माते मी आज येतो आहे ....
किती कंटाळा आला आहे ग !कधी एकदा तुझा कडे येतो असे झाले आहे .
सगळे जोरात जयघोष करत आहेत ,"गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या "पण मला हा आवाज आता नको झाला आहे .नको नको ते गाणे ऐकून माझे कान दुखायला लागले आहे .
माते तुला आठवते मी मस्त तुझा जवळ बसलेला असतो .शांत पणे ...
पण दरवर्षी माझे हे भक्त येतात आणि मला तुझा पासून दूर घेवून जातात .
एकीकडे मला जायचे नसते म्हणून मी तुझा हात घट्ट पकडून ठेवतो तर दुसरी कडे माझे भक्त मला बोलावत असतात .या सगळ्यात माझी ओढाताण होते .
माझी इच्छा नसते जाण्याची कारण दहा दिवश ते गाणे ऐकयला नको वाटतात .माझे आगमन म्हणून सुद्धा हे लोक रस्ते अडवतात .मिरवणूक काढतात .कोण आजारी कोण असेल कोणाला त्रास होत असेल हे पण बघत नाही .अनेक तास वाहतुकीचा खोळंबा करून हे मला मंडपां मध्ये घेवून जातात .माझ्या नावाने वर्गणी जमा करतात .कोणाची ऐपत नसते तरी त्यांना वर्गणी देण्यास भाग पाडतात .हे कमी कि काय म्हणून मला बघयला लोक येतात अगदी मनापासून पण त्यांना मी दिसत नाही कारण माझ्या मंडपांला पडदा असतो .मग पास घेवून माझे दर्शन लवकर होईल हे सांगितले जाते .बाकीचे पाय दुखतात तरी रांगेत उभे राहतात हे मला बघवत नाही .काही तर व्यक्ती किती मोठी हे बघून त्यांना सरळ माझ्या पर्यंत घेवून येतात .गरीब भक्तांना धक्काबुक्की करतात .हे बघून माझे मन दुखी होते .
मी सगळी कडे एकाच रुपात असतो मग तो मंदिरात असो कि छोट्या मूर्ती मध्ये मग हा बाप्पा नवसाला पावतो तो बाप्पा नवसाला पावतो असे हे लोक का बोलतात .नको तिथे का गर्दी करतात .मोदक ते पण किती प्रकारचे त्यात अनेकदा भेसळ असते .ते पण नाही बघवत ,
पण माते काही भक्त आहेत ग असे ते मला मना पासून बोलवतात म्हणून मला जावे लागते तुला सोडून .काही भक्त असतात ग त्यांच्या घरात माझ्या मुळे ख़ुशी येते,त्या भक्ता साठी मला जावे लागते .त्याच भक्ता साठी मी हे शीला मुन्नी गाणे सहन करतो .कारण तेच भक्त असतात माझी मनापासून पार्थांना करतात .साधा का होईना मोदाक माझा समोर ठेवतात .त्याच भक्तांना साठी मी येतो .आज एकीकडे आनंद होतो आहे .आज मी तुझा कडे परत येतो आहे .आणि वाईट देखील वाटत आहे .माझ्या लाडक्या भक्तांना मी सोडून येतो आहे .
माते मी येतो आहे .......
No comments :
Post a Comment