"कल्पनेच्या जगात ".
स्वताच्या विश्वात जगणारा आपले काम भले नि आपण भले असा वागणारा काहीसा अबोल .खरे तर अत्माविस्वसाची कमी स्वताचे म्हणणे नीट मांडता न येणारा, जगासाठी नेभळट समजायचे त्याला सगळे .आपले हसू नको म्हणून तोच दूर राहायचा सगळ्या पासून .बाकीचे फेसबुक वापरतात त्याची चर्चा करतात आपण पण फेसबुक चालू करावे म्हणून त्याने फेसबुक चालू केले .एक अनोखे जग त्याच्या पुढे खुले झाले

.चार लोका समोर दोन शब्द निट न बोलू शकणारा तो आता रोज मोठे मोठे लेख लिहू लागला हळू हळू त्याचा मित्र परिवार वाढला तो आता खुश राहू लागला .त्याच्यात बदल झाला .आपण काही आहे असे वाटू लागले .कधी तरी त्याला हसणारे आता त्याला छान लिहितो म्हणून मेसेज करायचे .दिवस जात होते आपली आता एक ओळख आहे यात तो खुश होता .थोडा खुश होता .थोडा हवेत .आता आपल्याला कोणी नेभळट म्हणणार नाही या भ्रमात तो जगू लागला .
अशातच एका नातेवाईकाच्या लग्नाला जाण्याचा त्याला योग आला .मोठ्या घरचे लग्न असल्या मुळे झाडून सगळे नातेवाइक जमा झाले होते हा पण पोचला .तिथे गेल्यावर नमस्कार चमत्कार झाला .नंतर जो तो आपल्या नादात मग्न झाला .हळू हळू याच्या लक्षात आले आपण आहे तसोच आहे आपण आज पण वास्तव जगातील लोका मध्ये मिक्स नाही होऊ शकत .आभासी जगात रोज बोलायला अनेक जन असणारा तो आज स्वताला गर्दीत एकटा समजत होता .या विचाराने त्याच्या डोळ्यात पाणी आले .
पण त्याच वेळी आभासी जगातील मिळालेला आत्मविस्वास कमी आला .आणि त्याने मनाशी निश्चय केला काय झाले माझ्यात काही कमी असेल तर मी जसा आहे तसा लोकांना समोर जाईन.त्यांनी आजू बाजूला बघितले काही छोटी मुले होती त्यांच्या कडे गेला .त्यांचाशी बोलला .आणि त्यांचात तो रमला .नकळत त्याला या निरागस मुला मध्ये तोच त्याला भेटला .आता तो कल्पने पेक्षा वास्तवात जगणार होता .सगळ्यात आधी त्याने फेसबुक स्टेटस टाकले " मी आता लवकरच आपल्या समोर एक कादंबरी घेवून येत आहे .तो पर्यंत फेसबुकवर नसणार भेटू लवकरच " त्याने पेपर समोर घेतला त्यावर मोठ्या अक्षरात लिहिले "कल्पनेच्या जगात ".
No comments :
Post a Comment