तुझे येणे नुसते येणे नव्हते .
त्या बरोबर होती खूप सारी ख़ुशी जिने माझे जीवन देखिले आनंदी झाले .
स्वागत केले तुझा येण्याचे .
तुझ्या हसण्यात ,तुझ्या असण्यात विसरून गेले
जग सारे .तुझ्या तालावर नाचत राहिले .
कधी चिंब भिजले .कधी गारठले .आणि
एक दिवस तू अचानक निघून गेला दूर
आता फक्त अश्रू आहे डोळ्यात
तुझ्या सारखे कधी रिमझिम
तर कधी सरी सारखे .......
आता तुझी परत वाट बघणार .....
तू ये पण असा अवेळी नको रे
तुझे हे येणे डोळ्यात पाणी आणते रे,
२१ नोव्हेंबर २०१४
No comments :
Post a Comment