Tuesday, 17 February 2015

मनातील देव

नेहमी सारखे घरातील काम चालू होते .अचानक बेल वाजली कोण असावे या वेळी 
म्हणून दार उघडले .दारात आमच्या एरियातील तीन बायका उभ्या होत्या .
भाजी आणयला कधी कुठे जाता येत दिसणारे चेहरे नाव कोणाची माहित नाही .
या आपल्या कडे का आल्या असाव्या अशा प्रश्न मनात आला .
येऊ का घरात ,त्या बोलल्या .
हो का नाही .मी बोलले .
त्या घरात आल्या बसल्या .सुरवात झाली बोलण्यास .
तुम्ही घरीच असतात ना .मग काय करतात दिवसभर घरात ...
काही नाही पुस्तके वाचते ,नेट वापरते बाकी काही नाही आणि मला सवय झाली
आहे एकटी राहण्याची .मी बोलले .
उद्या एकदशी आहे माहित आहे ना ,आम्ही स्वधाय परिवारातून आलो आहे .आणि नेहमी
एकदशी आधी लोकांना घरी जाऊन भेटतो .त्यांना आपल्या धर्मा बद्दल सांगतो .
दिवसातील काही वेळ देवा साठी द्या म्हणून .
मी मनातून कुठे तरी हसले ,मी हे सगळे ऐकत लहानाची मोठी झाले होते .
पण मी तसे काही दाखवले नाही .आपला जन्म कशासाठी झाला .या धर्मात का
झाला .त्या बोलत होत्या मी ऐकत होते .
शेवटी त्यांनी मला विचारले ,आपण झोपतो ,सकाळी उठतो ,अचानक एखाद्या
अपघात मधून एखाद्या संकटातून वाचतो .हे कोण करते देवच ना ?
मी त्या बोलत होत्या त्याला मी हो बोलले .
मला त्यांना कुठे विरोध करायचा नव्हता .त्या जे करत होत्या ते त्यांना पटत होते .
अचानक त्या बोलल्या आपले माणसे आपल्याला साठी जेव्हा काही करतात तेव्हा त्या
आपल्याला आवडतात ,पण अचानक त्यांनी काही करणे सोडून दिले तर .मग आपण
ते काही करत नाही म्हणून त्यांना नाव ठेवतो .ती मग आपल्यला आवडत नाही .
मग आपण कधी विचार केला आहे का ?हे लाख मोलाचे शरीर आपल्याला दिले आहे .
त्या साठी जर आपण काही केले नाही तर त्या देवाला पण आपण आवडू का ?
मी फक्त ऐकत होते .
त्यांचे बोलून झाले आणि त्या बोलल्या आम्ही दर महिन्याला आलो तर आवडेल का ?
मी हो बोलले .
कारण मी अशा एक आज्जीनं ओळखत होते .त्याचा मुलगा आणि पती अचानक 

एक अपघात मध्ये गेले होते .नाते वाईक आले काही दिवस येत राहिले .आजी सैरभर झाल्या .
एकट्याच बसून असायच्या ,शेजारी किती दिवस येणार ,जगण्याची इच्छा संपलेल्या त्या
खूप एकट्या झाल्या बोलणे विसरल्या .आणि अचानक एक दिवस त्याची बेल वाजली .
चार पाच बायका दारात ,आम्ही स्वधाय परिवार कडून आलो .
आजी काही बोलली नाही .पण त्यांना आवडले पण नाही .आजी बद्दल जेव्हा
त्या बायकांना समजले तेव्हा त्या पुन्हा पुन्हा आज्जी कडे जात राहिल्या .
आजीने विचार केला कोण आहे या माझ्या तरी येतात माझ्या कडे .त्यांच्या
बोलण्याचा आजीवर खूप परिणाम झाला .आणि आज त्या सगळ्या कार्यक्रमात असतात .
त्या देखील असेच कोणाला आणि कोणाला भेटत असतात .
दोन दिवसा पूर्वी झालेली हि घटना .पण मला माझ्या वडिलांची आठवण करून गेली .
ते असतानी नेहमी काहीना काही सांगत असत .अभंग नुसता म्हणत नसत .
त्याचा अर्थ समजवत असत ते बोलत .
आपण कधी तरी अडचणीत उपयोगी पडावे म्हणून .बँकेत पैसे ठेवतो ना तसे
समज .आज तू देवाचे नाव घेसील ,वाईट झाले तर तुला राग येईन देवाचा ,
पण तेव्हा असे समज तू जे काही करते ते देवा कडे डीपोजीट समज ,ते तुला संकटात
उपयोगी पडेल ,
{असेच काही मनातील }
आशा १७/२/१५

No comments :

Post a Comment