मनात आलेले काही प्रश्न
माझे पती सैभाग्यावती मालिका एक पुरुष काम मिळत नाही म्हणून स्री पात्र रोल करतो .खरे तर जन्मता एक स्री मध्ये नाजूक पणा असतो .तर पुरुषा मध्ये रांगडे पणा जो लपून राहत नाही .
पुरुषाने किती घोटून जरी दाढी केली तरी समजून येतेच.काही अपवाद असतील हि {बालगंधर्व}
मग प्रश्न पडतो या मालिके मध्ये असणारेबाकी पात्र त्यांच्या लक्षात कसे येत नाही .
सगळ्यात महत्वाचे म्हणजे या लक्ष्मिला बघून यामधील तिचा बरोबर असणारातिचा
कोस्टर तिचा मागे गोंडा घोळतात. ए. के .आणि भंडारी तिचा मागे कसे
वेडे चाळे करतात .ते बघून उगाच वाटते खरच असे असते या मालिकेच्या जगात..
सगळे बसलेले असतानी लक्ष्मिला फोन येतो त्यावर हे लोक घ्या फोन बोलतात.ती /तो
दुसरीकडे जावून फोन घेणार असतो तर तिला/ त्याला जावू देत नाही.असे कोणी वागते का ?
कोणत्या मालिकेची अभिनेत्री असे ऐकते का?
खाजगी लाईफ त्यांना नसते का ? असे वागतानी काही म्यानर्स असतात हे
या लोकांना काळात नसते का ?
सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे दाखवतात ते बघून आमच्या सारख्या सामान्या
प्रेक्षकांना नक्कीच विचार करायला लावणारे आहे .म्हणजे मुलीनी या क्षेत्रात
जावे का नाही ?मुली बरोबर मालिकेचा निर्माता आणि अभिनेता असे खरच
वागत असतील का? असतील तर या क्षेत्रा पासून दूर राहावे का ?
आणि जर असे काही होत नसेल तर हे लोक या मालिके मधून असे खोटे का
दाखवतात .का चुकीचा संदेश देत आहे. त्यांना आपणच आपल्या क्षेत्रा बाबत
गैरसमज पसरवत आहे असे नाही का वाटत !
काही दाखवा लोक बघतात असा यांचा समज आहे का ?
पण आपण जे दाखवतो त्याचा काही प्रमाणात असर समजावर होतो हे यांच्या
लक्षात का नाही येत. असेच मालिका बघून काही प्रश्न मनात आले .
#असेच-मनातले-काही
No comments :
Post a Comment