Sunday, 8 February 2015

अपघात का होतात .

आज एक अपघात वरील आणि त्या नंतर लोकच्या वागण्या बद्दल एक पोस्ट वाचली .
नेहमी कुठे ना कुठे अपघात होत असतात .कोणी ना कोणी मरत असते कोण कायमचे अपंग होते . 
पण अपघात का होतात याचा विचार केला जातो का ?
सगळ्यात जादा अपघात कशाचे होतात तर ते बाईकचे .
म्हत्वाचे असती ती वेग मर्यादा जी बाईक वाले कधी पाळत नाही .
अनेकदा सिग्नल लागलेले असतात तरी सुद्धा रस्त्यावर खूप पुढे येऊन बाईक थांबवणे .
नाही तर सिग्नल तोडून जाणे .या मुळे अनेकदा अपघात होतात .
मी नेहमी शिर्डीला जाणऱ्या Travels बसने गावी जाते .त्या वेळी एक बाईक 
वाला अडवा गेला .त्या वेळी त्या बसचा ड्राइवर बोलला कि अनेकदा हे लोक असे बाईक 
चालवतात आणि बस खाली येतात .दिसते पण बस स्पीड मध्ये असते .
अशा वेळी बाईक वरील एकला किवा दोघांना वाचवताना बस वरील ताबा जातो आणि बस पलटी होते .
म्हणून अनेकदा सरळ बाईक वर बस घालतात अनेक ड्राइवर नाविलाज असतो एका साठी पन्नास साठ लोकांचा जीव जाण्याचा धोका असतो .तो बोलला ते पण खरे होते ना .
हे एक कारण असले तरी अपघाताचे अनेक करणे असतात .खराब रस्ते ,आणि वेगाचे वेड अनेक लोक मुंबईत व्यवस्थित गाडी चालवतात तेच लोक बाहेर पडल्यावर सगळे नियम गुडाळून ठेवतानी दिसतात .अनेकदा ड्राइवर हे गाडी चालवणे नीट शिकलेले नसतात .
जर ड्राइवर म्हणून काम करत असतील तर अनेकदा झोप नाही हे एक कारण अपघाताचे असते .खेड्यात प्रवाशी ज्या जीप किवा इतर वाहने असतात त्यात मर्यादे पेक्षा माणसे भरणे .गाड्या व्यास्थित नसणे कधी लाईट आहे कधी नाही .असे अनेक अपघाताचे कारणे असतात .
आणि अपघात झाल्यावर लोक मदत करत नाही कारण कोणाल अपघात बघणे आवडत नाही तर कोणाल नको ते पोलिसाचा त्रास असे होते .पण मदत करावी कधी पण काय माहित उद्या तिथे आपण असू किवा आपले कोणी हा विचार नक्की करवा .

No comments :

Post a Comment