माझ्या लहानपणी आमच्या गावात बाजाराच्या दिवशी वासुदेव येत असे.मंगळवारी आमच्या गावात बाजार असे तेव्हा शेतातील कामाला सुट्टी असे.
सकाळ पासून मग घर सारवणे हे काम चालू असे ,दुपार पर्यंत हे काम असे .आमचे घर रस्त्याच्या बाजूला असल्या मुळे अगदी सकाळ पासून सायकल ठेवणारे ,गाडी बैल वाले येत असे .त्यांना पाणी तर कधी जेवण पण देणे हे आईवडीलंची सवय होती .अनेकदा याचा त्रास पण होत असे पण या सगळ्यात आम्ही वाट बघत असायचो ती आमच्या घरी येणाऱ्या वासुदेवाची .तो यायचा पण "वासुदेंव आला हो वासुदेव आला " असे म्हणत नाही तर आपल्या एका पिशवीत सगळे सामान भरून साध्या कपड्यात .तो यायचा नेहमी प्रमाणे "अक्का मी आलो झाला का तुझा स्वयपाक "काय केले मग आज कालवण,झाले असेल तर दे .त्याला पाणी आणि जी असेल ती भाजी दयायची ,तो जेवण करायचा मग त्याचे एक एक कपडे तो घालायचा .त्याचा कडील मोर पीस खूप आवडत असे आम्हाला .मग आम्ही त्याला गाणे बोलायला लावत असू .छान गाणे म्हणायचं नाचून दाखवायाचा .आता येतो म्हणून पुढे जायचा .
साधी भोळी माणसे एवढ्याश्या गोष्टीवर तोंड भरून आशीर्वाद दयायची .
दारात आलेला रिकामा हाताने जावू नाही म्हणून घरातील ओंजळ भर धान्य त्यांना दिलेच जायचे .
गाव आणि गावाची माणसे मात्र कायम मनात राहिले .काल अनेक वर्षाने माझ्या बिल्डींग वासुदेंव आला .छान गाणे म्हणत होता .त्याला काही पैसे दिले .घरात बोलवावे जेवण करणार का विचारावे वाटले पण .लगेच आठवले हि तर मुंबई आहे .असे कोणावर पण विस्वास नाही ठेवता येत .मन मात्र भूतकाळात गेले .गावाला येणारा तो वासुदेव आठवला ......मनात आले कुठे असेल तो आता ,असेल का ? त्याची मुले आता काय करत असतील? .उत्तर नसलेले अनेक प्रश्न ....
असेच मनातले काही

No comments :
Post a Comment