Tuesday, 10 February 2015

वडापाव ...

वडापाव ...
.मुंबई मध्ये गरिबाचे खाणे म्हणून वडापाव ओळखला जातो .मुंबईतील अशी एक गल्ली नसेल तिथे वडापावची गाडी नसेल ........मला आठवतात माझ्या कॉलेजचे दिवस ,गाव पासून २७ कि.मी दूर आम्ही कॉलेजला जात असू ,खरे तर नेहमी जाणे परवडत नसे शेतीत काम असे मग परीक्षा जवळ आली कि त्या आधी फक्त १५ दिवस कॉलेजला जायला भेटत असे .मग तेवढ्या दिवसात कोणाच्या नोट घेऊन लिहून काढायचे .सकाळी ८ ला कॉलेज असे ७ वाजता गावातून बस .आणि जिथे कॉलेज होते त्या बस स्टोप पासून कॉलेज १ कि.मी होते आणि ते चालत जात असू .आमच्या कॉलेज मध्ये एक कॅन्टीन होते पण तिथे कधी आम्ही गेलो नाही तिथे फक्त चहा भेटत असे .कॉलेज वर साधी पिण्याच्घ्या पाण्याची देखील सोय नव्हती ,घरातून कधी कधी चहा न घेता आम्ही निघत असू .कॉलेज १२ वाजता सुटत असे .
खूप भूक लागत असे .पिण्यासाठी पाणी सुद्धा नसे {आता सारखी बरोबर बाटली ठेवण्याची तेव्हा सोय आणि पद्धत दोनी नव्हते }कॉलेज मधून घरी जातानि बस स्टोप च्या बाहेर एक वडापावची गाडी दिसे
त्या वडापाव तळण्याचा मस्त वास नाकात घुसत असे .आणि भूक अजून जागी होते असे .तो कितीला भेटतो हे देखील माहित नव्हते .कारण अनेकदा जवळ एक पैसा देखील नसे .भूक तर लागे पण कधी वडापाव घेऊन खाण्याची हिम्मत नाही झाली .शिकायला भेटते हेच खूप होते .जर कधी आपण असे बाहेर काही घेऊन खातो हे कोणी बघितले आणि ते गावात माहित झाले तर हि भीती वाटत असे .मुली कॉलेजला जातात कि बाहेर खायला .हे पण एक कारण लोकांना पुरले असते ना मुली कॉलेजला जाऊन बिघडल्या हे बोलयला .कॉलेज आणि घर कुठे फिरायचे नाही सरळ घरी यायचे .ती शिस्त एवढी मनात खोल वर पक्की बसली आहे.आज मी मुंबईत येऊन २० वर्ष झाले .
आज देखील मी एकटी असतानी कधी काही घेऊन खात नाही .मग किती भूक लागली तरी .
मुलगी बरोबर असेल तर ,तरी मला आपण असे खातो हे कोणी बघितले तर असेच वाटत राहते .
आज देखील नाही जमत कुठे खाणे ,मग ते हॉटेल असेल तरी .काही गोष्ठी कधी मनातून जात नाही हेच खरे ना ..त्या काळी किती दमले काही झाले तरी घरी बनवून जेवण बनवून खाण्याची पद्धत खेड्यात होती .फक्त बाजाराचा दिवस असा असे त्या दिवशी खाऊ म्हणून घरात भेळ येत असे आणि कधी तरी लाडू पण ते देखील घरात खायचे .बाकी नेहमीची भाजी आणि भाकरी असे .आणि त्या काळात त्याचे काही वाटत देखील नसे ......
आज जमाना बदलला आहे ना
खूप भूक लागत असे .पिण्यासाठी पाणी सुद्धा नसे {आता सारखी बरोबर बाटली ठेवण्याची तेव्हा सोय आणि पद्धत दोनी नव्हते }कॉलेज मधून घरी जातानि बस स्टोप च्या बाहेर एक वडापावची गाडी दिसे त्या वडापाव तळण्याचा मस्त वास नाकात घुसत असे .आणि भूक अजून जागी होते असे .तो कितीला भेटतो हे देखील माहित नव्हते .कारण अनेकदा जवळ एक पैसा देखील नसे .भूक तर लागे पण कधी वडापाव घेऊन खाण्याची हिम्मत नाही झाली .शिकायला भेटते हेच खूप होते .जर कधी आपण असे बाहेर काही घेऊन खातो हे कोणी बघितले आणि ते गावात माहित झाले तर हि भीती वाटत असे .मुली कॉलेजला जातात कि बाहेर खायला .हे पण एक कारण लोकांना पुरले असते ना मुली कॉलेजला जाऊन बिघडल्या हे बोलयला .कॉलेज आणि घर कुठे फिरायचे नाही सरळ घरी यायचे .ती शिस्त एवढी मनात खोल वर पक्की बसली आहे.आज मी मुंबईत येऊन २० वर्ष झाले .आज देखील मी एकटी असतानी कधी काही घेऊन खात नाही .मग किती भूक लागली तरी .मुलगी बरोबर असेल तर ,तरी मला आपण असे खातो हे कोणी बघितले तर असेच वाटत राहते .आज देखील नाही जमत कुठे खाणे ,मग ते हॉटेल असेल तरी .काही गोष्ठी कधी मनातून जात नाही हेच खरे ना ..त्या काळी किती दमले काही झाले तरी घरी बनवून जेवण बनवून खाण्याची पद्धत खेड्यात होती .फक्त बाजाराचा दिवस असा असे त्या दिवशी खाऊ म्हणून घरात भेळ येत असे आणि कधी तरी लाडू पण ते देखील घरात खायचे .बाकी नेहमीची भाजी आणि भाकरी असे .आणि त्या काळात त्याचे काही वाटत देखील नसे ......आज जमाना बदलला आहे नाबाहेर खाणे एक फॉशन झाली आहे .तरी जुने दिवस कुठे तरी आठवत राहतात .आणि तोच प्रश्न परत मनात येतो लोक काय म्हणतील .ते काही असो पण कधी काही खावे वाटले तर आधी आठवतो तो वडापावच ...

No comments :

Post a Comment