संस्कार म्हणजे काय ?
जे समाजाला मान्य असते ते करणे .समाजा विरोधी न जाणे .
मग समाज काय म्हणेल या भीतीनी जगत राहणे .
मन मारून जगणे.जे हवे ते मिळत नाही .ते मिळवण्याची हिम्मत न होणे
म्हणून त्याला आमचे संस्कार हे गोंडस नाव दिले जाते .
समाज काय म्हणेल म्हणून सुंदर आयुष्य न जगता ,मनाचे दरवाजे कायमचे
बंद करून टाकणे.स्वताच स्वताच्या कोशात जगणे .
मनाच्या या दारावर कोणी तरी येवून दस्तक देवू बघते .
पण पुन्हा संस्कार ,समाज . दार उघडण्याची हिम्मत होत नाही .
कोणी तरी दारावर येवून परत गेले याची खंत मग जगू हि देत नाही ...........
मनाचे दार उघडले जाते तो पर्यंत उशीर होवून जातो ...
दारावर दस्तक देणारा निघून गेलला असतो ....
अनेक प्रश्न मागे ठेवून ......................

No comments :
Post a Comment