मन उदास होते गावी तर निघाले होते.भायखळ्यातून ट्रेन पकडली.खिडकीच्या बाजूचे सीट भेटले .मी जिथे बसले होते तिथून पूर्ण डबा दिसत होता.कसारा ट्रेन नेहमी सारखी गर्दी होती,पण मन उदास म्हणून मी सरळ खिडकी बाहेर बघत होते
.मन उदासअसेल तर कोणाशी बोलावे वाटत नाही.एक एक स्टेशन येत होते .डबा पूर्णभरला होता पण माझ्या बाजूला कोण बसले आहे .समोर कोण आहे.हे सुद्धा मी बघितले नाही.माझ्याच विचारात मी हरवले होते .समोरच्या सीट वरील बाई बोलण्याचा प्रयत्न करत होती पण मी लक्ष नाही दिले .
काय तुम्ही ६३ वर्षाच्या आहे, माझ्या बाजूची आणि त्या बाईच्या बाजूला बसलेली आणि मी एकदम बोललो .तेव्हा मी तिचा कडे नीट बघितले.५० च्या आसपास वाटावी अशी छान बाई होती ती,अतिशय देखणी.उंच गोरी सुंदर डोळे " हि पंचवीस वर्षाची असेल तेव्हा काय सुंदर दिसत असेल असे मनात येवून गेले"यावयातील तिचा उत्साह बघण्यासारखा होता.मनातील निराशा कुठल्या कुठे गेली.तीचाबरोबर बोलले .तरुण असतानी घरातील आणि नवरा त्रास देतो म्हणून ,घरातून दोन मुलांना घेवून गावाकडून मुंबईत आली.धुणे भांडे केले.रेल्वे पोलीस मध्ये भरती झाली.सगळे ठीक झाले,हि मजेत राहते म्हणून सासरचे लोक तिला घेवून जायला आले.पहिल्या सारखे मारहाण करायला लागले.सरळ कोयता काढला आणि धमकी दिली या समोर एकाएकाचा मूडदा पडते.तिचा आवेश बघून सगळे पळून गेले.मुलांना शिकवले ,स्वताचे घर घेतले.नवरा आला नंतर तिचाकडे
सुना आल्या जास्त नाटक करायला लागल्या ,सरळ मुलांना सुनांना बाहेरचा रस्ता दाखवला.आयुष्यभर कष्ट केले.माझी स्वताची पेन्शन आहे का ऐकू यांचे ....रोखठोक असणारी ती बाई बोलत होती.माझ्या बरोबर बाकी ऐकत होत्या.आसनगाव आली ती उतरून गेली,
जाता जाता माझ्या मनातील मरगळ घेवून गेली.
माझ्या बाजूची बाई बोलली ,खरच सगळ्याना नाही जमत ना असे ,ते पण तीसपस्तीस वर्ष आधी . .......
No comments :
Post a Comment