Tuesday, 10 February 2015

आर्धा प्याला भरलेला…”

आर्धा प्याला भरलेला…”
 आई उशीर झाला डबा दे लवकर बाहेरून मुलाचा आवाज ऐकून पटकन सरला बाई बाहेर आल्या आणि मुलाच्या हातात डबा दिला .डबा घेऊन पाठमोऱ्या झालेल्या मुला कडे बघत त्या विचारात हरवल्या .आपला मुलगा आता मोठा झाला .लग्न करायला हवे .
पण मनात मात्र नेहमी वाटत राहते आपल्या या थोडाशा इगो असलेल्या मुलाला 
कशी बायको भेटेल .थोडा वडीला सारखाच स्वभाव आहे त्याचा .पुरुषांनी बाहेर जाऊन 
काम करावे आणि बायकांनी घर सांभाळावे असे विचार आहे .आज काल तर मुली खूप शिकलेल्या असतात .कसे होणार या मुलाचे उगीच चिता वाटली सरला बाईना ......
पण दुसर्याच क्षणी त्या मनात बोलल्या मी आहे ना ती माझी सून नाही मुलगी म्हणून येईन या घरात ,तिला कधी हे घर परके वाटणार नाही .
एक मैत्रिणीच्या ओळखीची मुलगी त्यांना आवडली आणि मालती सून म्हणून घरात आली.गरीब घरातील चांगल्या संस्कारातील होती मालती बी .कॉम पर्यंत शिकली होती .
संगणकाचा कोर्स केले होता .पण त्यांच्या मुलाने आधीच सांगून टाकले ती नोकरी नाही करणार .मालती घरात रुळली होती पण ती कधी कधी उदास वाटायची सरला बाईनी तिला विचारलं .पण सासूला कसे सांगणार म्हणून ती शांत राहिली .
एक दिवश मात्र त्यांनी तिला पुन्हा पुन्हा विचारले .तेव्हा ती बोलली मी शिकले आहे आणि काही करत नाही .याचे वाईट वाटते .त्या वर सरला बाई बोलल्या एवढेच ना तो बाहेर जाऊ देत नाही मग घरातून करता येईन असे काही कर .
मालती बोलली ,हो पण त्या साठी मला कॉम्पुटर पाहिजे ना ?
रात्री मुलगा घरी आला त्यांनी त्याच्या बरोबर या बाबत बोलणे केले .
पण आता ते शक्य नाही त्या साठी २५००० लागणार ते नाही आहे आताच तर लग्नाचा खर्च झाला आहे .असे बोलून मुलाने विषय संपवला .
त्या नंतर एक दिवस दुपारी घरात मालती असतानी एक व्यक्ती एक बॉक्स घेऊन आला .
एवढ्या मोठ्या बॉक्स मध्ये काय असावे ,हे मालतीच्या काही लक्षात येत नव्हते .
आलेल्या व्यक्तींनी सांगितले हा कॉम्पुटर आहे .तिचा विस्वास बसत नव्हता .
तिनी सासूला बोलावले.आणि विचारले कोणी आणला .
त्या बोलल्या मीच आणला तुझा साठी ,पण पैसे कुठे होते तुमच्या कडे .
अग तुला मुलगी मानली आहे मी मग मुलीला उदास कशी राहू देईन मी ,
आता कर घरातून काम 
माझ्या बांगड्या मोडल्या आणि घेतला .
मालती फक्त सासू कडे बघत राहिली .तिनी अश्रू भरल्या डोळ्यांनी सासूला मिठी मारली .
हो नक्कीच आई "मी काम करीन आणि एक दिवस तुमच्या बांगड्या नक्की परत करीन "
पर्याय असतात ते आपण शोधयचे असतात .आयुष्याकडे आपण कसे बघतो त्या वर आहे .
५ हजार भाव असतानी त्यांनी बांगड्या मोडल्या आणि आज काही वर्षांनी ३० हजार भाव असतानी सुनेने त्यांना त्याच्या बांगड्या परत करून दिल्या .
आज एक कॉम्पुटर वर सुरु केलेला त्याचा कॉम्पुटर क्लास आज १० कॉम्पुटर आहे .
पण याचे श्रेय मालती सगळे सासूला देते .
ती बोलते आपण नेहमी पेला अर्धा रिकामा आहे हेच बघण्या पेक्षा पेला अर्धा भरला आहे हे बघावे

१०/२/१५ 

No comments :

Post a Comment