते सासऱ्याच्या नाव वर होते .मुले लहान कधी घर बाहेर न गेलेली ती बाईची जगण्याशी लढाई चालू झाली .
    हे एक उदहरण असे खूप आहेत .फक्त मला एक सांगावे वाटते .आम्ही घरात खूप सुखी आहे मला काही बघयला लागत 
नाही नवरा सगळे बघतो असे म्हणून बायकांनी कधी काही गोष्टी कडे दुर्लक्ष करू नाही .किवा तू बाई आहे असे म्हणून नवर्यानी पण मी सगळे घरात आणून देतो मग अजून काय हवे असे म्हणू नाही .जर व्यवसाय असेल तर त्याची सगळी माहिती आपल्या बायकोला असू द्या .कोणा कडून येणे आहे कोणाला देणे आहे ते नेहमी लिहिलेले असावे .नोकरी असेल तर कोणते ऑफिस कुठे आहे .कुठे गुंतवणूक आहे याची माहिती द्यावी .अचानक घर बाहेर पडणाऱ्या बाईला खूप अवघड असते .पण माहिती असेल तर ती आपल्या घर साठी खंभीर पणे उभी राहू शकते .तिला कोणाच्या मदतीची गरज नसते 
आणि त्या मुळे फसवणूक देखील होत नाही .शेत असेल तर त्याची माहिती कशी ठेवायची हे देखील माहिती करून घ्यावी .
हे जीवन आहे याचा काही भरवशा नाही .....
१५ एप्रिल १५ 
फोटो -गुगल सर्च 

No comments :

Post a Comment