Thursday, 31 March 2016

निराशातून बाहेर पडतानी

निराशातून बाहेर पडतानी

कधी कधी आपण खरच निराश होतो.कोणाशी बोलू नाही वाटत.
जेव्हा मला असे वाटते तेव्हा अनेकदा 

 मी माझ्या गावी जाते.जिथे  माझा जन्म झाला.जिथे मी वाढले मोठी झाले.त्या माझ्या गावी.शेतकरी
 परिवारातील असल्यामुळे शाळे व्यतिरिक्तचा वेळ हा जास्त शेतात जात असे.घरात दरवाजे बंद करून
 बसणे काय हे माहिती नव्हते.लहान असताना पासून शेतात राखण करण्या सारख्या कामा पासून जे
 जमेल ते काम करण्याची सवय कधी बरोबर कोणी असे कधी कोणी नसे अश्या वेळी बांधावरील बाभळी 
किवा कोणत्या झाडा खाली बसणे.मग ती कोणती वेळ असो,दुपार असेलतर शांतता असे.शेत अगदी स्तब्द 
वाटे,मधेच वाऱ्याची झुळूक पिकांना हळुवार स्पर्श करून जाई बाकी शांत.पण जर एकदम सकाळ असे तेव्हा
 आताच रान जागे झाले आहेअसे वाटे.सगळीकडे एकदम प्रसन्न वातावरण असे जे मन प्रसन्न
करत असे. दिवसातील सगळ्यात आवडती वेळ म्हणजे संध्याकाळ ....सूर्य अस्ताला गेला आहे.संधी प्रकाश

 पडला आहे.शांत मंद वारे वाहत आहेत.सगळ्यांना घराची ओढ लागली आहे.मग शेताच्या बांधावरून ,छोट्या
छोट्या पायवाटावरून रानातून घरा कडे निघालेले गुरे ,त्यांच्या गळ्यातीलघुग्रांचा आवाज त्या शांतते मध्ये एक

 वेगळा नाद करत असे .

दूर वर पसरलेले शेत आता निद्रस्त असे वाटायचे .................

म्हणून गावी गेले कि मी पुन्हा हे अनुभवते.

चप्पल न घालता शेतातील मातीमधून चालते.बांधावरील बाभळी खाली बसते.आसपास कोणी नाही.कुठे 
तरी चिमण्या चिवचिव करत असतात.येथेच मी मला सापडते.निराश असलेले मन विचार करते.
बाभळी हे असे झाड आहे जे कोणी लावत नाही.ते शेताच्या बांधावर आपोआप येते.काटेरी असते तरी खूप 

उपयोगी असते .त्यांच्या सरपण म्हणून उपयोग होतो.आणि सावली म्हणून पण.मनात येते .शेतातील झाडे 
याना कधी वाटत असेल आपण एकटे आहे.नियमाने उगवणारा सूर्य त्याला नाही का कधी कंटाळा
येत .त्याला नाही का निराशा येत .दूर दूर पसरलेले शेत बघून वाटते ."या मातीने किती पिढ्या बघितल्या 

असतील ना? माझ्या सारखे किती आले किती गेले.ती मात्र आहे तिथेच आहे".अनेक जीवांचे पोट भरते .
ती पण कधी निराश होत असेल का ???? हिवाळा येतो ,हेमंत शिशिर ऋतू येतो.झाडावरील सगळे पाने 
गळून जातात.पर्णहीन ते झाडे बघयला पण नको वाटतात.माणसाच्या मनाचे थोडे तसे होते नाही.कोणाच्या
 तरी वागण्यामुळे किवा काही घटना मुळे आपण निराश होतो.


पण जसा हेमंत शिशिर संपतो आणि वसंताचे आगमन होते झाडाला नवीन पालवी येते. तशा काही घटना घडतात .
आणि आपण पुन्हा उत्साही होवून जीवनाला सामोरे जातो.

No comments :

Post a Comment