सुखाचे क्षण अनेका बरोबर वाटून घेता येतात .तसे दुखाचे नसते.काही वेदना कधी कोणाला सांगता येत नाही .तसे विस्वसाचे कोणी असायला हवे .नाही तर अनेकदा तोंडातून बाहेर पडलेले शब्द वार्या सारखे कुठे कुठे पोचतात .मग अजून दुखात भर पडते .कोणावर विस्वास नाही राहत .
मग मनातले कोणाला तरी सांगायचे असते मन हलके करायचे असते .अश्या वेळी सरळ लिहून काढावे .जो पर्यंत मन हलके होत नाही .आपले शब्द कुठे जात नाही .नाही जमत लिहिणे सरळ देवाच्या फोटो समोर उभे राहावे सगळे बोलून टाकावे .देव ऐकायचे काम करतो का नाही माहिती नाही पण .तो कधी कोणाला सांगयला जाणार नाही हा पूर्ण विस्वास असतो .असेच मनातले काही पण मनात येते ,काही मन हरवलेली माणसे देखील असतात नाही .
अनेकदा असी माणसे नेहमीचे आयुष्य हे सुरळीत जगत असतात .
असे वाटते त्यांच्या आयुष्यात काही समस्या नाहीच आहे .जसे काही डोळ्याने
बघणारे मनापासून बघतातच असे नाही.कारण मन भलतेच कुठे फिरत असते .
शरीर जसे आजारी होते तसे मन सुद्ध आजारी होते नाही ,आजारी शरीर दिसते.
आजारी मन दिसत नाही .डोळे रडतात तसे मन पण रडते नाही.रडणारे डोळे दिसतात.रडणारे मन दिसत नाही .
पण मनाचे रडणे अति झाले कि ते पण हरवते .मग त्या मनाला कोणत्या व्रेद्ना
राहत नाही.सुख दुख यापलीकडे ते जाते .
"मग जग त्याना वेडे म्हणतात "
असेच मनातले काही
घर हरवलेली माणसे मागे वपु चे हे पुस्तक वाचले .
मौनात मोठी ताकद असते म्हणतात.पण तेच मौन कधी कधी मनस्ताप देते .मन दुखावले चूप बस हवे तर राडा पण ज्याने मन दुखावले त्याला काही बोलू नका .कारण त्याला जसे वागायचे तसे तो वागला तो त्याचा स्वभाव असे समजून चूप बसने म्हणजे मुर्ख पणा असतो कारण तुमच्या मौनाचा लोक वेगळा अर्थ लावतात .तुम्हाला चूक समजतातत त्या . पेक्षा जास्त त्रास तेव्हा तुमच्या मौनाचा वेगळा अर्थ घेवून तुमच्या वर अविस्वास दाखवला जातो .अपेक्षा असते तुम्ही कोणावर पूर्ण विस्वास ठेवता त्या व्यक्तीने पण तुमच्या वर विस्वास ठेवावा .जेव्हा असे होत नाही तेव्हा खूप मन दुखावले जाते .
No comments :
Post a Comment