जगण्यासाठी ..............
काल सकाळी सकाळी एक बातमी आली ट्रेन च्या धडकेने रेल्वेचे चार कर्मचारी ठार ,मुंबई मध्ये अश्या बातम्या अजिबात नवीन नसतात .पण हि बातमी खूप वेगळी होती कारण रेल्वे सेवा सुरळीत चालावी म्हणून रात्री च्या वेळी रेल्वे ट्रक वर काम करणारी ती लोक होते .काही तरी चूक झाली आणि त्यांचा बळी गेला .पण यात मनाला चटक लावून जाणारी गोष्ट म्हणजे हे सगळे कंत्राटी कामगार होते .आणि सगळे खूप कमी वयाचे होते .घोटी इगतपूरी भागातील हे लोक होते .वय वर्ष १८ ,१९ ,२१ आणि एक कामगार २७ वर्ष वयाचा होता .१८ ,१९ वर्ष वयाचे मुले कॉलेज मध्ये असतात .असा वयाची हि मुले पोटा साठी रात्र पाळी मध्ये अतिशय धोक्याचे काम करत होते .बोलतात ना गरिबीला पर्याय नसतो .मिळेल ते काम करणे आणि पोट भरणे बस एवढेच माहिती असते .अनेकदा अनेक घरात सकाळी एक दृश्य असते काही काम मिळते का ते बघायचे .काम भेटले कि खुशीचा ठिकाणा नाही .मग मिळणाऱ्या त्या थोड्या पैशात खूप सारे स्वप्न बघायचे .रोज रोजंदारी वर काम करायचे येणर्या पैशात पोटा साठी लागणारे समान घ्यायचे.सकाळी घरातून निघातानी आई जे काही देणार ते घ्यायचे .घरातून निघातानी आपला मुलगा कामावरून काही तरी घेवून येईन हि आशा त्या माउलीला असते .पण कुठे तरी नियती घाला घालते आणि मुलाचे
प्रेत घरी येते .मग त्यात नियती किती आणि मानव निर्मित चुका किती माहिती नाही .
मुंबई अनेक जण स्वप्न घेवून जगतात येथे .कोणी दोन मिनिटात हजारो रुपये कमवतात तर काही दिवसभर राबराब राबतात तरी पोटा पुरते मिळत नाही .
रोज गगन चुंबी बिल्डींग बनत आहे .कुठे कोणी काम करातांनी पडतो मरतो .
कोणाला खबर नसते .कोणी तरी मरते एक बातमी असते फक्त .....
पण खरच घरातून निघातानी आई तुझे औषध आणतो संध्याकाळी किवा मुलांना मी तुमचा साठी खाऊ आणतो हे सांगून बाहेर पडणारे लोक जेव्हा घरी
सफेद कपड्यात गुंडाळूनच जातात तेव्हा त्या लोकांचे आयुष्य खूप बदलून
गेलेले असते .
काही ओळी आठवतात .
कोणच्या खांद्यावर कोणाचे ओझे .....
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून ..............#असेचमनातलेकाही
No comments :
Post a Comment