माणसातले देव .......
देव देवळात नाही माणसात शोध असे आपण नेहमी एकतो किवा बोलतो .मग अश्या माणसातील देव आपल्याला अनेकदा भेटतात आणि मदत करून जातात आपण फक्त बोलतो "देवा सारखा धावून आला /आली .मग ते कोणी असते अगदी आपल्याला वेदनामुक्त करणारे डॉक्टर सुद्धा .अर्थात प्रत्येकाचा अनुभव वेगळा वेगळा असू शकतो.कोणाला वाईट अनुभव देखील येतो .किवा अनेकांना वाटते ते पैसे घेतात आणि त्यांचे काम करतात.माझा बरोबर मात्र अनेकदा चांगला अनुभव आला आहे आणि अशाच एक डॉक्टरा बद्दल मी आज लिहिणार आहे.वरळी येथे पोद्दार आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर आहे.येथे नेहमी अनेक पेशंट येत असतात.अनेकदा शेवटचा पर्याय आयुर्वेदिक करून बघू म्हणून अनेकजण येतात.अशाच पेशंट मधील मी एक ....
अनेक ठिकाणी उपचार करून फरक पडत नाही म्हणून शेजारीण मला तिचा बरोबर चार वर्षा पूर्वी येथे घेवून गेली.बघू येथे तरी काही फरक पडेल का बघावे म्हणून गेले.खूप गर्दी बघून अंदाज आला.डॉक्टर नक्कीच चांगले असणार.माझा नंबर आला आणि समोर, डॉक्टर मनोहर गुंड्डेटीवार.प्रत्येक डॉक्टरांना पेशंटची हिस्ट्री सांगायला लागते.ती सांगून झाली.शांतपणे ऐकून औषधे दिली.काही प्रश्न नाही.पण त्या औषधाचा फरक पडला.गेली चार वर्ष मी तिथून औषध घेते.महिन्यातून दोनदा जावे लागते.खूप पेशंट असतात.सकाळी आठ वाजता ओ .पी .डी सुरु होते .खूप गर्दी असते कधी दोन तर कधी तीन देखील वाजतात.पण मी कधी त्यांना मध्ये चहा मागवून घेता ना किवा मधेच जेवणास जातानि बघितले नाही.
अनेकदा आपण बोलतो कि नकरात्मक ऐकून आपण देखील नकरात्मक होतो.माणसाने नेहमी चांगले वाटेल असे बोलावे.पण येथे खूप पेशंट असतात.अर्थात सगळे वयस्कर आयुष्याचा कंटाळा आलेले.दुखण्यामुळे त्रस्त झालेले.हे पेशंट जेव्हा डॉक्टरा समोर येतात तेव्हा त्यांना आपल्याला किती त्रास आहे हे सांगायचे असते.आणि ते सांगतात.पण सकाळ पासून या सगळ्या पेशंटचे बोलणे ऐकतात.शांतपणे,अगदी खूप त्रास होतो डॉक्टर "मरावे वाटते !"असे देखील पेशंट बोलतात.{अर्थात मी देखील त्यात होते }शांतपणे काही नाही मी औषध देतो ते घ्या बरे वाटेल .असे बोलून समजवतात .
अनेकदा दोन तीन तास बसायला लागते असा वेळी एक तर पुस्तक वाचते किवा बाजूला जे पेशंट असतात त्यांचा बरोबर बोलत असते.ते-व्हा जाणीव होते आपले दु:ख किती कमी आहे.येथे येणारे अनेक पेशंट हे "घराचा दरवाजा अतिशय मजबूत दिसणारा पण ,आत घराला सगळे टेकू दिल्या सारखे कमजोर "असे वाटतात .काही पेशंट हे स्वता उठता बसता येत नाही.त्यांना उचलून आणले जाते .सहा सहा महिने पेशंट येथे राहतात.स्वताच्या पायावर चालत जातात.लकवा मारलेले अनेक पेशंट येथे बघून माणसाचे काही खरे नाही.असे काय गुन्हा असतोकि माणसाला देव एवढे लाचार करत असेल हा प्रश्न मनात आल्या वाचून राहत नाही .पेशंट पेक्षा त्यांचा बरोबरील लोकांची ओढाताण आणि पेशंटची चीड चीड बघून वाटते आपले दुखं किती छोटे आहे.अश्या पेशंटला जगायला उम्मिद्द देतात ते डॉक्टर ....
त्यांचा मधील संयम बघून कोणती अशी शक्ती असते यांचा कडे कि सगळ्यांचे बोलणे ते शांतपणे ऐकत असतील.ते बोलणे कमी आणि रडगाणे जास्त असते ते पण एक पेशंट चे नाही तर साठ सत्तर ,एकदा न राहवून मी त्यांना हा प्रश्न विचारला पण होता "तुम्ही शांतपणे सगळ्यांचे कसे ऐकू शकता "यावर त्यानी छान उत्तर देले होते."आजाराने कंटाळलेला व्यक्तीला त्याचे कोणी ऐकावे ,विचारपूस करावी वाटते .त्यातून त्यांचा अर्धा आजार बरा होतो "अगदी सुट्टीवर असले तरी आपल्या पेशंट बरोबर बोलणारे हे डॉक्टर ,कधी मी त्यांना त्रस्त चिडलेले बघितले नाही.केंद्र कडून चालवले जाणारे या हॉस्पिटल. पगार घेवून आपले काम करणारे हे डॉक्टर किवा पोद्दार मध्ये काम करणारे सगळे .माणुसकी मधून काम करतांनी बघून कुठे तरी वाटते.हे सगळे माणसातले देव आहे .
आज त्यांचा बद्दल असेच मनातले काही लिहावे वाटले.
No comments :
Post a Comment