काही लोक स्वता बद्दल खूप बोलतात .अर्थात ते बोलतात ते खरे असेल त्यांनी समाजासाठी मोठे काम केले असेल तर कोणी त्यांचे बोलणे मन लावून ऐकतात .कारण त्यांच्या कडून खूप काही असते शिकायला .पण याउलट काही लोक काही नसताना किवा आपण काही विचारले नाही तरी स्वता बद्दल सांगत असतात .
असे लोक कुठे भेटतात .अगदी बस मध्ये एखाद्या रांगेत .मला नेहमी प्रश्न पडतो का असे करतात हे लोक .
माझे मते माणसांची खरी संपत्ती त्याचे ज्ञान आणि त्याची मुले हि असतात .तुमच्या कडे मोठे घर आहे .अनेक गाड्या आहे .सगळ्या सुख सुविधा आहे .पण त्या तुम्ही कधी बरोबर घेवून नाही फिरू शकत .पण ज्ञान अशी गोष्ट नेहमी तुमच्या बरोबर राहते .अर्थात याबद्दल देखील काही लोकांना खूप अहंकार असतो .न विचारता ते किती शिकले .काय जॉब करतात .त्यांना पगार किती .हे सांगत असतात .
काही दिवसा पूर्वी एक हॉस्पिटल; मध्ये आलेला अनुभव ,अर्थात हॉस्पिटल सरकारी आयुर्वेदिक,बाहेरच्या पेक्षा येथे खूप कमी ,फक्त २५% फी घेतली जाते अर्थात सरकारी म्हणजे काही अडचणी असतात तश्या येथे आहे .पण येथे एक महिला अडमीट होती .अगदी पहिल्या दिवसापासून .जेवण बरोबर नाही चहा बरोबर नाही .आम्ही असे नोकरांना पण नाही देत .अर्थात त्या जेवणा बद्दल बाकी लोकांना काही प्रोब्लेम नव्हता .कारण हॉस्पिटलचे जेवण चमचमीत कसे असणार असे त्यांचे मत होते आणि ते बरोबर होते
.
.
हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या महिला बरोबर ती बाई सकाळी सकाळी भांडत होती मला येथे नाही राहायचे मला मला डिस्चार्ज द्या कारण पंचकर्म विभाग तिच्या वार्ड पासून लांब आहे .तिला खूप चालावे लागते ."आमच्या घरी फोर व्हीलर आहे .दारात गाड्या उभ्या असतात ."चालण्याची सवय नाही .हे बोलून झाल्यावर ती थोड्या वेळाने बोलली ."उगाच बाहेर दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये परवडत नाही म्हणून येथे आलो " हॉस्पिटल मधील महिला कर्मचारी हिने माझ्याकडे बघितले .तिच्या नजरेत प्रश्न होता .दारात गाड्या आहे .मग हिला
दुसरीकडे परवडत नाही .नेमके काय खरे .
हे एक उदाहरण आहे .का बोलतात लोक हे ,त्यांच्या कडे किती असेल ते आपल्या काही उपयोगाचे असते का ?
ज्यांचे मुले निर्व्यसनी ,आईवडिलांचा आदर करणारी असतात .त्यांचे नाव मोठे करणारी असतात .ती खरी कमाई.नाही तर तुमच्या कडे अनेक गाड्या अनेक बंगले आहे .मुले व्यसनी आहे .रोज घरात तमाशा करतात .आईवडिलांना त्रास देतात .तर काही कमवले नाही असे समजायला काय हरकत असते .
ज्ञानच गर्व नक्की असावा .पण तेव्हा त्या ज्ञाना मुळे तुम्ही कोणाच्या उपयोगी पडत असाल तर .कौतुक नक्की करावे .पण आपण आपले नाही तर समाजाने आपले ........
असेच मनातले काही .
No comments :
Post a Comment