बालपण किती निरागस असते नाही .अनेक गोष्टी का कशा साठी माहितच नसते .
पण अशा काही गोष्टी घडतात या बालपणात आणि त्या कायमच्या लक्षात राहतात .
नुसत्या लक्षात राहत नाही तर खूप काही शिकवून जातात .
नऊ दहा वर्षाची असेल तेव्हा मी .शाळेत जायचे छोट्या भावांना सांभाळायाचे घरातील
छोटे छोटे काम करून ठेवायचे .आणि बाकी वेळेत खेळायचे .....
असेच एकदा शाळा सुटली सगळ्या आम्ही छोट्या मैत्रिणी एका मैत्रिणीच्या
घरी जमा झालो.आजचा खेळ लपाछपी असे ठरले .
बहुतेक लोक शेतात जात त्यामुळे अनेक घरे बंद असत मग लपणार कुठे कोणाच्या
भिंती आड .कधी कोणाच्या आवारात ....
आमचा खेळ सुरु झाला आणि मी एक घरातील भिंती आड लपले ,पण समोरच्या घरातील
एक आजी बसली होती तिनी बघितले .ज्या मुली वर राज्य होते तिला तिनी सांगून
टाकले ."येथे बघ येथे लपली आहे ."
मला त्या वेळी त्या म्हातारीचा प्रचंड राग आला .आणि मी रागाने तिला आज्जी वैगरे
काही न बोलता रागाने बोलले .
:हि म्हातारी लाई बाराबोड्याची हाय "
बाप रे मी असे बोलले आणि ती आजी सरळ काठी घेऊन आमचा वर धावून आली .
आम्ही मागे झालो .ती आमचा रस्ता अडवून उभी राहिली .
ती मला म्हणाली तुला माहित आहे का तू जे बोलली त्याचा अर्थ काय ?
तुझ्या आई बापाने तुला हेच शिकवले आहे का ?
झाले कारण नसतानी आई बापाचा उध्दार ....
मला असे म्हणती काय ? येऊ दे तुझ्या आईं बापला येतेच घरी आणि विचारते
बाराबोड्याची म्हणजे काय ?
बाप रे मला तर खूप रडू येत होते.खरच हि जर घरी आली तर ?
आई तर घर सोडून गेली म्हणून काही ऐकून न घेता मला चांगली धोपटून काढीन .
पण मी जे बोलले त्याचा अर्थ मला कुठे माहित होता .
म्हणजे मी खूप वाईट बोलले असावे आणि आता मार खावाच लागणार या विचारानेच
रडू येत होते .
निरागस असते ना बालमन .घरी गेले ,घर जवळ गणपतीचे मंदिर होते ,
देवा जवळ जावून बसले .देवाला नवस केला .ती आज्जी घरी नको येऊ दे .
नवस पण काय असत ना ,गोळ्या ठेवेल नाही तर १० पैसे देईन असेच काही पण .
घरातील कामे पटपट करून टाकली .आई आली शेतात तून .
पण आज लक्ष सगळे फटका कडे होते .जसा अंधार पडला आणि हायसे वाटले कारण
आम्ही राहत होतो त्या बाजूला लाईट नव्हत्या .म्हणजे आता ती आजी येणार नव्हती .
पण भीती मात्र होती .{खरच रात्र भर विचार करत राहिली काय अर्थ असेल या शब्दाचा}
तो प्रसंग खूप काही शिकवून गेला .कधी अर्थ माहित नसेल तर बोलू नाही .
मोठ्या माणसाचा कधी अनादर करू नाही .
आज पण मला याचा अर्थ नीट माहित नाही.पण हा शब्द आज पण गाव कडे सरस
वापरतात .
२६/२/१५

No comments :
Post a Comment