पोहे
कोणता पदार्थ करणे आणि तो करता येणे या वेगळ्या गोष्टी आहे असे मला वाटते. पदार्थ करणे जेव्हा फक्त करायचा म्हणून केला जातो तेव्हा त्याला चव असेलच असे नाही.करणे म्हणजे तो छान झाला पाहिजे म्हणून मनापासून करणे.
आज एक पोह्याची पोस्ट पहिली आणि मला जुने काही आठवले.

एप्रिल मे लग्नाचे महिने आणि लग्न जुळण्याचे महिने.मग मुलीला बघयला येणार असेल तर कांदे पोहे केलेच पाहिजे हा नियमच.पण खेड्यात अनेकदा भाजीपाला हा फक्त बाजाराच्या दिवसी मिळत असे,म्हणजे हिरवी मिरची ,कोथांबीर फक्त
बाजाराच्या दिवसी मिळे.आमच्या गावात मंगळवारी बाजार असे .म्हणजे त्यादिवसी घेतलेला भाजीपाला आठ दिवस वापरायचा .पण जर कोणी पाहुणे रविवारी किवा सोमवारी आले तर मग खूप पंचाईत होत असे.पोहे करायचे तर हिरवी मिरची एक तर सुकून जात असे नाही तर लाल होवून जायची .कोथांबीर तर कधीच मरून गेलेली असे .{अर्थात सुकवून ठेवेल असे}
मला माझी सासू आणि घरातील अचानक बघायला आले .तेव्हा गावात फक्त चिवडा करतो तसे पातळ पोहे मिळत असे.ते भिजवताने खूप काळजी घायलालागे नाही तर सरळ गोळा बनत असे.आमच्या सासू बाई आल्या आणि सरळ स्वयपाक घरात येवून बसल्या .असा कोणापुढे कधी स्वयपाक केला नव्हता .त्यामुळे माझी गडबड झाली.आणि पोहे भिजवताना पोहेंचा गोळा झाला . पटकन ते बाजूला ठेवून दुसरे पोहे भिजवले . आणि बघितले तर हिरवी मिरची नाही आता काय करा
मनात आले." मुलीला बघायला आले कि पोहे करा " हे कोणी शोधले काय माहिती.
मिरच्या लाल झालेल्या होत्या आणि त्या पण सुकल्या होत्या.नाविलाज होता त्याच टाकल्या. पोहे केले छान झाले असे वासावरून तरी वाटत होते .आणि अचानक आठवले मीठ राहिले.आता काय करा,कारण आमच्या कडे खडे मीठ वापरत .तेच बारीक करून टाकले जायचे.आता पोहे तर करून झाले.आता मीठ त्यात मिक्स पण होणार नाही .सासू बाई मागे बसल्या आहे .सरळ त्यांच्या कडे पाठ केली आणि मीठ वाटून त्यात थोडे पाणी टाकून ते पोहेत टाकले.
"इज्जत का सवाल होता "खूप वेळ हलवून नंतर त्यावर झाकण ठेवले.तेवढ्यात छोटा भाऊ स्वयपाक घरात आला .त्याला खुणेने चव घेवून बघ म्हणून सांगितले.त्याने दिसणार नाही असे थोडे पोहे घेतले आणि बाहेर गेला.परत आला आणि खुणेने सांगितले ठीक आहे.लाल मिरची त्यात सुकलेली कोथांबीर पोहे भारीच दिसत होते.तेव्हा खोबरे आणि शेव बीव घालण्याची काही पद्धत नव्हती .
एकदाचो आम्ही ती परीक्षा पास झालो .पण लग्न झाल्यावर आमच्या सासू बाई बोलल्या " तू काय काय केले ते बघितले होते ",पदार्थ येण्यापेक्षा बिघडत असतानातो सावरून घेणे जमले पाहिजे .सासू बाई खूप सुगरण होत्या.तू छान स्वयपाक करते हे त्या कधीच बोलल्या नाही .मी कधी जास्त विचार केला नाही.छान असे नाही पण ठीक करते मी स्वयपाक .......
असेच एक पोस्ट वरून आज पोहे आठवले.
फोटो-गुगल सर्च

No comments :
Post a Comment