Sunday, 8 February 2015

नजर

आज एक फ्रेंडची पोस्ट वाचली आणि कॉलेज मध्ये असतानाची एक मजेदार घटना आठवली ,
मी अकरावीला असेल तेव्हाची गोष्ट ....
आमच्या वेळी मुली मुला बरोबर बोलत पण नसत ...
आज मुलांना प्रपोज करायला हिम्मत लागते पण तेव्हा मुली बरोबर बोलयला 
देखील मुलांना हिम्मत करावी लागे ,
दहावीच्या वर्गात असलेल्या एक मुलाने त्याच्या वर्गातील मुलीला चिट्ठी लिहिली .
मुलीचे नाव अश्विनी होते आणि त्या वेळी गम्मत जम्मत चित्रपटाचे "अश्विनी ये ना "
हे गाणे खूप गाजत होते .मग काय मुलीवर इंप्रेशन मारायला त्याने हे गाणे पण त्यात लिहिले .
पण मेन प्रश्न होता ते तिला कसे द्यायचे .मधली सुट्टी झाली सगळ्या मुली बाहेर गेल्या त बघून 
त्याने पटकन तिच्या एक वहीत ती चिठ्ठी घालून ठेवली .
पण त्यात स्वताचे नाव मात्र टाकले नाही .
दुसऱ्या दिवशी शाळा सुरु झाली आणि ती आली पण त्याला ती नेहमी सारखीच दिसली 
त्याला समजेना चिठ्ठी वाचली का नाही .एक पिरीयड संपला आणि वर्गात एक शिपाई आला .
त्याने तिला मुख्य्ध्यापाकानी बोलावले म्हणून सांगितले .त्याला तर काही समजेना .
पण  काही वेळेना त्याला पण बोलावले .सराच्या ऑफिस मध्ये तिचे बाबा तिचा भाऊ आणि ती वर्गशिक्षक होते.
झाले असे होते त्यांनी ज्या वहीत चिठ्ठी ठेवली होती .ती वही तिचा भावाची होती .जी त्याने तिचा कडे ठेवायला दिली होती .
घरी गेल्यावर त्याने ती बघितली पण तिला काही न बोलता वडिलांना घेऊन शाळेत आला होता .
सरांनी मुलीला विचारले चिठ्ठी यानेच लिहिली कशा वरून चिठ्ठी वर तर नाव नाहीं मग तू याचे नाव कसे घेतले .
मला माहिती आहे सर हा नेहमी माझा कडे बघत असतो .ती बोलली .
सर त्याला बोलले हे खरे आहे का ?
आता काय ?आपल्याला शाळेतून काढून टाकतील हा विचार आला आणि तो पटकन बोलला नाही सर मी कधी
 हिच्या कडे बघत नाही .आणि हिला कसे समजले मी हिच्या कडे बघतो .कोणी सांगितले हिला ,विचारा तिला .
हे ऐकले आणि ती मुलगी पटकन बोलली ."सर मी नेहमी बघते हा माझा कडे बघत असतो "
बघितले सर मी नाही हिच्या कडे बघत हीच माझा कडे बघते ,तो पटकन बोलला .
मुलगी काय बोलवा न समजून गप्प बसली .
शेवटी सरांनी दोघांना समज दिली .आणि जायला सांगितले .पण हा किस्सा सगळ्या शाळेत माहित झाला .
आणि मुली जर बघणर्या मुलाला ये काय बघतो बोलल्या तर मुले 
आम्ही कुठे तुम्हीच बघता असे बोलायला लागले .
पण या सगळ्यात काही महिन्यातच त्या मुलीचे लग्न झाले .कारण तेव्हा असेच होत असे ..

No comments :

Post a Comment