आपल्या हाय फाय गाडीतून तो जात होता रस्त्यावर वर्दळ नव्हती .
रस्त्याच्या दुतर्फा ज्वारीची मस्त पीक शेतात डोलत होते .सकाळची वेळ होती .हवेत मस्त गारवा होता .गाडी मधून खाली उतरण्याचा मोह त्याला झाला .एका बाजूला गाडी उभी करून तो खाली उतरला .जवळच्या शेतात बोर चालू होते त्याचे पाणी कोणी तरी शेताला देत होते .त्याने पायातील आपले बूट काढले .त्याच्या पायांना ओल्या मातीचा थंडगार स्पर्श झाला .पाण्यात हात घातले किती थंड पाणी होते .खूप वर्षाने त्याने हा मातीचा आणि पाण्याचा स्पर्श अनुभवला.किती वेळा तो बिना चप्पलचा अश्या ओल्या माती मधून धावला होता .पडला होता .त्याचे मन भूत काळात गेले .छोट्या गावातील वडिलांचे छेत्र हरवले म्हणून आई बरोबर मामा कडे येवून राहिलेला .एक प्रकारे आश्रित .आई बरोबर जे काम सांगितले जात ते करणे एवढे माहिती असलेला .एक सज्जन मास्तर आयुष्यात आले आणि शिक्षणा मुळे आयुष्य बदलते हे समजले .मग फक्त जिद्द आणि जिद्द .यशाची एक एक पायरी कधी चढत कधी वरच्या पदावर गेला हे समजले नाही .
या सगळ्यात मागे राहिले गाव आणि बाल सवंगडी ...
दूर वरून "जय जय रामकृष्ण हरी " आवाज आला आणि तो भानावर आला .
कुठे तरी भजन चालू होते .नकळत खेचले जावे तसा तो त्या आवाजाच्या दिशेने गेला .एक मंदिरात कीर्तन चालू होते .सात दिवस चाललेल्या सप्ताह आज काल्याच्या कीर्तनाने संपत होता .
त्यांनी एका मानसं कडून टाळ घेतला .आणि तो टाळकऱ्या मध्ये जावून उभा राहिला .कीर्तन कर महाराज
अभंग म्हणत होते .
"किती कर हा संसार नर देह मातीला जाणार "
तो देखील भजनात तल्लीन होऊन गेला .
आज त्याला मनात खूप समाधान वाटत होते .
तो लहान असतानी गावात एकमेव कर्यक्रम होत असे तो म्हणजे गावातील सप्ताह ,रोज भजन ,पारायण ,प्रवचन आणि रात्री कीर्तन .गावात नुसती धमाल असे .आणि त्याला ते सगळे आवडत असे .कीर्तानात नेहमी टाळकरी म्हणून तो उभा राहात असे .अभंग तर तोंडपाठ मग काय बाबा कीर्तन करत असतानी हा योग्य अभंग म्हणून नेहमी बाबांना आडवे जात असे .आयुष्यात खूप काही मिळवता मिळवता खूप काही मागे सुटले ...
मनापासून देवाला प्रणाम केला आणि वर्षातील सात दिवस कुठल्या world टूर करण्या पेक्षा गावाला जायचे आपल्या मातींत आपल्या माणसात हा निश्चय करून तो आपल्या पुढच्या प्रवासाला निघाला .
असेच मनातले काही .
{काल्पनिक }छोट्या गावातील वडिलांचे छेत्र हरवले म्हणून आई बरोबर मामा कडे येवून राहिलेला .एक प्रकारे आश्रित .आई बरोबर जे काम सांगितले जात ते करणे एवढे माहिती असलेला .एक सज्जन मास्तर आयुष्यात आले आणि शिक्षणा मुळे आयुष्य बदलते हे समजले .मग फक्त जिद्द आणि जिद्द .यशाची एक एक पायरी कधी चढत कधी वरच्या पदावर गेला हे समजले नाही .या सगळ्यात मागे राहिले गाव आणि बाल सवंगडी ...दूर वरून "जय जय रामकृष्ण हरी " आवाज आला आणि तो भानावर आला .कुठे तरी भजन चालू होते .नकळत खेचले जावे तसा तो त्या आवाजाच्या दिशेने गेला .एक मंदिरात कीर्तन चालू होते .सात दिवस चाललेल्या सप्ताह आज काल्याच्या कीर्तनाने संपत होता .त्यांनी एका मानसं कडून टाळ घेतला .आणि तो टाळकऱ्या मध्ये जावून उभा राहिला .कीर्तन कर महाराज अभंग म्हणत होते ."किती कर हा संसार नर देह मातीला जाणार "तो देखील भजनात तल्लीन होऊन गेला .आज त्याला मनात खूप समाधान वाटत होते .तो लहान असतानी गावात एकमेव कर्यक्रम होत असे तो म्हणजे गावातील सप्ताह ,रोज भजन ,पारायण ,प्रवचन आणि रात्री कीर्तन .गावात नुसती धमाल असे .आणि त्याला ते सगळे आवडत असे .कीर्तानात नेहमी टाळकरी म्हणून तो उभा राहात असे .अभंग तर तोंडपाठ मग काय बाबा कीर्तन करत असतानी हा योग्य अभंग म्हणून नेहमी बाबांना आडवे जात असे .आयुष्यात खूप काही मिळवता मिळवता खूप काही मागे सुटले ...मनापासून देवाला प्रणाम केला आणि वर्षातील सात दिवस कुठल्या world टूर करण्या पेक्षा गावाला जायचे आपल्या मातींत आपल्या माणसात हा निश्चय करून तो आपल्या पुढच्या प्रवासाला निघाला .असेच मनातले काही .{काल्पनिक }

No comments :
Post a Comment