प्रिय दादा ....
हो दादाच बोलत असू ना आम्ही ...आज तुम्ही या जगात नाही ,फादर डे काय असतो हे माहिती नसलेले तुम्ही ,कशाची अपेक्षा नाही कोणाचा कधी राग नाही .तुमचा दिवस सुरु होत असे पहाटे चार वाजता हरिपाठाने होत असे .आपण आयुष्यभर खूप कष्ट आणि कष्ट केले पण आपण शिकू शकलो नाही आपल्या मुलांनी खूपशिकावी हि तुमची इच्छा होती .स्वत काम केले पण मुलांना शिकवले.आज पण मला आठवते स्वता बद्दल तुम्ही खूप कमी बोलत ,आत जून महिना चालू आहे शेतात पेरणी चालू असे आणि तुमच्या बरोबर मी असे त्या वेळी तुम्ही तुमच्या बालपणा बद्दल बोलत .वयाच्या अवघ्या अडीच वर्षाचे तुम्ही असतानी आई गेली होती.मग तुमचे वडील हेच आई आणि बाबा सुद्धा.आई काय असते आईची माया काय असते हे तुम्ही कधी अनुभवले नव्हते .त्या वेळच्या प्रौढा साठी {डांगरी शाळा } असेलेल्या शाळेत लिहिता वाचता येतील एवढे शिकले .त्याचा उपयोग तुम्ही कायम कोणत्या ना कोणत्या पोथ्या वाचयला केला.नेहमी तुम्ही धार्मिक गोष्टी सांगत त्या मुळे आज मला पुराणातील सगळ्या कथामाहिती आहे .
तुम्ही माळकरी म्हणून लोक तुम्हाला खूप मानत कारण तेव्हा दारू पिणार्यांनावाईट समजत .आम्हाला आमचे वडील व्यसनी नाही याचा खूप अभिमान वाटत असे .कधी कधी मी विचारत असे काय भेटते तुम्हला देव देव करून .त्या वर तुमचे उत्तर असे "आपण बचत का करतो कारण ती आपल्याला अडचणीच्या वेळी उपयोगी यावी ,तसेच आहे हे आज मी ठीक आहे म्हणून मी देवाचे नाव घेतो जे आपल्याला आपल्या दुखाच्या वेळी उपयोगी पडेल.मी दहावीला पास झाले तेव्हा किती आनंद झाला होता तुम्हाला आज पण आठवते.आज मी जीकाही आहे ,जे काही आज येथे लिहू शकते ते तुमच्या मी शिकले पाहिजे या हट्टामुळे,दहावीझाले आणि पुढे कॉलेज साठी बाहेर जावे लागेल म्हणून आई ने खूप विरोध केला तरी तुम्ही मला कॉलेजला पाठवले.मुलीना कॉलेजला पाठवले कि मुली बिघडतात असे लोक बोलत तेव्हा तुमचे उत्तर असे "माझा माझ्या मुलीवर विस्वास आहे.ती मला कधी मान खाली घालयला लावणार नाही" मी शिकले पदवी घेतली पण नोकरी नाही केले याची खंत मात्र कायम राहिली तुमच्या मनात
.तुम्हाला कधी दुखी बघितले नव्हते मी पण जेव्हा मला लग्ना नंतर फक्त दीड वर्षात टीबी झाला.मी हॉस्पिटल मध्ये होते माझी मुलगी गावी तुमच्या कडे .मुंबईची माहिती नाही तरी मला भेटायला आले.माझ्या समोर शांत असणारे तुम्ही घरी जाऊन पहिल्यांदी रडले.माझी बहिण लहान मुली सोडून टीबी मुळे गेली आता माझी मुलगीतरी बरी होऊ दे म्हणून पहिल्यांदी देवा समोर बोलले होते.एक पण व्यसन नसलेले तुम्ही पण तुमचा एक मुलगा मात्र पूर्ण व्यसनी झाला.आणि मनातून तुम्ही खूप खचले.कधी तसे दाखवले नाही तुम्ही.कधी सुपारी न खाणारे आणि चहा सुद्धा न पिणारे तुम्ही पण केवळ मुलगा व्यसनी झालाआणि त्याचा त्रास नको म्हणून पूर्ण आयुष्य जिथे घालवले ती जागा सोडून शेतात राहायला गेले.शेवट पर्यंत एकदशी आणि हरिपाठ न सोडणारे तुम्ही .आज खूप खूप आठवण येते आहे.असे वाटते आज तुम्ही हवे होते.खूप काही बोलावे वाटते खूप काही सांगावे.पण आता ते मनातच राहणार ............
No comments :
Post a Comment