Thursday, 16 April 2015

कुरडया


फडणवीस सरकारचा महिलांनाही दिलासा...अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या कुरडया, पापड्यांचे..
पंचनामे करण्याचे आदेश. .
अश्या पोस्ट तुम्ही खूप बघितल्या असतील ना .पण खरच विचार केला तर खूप नुकसान होते .ते नुकसान सामानाचे होते आणि त्या बरोबर मेहनतीचे देखील ,
कुरड्या ...{घाट घालणे }
आपल्या कडे नेहमी सणाच्या दिवसी हा पदार्थ हमखास ताटात असतोच असतो .पण त्या करायला खूप मेहनत असते .एक व्यक्तीचे ते काम नसते .म्हणून उन्हाळ्या मध्ये शेजारणी जमा होतात आणि सगळ्या मिळून करतात .खरे तर आता खूप सोपे झाले पहिल्या पेक्षा ....आधीच्या काळी गहू भिजत घालणे तीन दिवसांनी ते ओले गहू वाटायचे यंत्र असे त्या साठी तीन चार जनी हव्या असत .एकाने गहू टाकणे एकाने फिरवणे आणि एक व्यक्ती ते वाटलेले गहू पाण्यात टाकणे .पण आज मोठे यंत्र आलेत 
घरी गहू दळण्याचा त्रास संपला .तरी वाटलेले गहू पाण्यात टाकूनत्यातील कोंडा 
अलग करणे हे एक मोठे काम .पाणी आणि चीक एकत्र परत भरून ठेवणे .दुसर्या दिवशी बरोबर पाणी काढून टाकणे चीक खाली राहिला त्याचा घाट घेणे .म्हणजे चीक शिजवणे.घाट घेणे हि एक कला आहे .आज देखील खेड्यात एकाचवेळी १५ किलो पर्यंत घाट घेतला जातो .एकच दिवशी आणि तो घेतानी लागते ते कौशल्य .सगळ्यांना जमेल असे नाही .घाट घेऊन झाल्यावर होते सुरवात कुरड्या करण्याची .त्या साठी हव्या असतात खाटा त्यावर पसरले जातात गव्हाच्या कड्या आई त्यावर टाकल्या जातात कुरडया .शिजवलेला चीक हा करड्या करण्याच्या ज्याला गावा कडे सोर्या म्हणतात .{फोटो मध्ये आहे }त्यात घातला जातो आणि एक जन दाबणार एक व्यक्ती कुरड्या ताटावर काढणार आणि एक त्या खाटावर नेऊन टाकणार अस्या कमीत कमी चार बायका या साठी हव्या असतात .म्हणून तर याला घाट घालणे म्हणतात ..आणि हे सगळे करून जर अचानक पावसाचे वातावरण झाले तर जीव खालीवर होतो .करड्या जर ओल्या असतील आणि पाउस आला

तर सगळी मेहनत वाया जाते .

No comments :

Post a Comment